Monday, July 21, 2025

उमर खालिदचे उदात्ती करणं नको!

 उमर खालिदचे उदात्ती करणं नको!


नुकतेच उमरची आई उमरला भेटायला तिहार जेल मध्ये गेल्या नंतर तिच्या मनात झालेली घालमेल मराठी मध्ये अनुवाद करून काही लोक हेतू पुरस्सर फेसबुक वर पाठवत आहेत. तिच्या मते उमरला ह्या प्रकरणात उगाचच ओढले गेले आहे. माझा उमर टेरेरिस्ट नाही आणि तो देशद्रोही नाही. सरकारच्या विरुद्ध मतप्रदर्शन करणे गुन्हा नाही. एक आई म्हणून प्रत्येक स्त्रीला आपले मूल निर्दोष वाटणे स्वाभाविकच आहे.


११ डिसेंबर २०१९ साली संसदेमध्ये CAA चा कायदा पास झाल्यानंतर दिल्ली मध्ये जवाहर लाल नेहरू विद्यापीठातील एक रिसर्च स्कॉलर, विद्यार्थी युनियन चा नेता उमर खालिद ह्याला CAA कायध्याच्या विरोधात लोकांना भडकावणे, दंगे घडवून आणणे, देशद्रोही कृत्ये करणे इत्यादी अनेक गुन्ह्यात जेल झाली. दिल्ली हायकोर्टाने त्याला एका गुन्ह्यात जामीन दिला असला तरी इतर अनेक गुन्ह्यात जसे की खून करणाऱ्या व्यक्तीला आर्थिक मदत उपलब्ध करून देणे सारख्या घातक गुन्ह्यात अटक केल्यामूळे गेले ५ वर्ष तो तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. ( त्याचे पाठिंबा देणारे लोकांच्या मते सडत आहे ).


उमर खालिद च्या वकिलांचे म्हणणे आहे की त्याने दंगे, घडवून आणले, त्याने लोकांना भडकावले या संबंधि कोणताही पुरावा पोलिसांकडे नाही आणि त्याला टेररीस्ट म्हणून लागलेला शिक्का चुकीचा आहे. सरकार विरोधी मत प्रदर्शीत करणे गुन्हा नाही, नक्कीच नाही.


टेरेरिस्ट ची व्याख्या सांगते की आपण केलेल्या कृत्याने समाजामध्ये कायम भीती तयार  केली जात असेल तर ती व्यक्ती टेरेरिस्ट म्हणता येईल. खालिदच्या वकिलांच्या म्हणण्या नुसार जों चक्का जाम दिल्ली मध्ये झाला आणि त्यानंतर झालेल्या दंग्यात ५० लोक मृत्यू मुखी पडले त्यामध्ये उमरचा थेट हात नव्हता. जमिया विद्यापीठात झालेली भडकावू भाषणे उमरचा सहकारी शर्जीला इमाम यांनी केली होती. शर्जील इमाम ह्या विद्यार्थ्यास व्हाट्सअप ग्रुप करून विद्यार्थ्यांना भडकवण्याचे काम करण्यासाठी उमर ने उदयुक्त केले असे पोलिसांचे म्हणणे आहे.


पण लोकांना भडकवणे, पोलिसांविरुद्ध दंगे करायला लावणे, चक्का जाम करुन लोकांना वेठीस धरणे, दंग्या मूळे ५० लोकांच्या मृत्याला कारणीभूत होणे. हे सर्व गुन्हेनाहीत तर काय देवपूजा आहे?


हाफिज सैद हा पाकिस्थानी दहशतवादी,  दहशद पसरवण्याच्या उद्देशाने भारतात कसाब किंवा तत्सम टेरेरिस्ट पाठवतो. जेथे गुन्हा होतो तेथे तो कधीच हजर नसतो पण तो गुन्ह्याचा मास्टर माईंड असतो. तो गुन्हा घडवून आणतो. तो टेरेरिस्ट नाही का? गुन्ह्या त्याने केला नसेल पण गुन्हा घडवायला लागणारी वैचारिक रसद, साधन सामग्री आणि लॉजिस्टिक्स पुरवणे हा सुद्धा गुन्हाच आहे. 


उमर खालिदवरील सर्व खटले अजून संपलेले नाहीत. तो दोषी आहे की निर्दोष हे न्यायालय ठरवेल. आताच्या घडीला तो एक अंडर ट्रायल गुन्हेगार आहे. तरी त्याच्या आईने लिहिलेली भावनिक पोस्ट शेयर करून कोणीही त्याचे उदात्तीकरण करू नये असे वाटते. असे केल्यास सरकारच्या देशात शांतता, कायदा आणि सूव्यवस्था राखण्याच्या प्रयत्नात आपण बाधा आणत आहोत असेच समजायला हवे.



माधव भोळे


Saturday, July 19, 2025

बापूंच्या देशात!

 बापूंच्या देशात!


काल एक हेडलाईन वाचली "मद्य प्रेमी करतात १०,००० कोटींचा चकणा फस्त". वृत्त लेखक लिहिताना लिहितो की १० रुपयाच्या चकण्याच्या पाकिटाची व्याप्ती एव्हडी मोठी आहे की त्याची वार्षिक उलाढाल १०,००० कोटींची होते. अर्थात चकणा हा काही फक्त मद्यपीच खातात असे नाही पण बहूसंख्य मद्यपी वेगवेगळ्या कारणासाठी खूप चकणा खातात. 


सहज बघितले की जर चकण्याची उलाढाल रु. १०,००० कोटी असेल तर मद्याची उलाढाल किती असेल आणि आकडेवारी बघून चाट पडलो. 


भारतात ४.५ लाख कोटी एवढ्या रुपयाचे मद्य दरवर्षी विकले जाते. त्यातील ९०% हार्ड मद्य जसे की व्हिस्की वगैरे. अल्कोहोलिक बेवरेजेस खपामध्ये मध्ये भारताचा क्रमांक जगात तिसरा लागतो. भारताच्या रु. ३५० लाख कोटी GDP मध्ये मद्याचा वाटा १.२% एव्हडा आहे.


असे म्हणतात की पूर्वी लोक अज्ञानी होते, त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती, त्यांना वेगवेगळ्या समस्या होत्या म्हणून लोक दारू पियत पण आता लोक शिक्षित, उच्च शिक्षित झाले तर त्यांचे मद्य पिण्याचे प्रमाण वाढतच आहे. शिवाय हल्ली  कॉलेज आणि नोकरीं करणारे तरुण तरुणी सुद्धा जास्त प्रमाणात मद्य पितात.


फक्त गांधी जयंती आणि धार्मिक सणाच्या दिवशी दारू बंदी ठेवून शुस्क परिणाम होत आहे. दारू बंदी केली तर लोक गावठी, चोरटी दारू पियुन मरत आहेत, त्यावर उपाय काय? दारू पियुन लिव्हर खराब झाल्याचे प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे.


या मधील एक कारण म्हणजे स्वप्न आणि वास्तव यामधील अंतर भरून काढण्याची कला किंवा समज ज्या वेळी माणसाकडे येईल त्यावेळी दारू पिण्याचे प्रमाण कमी होईल.  जग आणि आपण सर्व एका रेस मध्ये धावत आहोत. मोठे होण्याचे, सर्वांच्या पुढे जाण्याचे स्वप्न पाहत आहोत त्यामुळे ताण, ब्लड प्रेशर, डायबिटीस, हार्टफेल सारख्या समस्या वाढतच आहेत. समस्या आणि ताण कोणाला चुकले आहेत पण मद्य हा त्यावर उपाय नाही.


ज्या वेळी अध्यात्म म्हणजे काय समजेल त्यावेळी दारू पिणाऱ्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल. या साठी नवनवीन पद्धतीने समाज प्रबोधन करण्याची गरज आहे. अध्यात्म म्हणजे नुसते देव, देवता, पुराण, वेद यांचे बोजड विश्लेषण नव्हे आणि नको पण समाधान प्राप्त होण्याचे साधे आणि सोपे उपाय हवेत. 


पण आजकाल कोण कोणाचे ऐकतो?


माधव भोळे

Thursday, July 17, 2025

पैसा फ़ंड काच कारखाना आणि चवे गावचे कै. अंताजी दामोदर काळे.

पैसा फ़ंड काच कारखाना आणि चवे गावचे कै. अंताजी दामोदर काळे.


महात्मा गांधींच्या स्वदेशी चळवळीच्या कितीतरी आधी म्हणजे ७ ऑगस्ट १९०५ रोजी लॉर्ड करझन यांनी अखलेल्या बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ कलकत्ता येथे सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बिपीनचंद्र पाल, लोकमान्य टिळक आणि लाला लाजपत राय सारख्या मान्यवर नेत्यांनी ती कलकट्टा येथे सुरू केली.


त्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्रात रत्नागिरी येथील चवे गावचे अंताजी दामोदर काळे यांनी बाळ गंगाधर टिळक यांचे समोर एक प्रस्ताव मांडला की आपल्यासारख्या शेतीप्रधान देशात नुसते स्वदेशी चळवळ करून चालणार नाही तर त्यासाठी स्वतःची कारखानदारी आवश्यक आहे आणि ती करण्यासाठी आपण भांडवल गोळा केले पाहिजे तरी आपण केसरी मध्ये अग्रलेख लिहून तसें भांडवल तयार करण्यासाठी आवाहन करा. 


टिळकानी स्पष्ट सांगितले की अशी कामे अग्रलेख लिहून होत नाहीत. त्यासाठी तुम्हांला शेतकऱ्यांच्या दारोदारी जाऊन आपण काय करणार आहोत त्याचा आराखडा लोकांना समजावले पाहिजे. जर लोकांना त्यात तथ्य वाटले तर लोक आपल्याला पैसे देतील. 


ह्या कल्पनेतून तयार झाला तळेगांव, पुणे येथील पैसा फ़ंड काच कारखाना. ह्या साठी अंताजी काळे आणि त्यांचे सहकारी यांनी शेतकऱ्यांच्या दारोदारी जाऊन पै पै जमवून हा कारखाना उभा केला.


पण खरी गोम होती ती तंत्रज्ञानाची. त्यावेळी भारतात काच बनत नव्हती. अलिगड येथे जन्मलेला एक देशभक्त तरुण ईश्वर दास वर्षणेयी ह्याने हे काम पूर्ण केले. हा जपान येथे साखर कारखान्याचे तंत्रज्ञान शिकण्यासाठी गेला होता. त्या दरम्यान वागळे नावाच्या एका सदगृहस्थाने "इंडियन पिपल" ह्या मासिकात एक लेख लिहिला होता की भारतात काच बनवणे अशक्य आहे. तो लेख वाचून ईश्वर दास च्या मनात जिद्ध निर्माण झाली. त्याने साखर कारखान्यांचा अभ्यास सोडून दिला आणि जपान आणि अमेरिकेतील MIT मध्ये ग्लास टेक्नॉलॉजी वर कोर्स पूर्ण केला आणि तो भारतात आला. त्याने ह्या पैसा फ़ंड काच कारखान्याला तंत्रज्ञान दिले. १९०८ मध्ये असा राहिला उभा पैसा फ़ंड काच कारखाना.



कारखान्याने सुरुवातीला विविध प्रकारच्या काचेच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केले, ज्यात रेल्वे सिग्नल लेन्स आणि राउंडल्समध्ये वापरल्या गेलेल्यांचा समावेश होता आणि पहिल्या महायुद्धादरम्यान भारताच्या काचेच्या मागणीची पूर्तता करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

पुढे ह्याच संस्थेने स्वदेशी शिक्षणासाठी तळेगाव दाभाडे येथे पैसा फ़ंड शाळा काढली.


आपल्या ज्ञातीतील कै. अंताजी दामोदर काळे सारख्या दूरदृष्टी असलेल्या धुरीणांचा तसेच देशभक्त ईश्वर दास वर्षणेयी आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना मीं आदरपूर्वक नमस्कार करतो.


माधव भोळे 


Monday, July 7, 2025

शेवट फक्त मृत्यू प्रमाणपत्र रहाते **🤣🤣

शेवट फक्त मृत्यू प्रमाणपत्र रहाते **🤣🤣


एक निवृत्त पोलीस आयुक्त आपल्या शासकीय निवासस्थानातून वसाहतीतील स्वतःच्या घरी राहायला गेला. त्याला स्वतःचा खूप अभिमान होता.

त्या कॉलनीतल्या उद्यानात रोज संध्याकाळी फिरायला गेल्यावर तो तिथे कोणाशीही बोलत नसे किंवा त्यांच्याकडे ढुंकूनही पहात नसे. ते आपल्या दर्जाचे नाहीत असे त्याला वाटले.


एके दिवशी तो उद्यानात एका बाकावर बसला असताना आणखी एक म्हातारा आला आणि त्याच्या शेजारी बसला आणि त्यांनी अधिकाऱ्याशी संभाषण सुरू केले.


या माणसाने समोरची व्यक्ती काय बोलत आहे याकडे लक्ष दिले नाही, तर फक्त स्वतःची नोकरी, दर्जा आणि मोठेपणा याबद्दल बोलले. त्यांच्यासारख्या उच्चपदस्थ व्यक्तीचे स्वतःचे घर या वसाहतीत असल्याने ते येथे राहत असल्याचे सांगायचे.


असे काही दिवस चालू राहिले. फक्त म्हातारा धीराने ऐकत होता. एक दिवस म्हातारा बोलू लागला. "पहा कमिशनर साहेब, विजेचे बल्ब निकामी होत नाही तोपर्यंत त्यांचे वॉटेज तेवढेच असते, ते जळून गेल्यावर सर्व काही सारखेच असते." त्याचे रूप, त्यांनी दिलेला प्रकाश, सर्व काही लपलेले असते.


मी या वसाहतीत पाच वर्षांपासून रहातो आहे, *मी दोनदा खासदार म्हणून काम केले आहे हे मी कोणालाही सांगितले नाही.


हे ऐकल्यावर गर्विष्ठ निवृत्त आयुक्तांचा चेहरा बदलला.

म्हातारा पुढे बोलू लागला. "तुमच्या उजवीकडे दूरवर बसलेले *वर्मा* आहेत, ज्यांनी भारतीय रेल्वेत महाव्यवस्थापक म्हणून काम केले होते आणि निवृत्त झाले. त्यांच्यासमोर उभे राहून हसतमुखाने बोलत होते, *राव*, जे लष्करात लेफ्टनंट जनरल म्हणून निवृत्त झाले आहेत. त्या कोपऱ्यात, *शिवा*, जो पांढराशुभ्र होता, त्याने ISRO चे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांनी कोणालाही सांगितले नाही. मला जे माहीत आहे ते मी सांगतोय."


 "मी आधी असे म्हटले की सर्व जळालेले (निकामी ) बल्ब एकाच गटाचे आहेत. शून्य, 10, 20, 40, 60, 100 वॅटचे बल्ब असो, ते जळत नाही तोपर्यंतच त्यांची किंमत असते. फ्यूज उडल्यानंतर आणि जळल्यानंतर, त्यांचे वॅटेज, ते उत्सर्जित होणारा प्रकाश निरुपयोगी असतो. जळल्यानंतर ( उडल्या नंतर ) ते सामान्य ट्यूबलाइट, एलईडी बल्ब आहेत. हॅलोजन, सजावटीचे बल्ब.. ते जे काही आहेत ते सर्व समान आहेत.


म्हणून, तुमच्यासारखेच amcheb सर्व बल्ब जळून खाक आहोत. निवृत्ती नंतर, पोलीस आयुक्त, पोलिस कॉन्स्टेबल हे सर्व एकाच लेव्हल ला येतात.


उगवणारा सूर्य आणि मावळणारा सूर्य तितकाच सुंदर दिसतो पण प्रत्येकजण उगवत्या सूर्याला नतमस्तक होतो, त्याची पूजा करतो. मावळत्या सूर्याला नाही! हे वास्तव आपण ओळखले पाहिजे.*


*आपण हे समजून घेतले पाहिजे की आपण करत असलेली नोकरी आणि दर्जा कायमस्वरूपी नाही. जर आपण त्यांची कदर केली आणि विचार केला की ते आपले जीवन आहेत, तर आपण हे सत्य ओळखले पाहिजे की एक दिवस ते आपल्याला सोडून जाईल.


*बुद्धिबळाच्या खेळात राजा, राणी, मंत्री, प्यादे त्यांची मूल्ये फक्त चेसबोर्डवर आहेत तोपर्यंतच आहेत. खेळ संपल्यानंतर, आम्ही त्या सर्वांनां एका बॉक्समध्ये ठेवतो आणि झाकण बंद करतो.*


*आज मी आनंदी आहे असे वाटते,* *भविष्यातही आनंदी राहीन अशी आशा आहे...*


आयुष्यात कितीही पदके, प्रमाणपत्रे मिळाली तरी एक प्रमाणपत्र सगळ्यांनाच मिळतं. ते म्हणजे *मृत्यू प्रमाणपत्र...*

✒️🤔🤔🤔🤔🤔

**

लेखक अज्ञात 

रवींद्र दातार यांच्या भिंतीवरून इंग्रजी चे मराठी भाषांतर केले 

माधव भोळे