उमर खालिदचे उदात्ती करणं नको!
नुकतेच उमरची आई उमरला भेटायला तिहार जेल मध्ये गेल्या नंतर तिच्या मनात झालेली घालमेल मराठी मध्ये अनुवाद करून काही लोक हेतू पुरस्सर फेसबुक वर पाठवत आहेत. तिच्या मते उमरला ह्या प्रकरणात उगाचच ओढले गेले आहे. माझा उमर टेरेरिस्ट नाही आणि तो देशद्रोही नाही. सरकारच्या विरुद्ध मतप्रदर्शन करणे गुन्हा नाही. एक आई म्हणून प्रत्येक स्त्रीला आपले मूल निर्दोष वाटणे स्वाभाविकच आहे.
११ डिसेंबर २०१९ साली संसदेमध्ये CAA चा कायदा पास झाल्यानंतर दिल्ली मध्ये जवाहर लाल नेहरू विद्यापीठातील एक रिसर्च स्कॉलर, विद्यार्थी युनियन चा नेता उमर खालिद ह्याला CAA कायध्याच्या विरोधात लोकांना भडकावणे, दंगे घडवून आणणे, देशद्रोही कृत्ये करणे इत्यादी अनेक गुन्ह्यात जेल झाली. दिल्ली हायकोर्टाने त्याला एका गुन्ह्यात जामीन दिला असला तरी इतर अनेक गुन्ह्यात जसे की खून करणाऱ्या व्यक्तीला आर्थिक मदत उपलब्ध करून देणे सारख्या घातक गुन्ह्यात अटक केल्यामूळे गेले ५ वर्ष तो तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. ( त्याचे पाठिंबा देणारे लोकांच्या मते सडत आहे ).
उमर खालिद च्या वकिलांचे म्हणणे आहे की त्याने दंगे, घडवून आणले, त्याने लोकांना भडकावले या संबंधि कोणताही पुरावा पोलिसांकडे नाही आणि त्याला टेररीस्ट म्हणून लागलेला शिक्का चुकीचा आहे. सरकार विरोधी मत प्रदर्शीत करणे गुन्हा नाही, नक्कीच नाही.
टेरेरिस्ट ची व्याख्या सांगते की आपण केलेल्या कृत्याने समाजामध्ये कायम भीती तयार केली जात असेल तर ती व्यक्ती टेरेरिस्ट म्हणता येईल. खालिदच्या वकिलांच्या म्हणण्या नुसार जों चक्का जाम दिल्ली मध्ये झाला आणि त्यानंतर झालेल्या दंग्यात ५० लोक मृत्यू मुखी पडले त्यामध्ये उमरचा थेट हात नव्हता. जमिया विद्यापीठात झालेली भडकावू भाषणे उमरचा सहकारी शर्जीला इमाम यांनी केली होती. शर्जील इमाम ह्या विद्यार्थ्यास व्हाट्सअप ग्रुप करून विद्यार्थ्यांना भडकवण्याचे काम करण्यासाठी उमर ने उदयुक्त केले असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पण लोकांना भडकवणे, पोलिसांविरुद्ध दंगे करायला लावणे, चक्का जाम करुन लोकांना वेठीस धरणे, दंग्या मूळे ५० लोकांच्या मृत्याला कारणीभूत होणे. हे सर्व गुन्हेनाहीत तर काय देवपूजा आहे?
हाफिज सैद हा पाकिस्थानी दहशतवादी, दहशद पसरवण्याच्या उद्देशाने भारतात कसाब किंवा तत्सम टेरेरिस्ट पाठवतो. जेथे गुन्हा होतो तेथे तो कधीच हजर नसतो पण तो गुन्ह्याचा मास्टर माईंड असतो. तो गुन्हा घडवून आणतो. तो टेरेरिस्ट नाही का? गुन्ह्या त्याने केला नसेल पण गुन्हा घडवायला लागणारी वैचारिक रसद, साधन सामग्री आणि लॉजिस्टिक्स पुरवणे हा सुद्धा गुन्हाच आहे.
उमर खालिदवरील सर्व खटले अजून संपलेले नाहीत. तो दोषी आहे की निर्दोष हे न्यायालय ठरवेल. आताच्या घडीला तो एक अंडर ट्रायल गुन्हेगार आहे. तरी त्याच्या आईने लिहिलेली भावनिक पोस्ट शेयर करून कोणीही त्याचे उदात्तीकरण करू नये असे वाटते. असे केल्यास सरकारच्या देशात शांतता, कायदा आणि सूव्यवस्था राखण्याच्या प्रयत्नात आपण बाधा आणत आहोत असेच समजायला हवे.
माधव भोळे
No comments:
Post a Comment