पुण्या मुंबईच्या मंडळींना कोकणात घर असावे किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून रत्नागिरी किंवा रायगड जिल्ह्यात जमीन घ्यायची खूप इच्छा असते. गणपतीपुळे, आरे वारे चा समुद्र, जयगड चा किल्ला, अशी सुंदर वर्णन करून रियल इस्टेट दलाल ती जमीन विकायचा फार चांगला प्रयत्न करतात. शिवाय रेडी रेकनर मधील भाव सुद्धा महसूल वाढवण्यासाठी बरेच चढे लावून ठेवले आहेत.
एखादी मोक्याची व्यवसायास उपयुक्त राज्य रस्त्यालगतची जागा 4 ते 6 लाख रुपये गुंठा विकली गेली म्हणजे गावातील सर्वच जागा त्या किमतीच्या असतील असे नाही. पण दलाल मंडळी तेच भाव सांगून जमीन विकणाऱ्याला आणि विकत घेणाऱ्याला हवेत नेऊन सोडतात. त्यात जरी निगोषीयेशन होणार असले तरी त्यात काही मर्यादा येतात.
मुळातच रत्नागिरी शहरातील एन ए किंवा शेत जमिनीचे भाव आणि निवळी ते गणपती पुळे किंवा पुढे जयगड पर्यंत चे जमिनीचे भाव यात जमीन अस्मानाचा फरक आहे. परत गणपतीपुळे, मालगुंड, आणि जवळपासच्या 5 किलोमीटर परिसरातील भाग जो पर्यटन क्षेत्र मानला जातो त्या ठिकाणी अर्थातच भाव जास्त असणार जागेच्या लोकेशन आणि उपयुक्तता या प्रमाणे. पण तरी सुद्धा उरलेल्या भागात राज्य रस्त्याला लागून भाव 2 ते 2.5 गुंठा, आत गावात जाताना च्या रोडवरील भाव 1 ते 2 लाख गुंठा, जागा हाय वे पासून किती लांब आहेत त्यावर आणि गाडी किंवा एसटी च्या रस्त्यापासून किती लांब आहे या वर अवलंबून आहे. कित्येक ठिकाणी एखादे चिट पाखरू सुद्धा दिसत नाही अशावेळी तुम्ही घर बांधून राहू शकाल का हा सुद्धा विचार करायला हवा?
एखादी जमीन किंवा बंगला, फ्लॅट विकत घेताना तो विकायची वेळ आली तर विकला जायला किती कष्ट पडतील याचा विचार आधी करायला हवा. आपण 55 च्या पुढे असल्यास आपली पुढील पिढी येथे लक्ष देणार का याचा विचार करा.
गेल्या 15 वर्षात साधारण पणे 2005 साली जिंदाल, आणि काही कँपन्यांची स्थापना जयगड विभागात झाली. त्यानंतर गेल्या 15 वर्षात कोणतेही नवीन प्रकल्प तेथे आले नाहीत. तेथे होणारी नोकर भरती कंत्राटी असल्यामुळे तेथील लोक नवीन जागा घेऊन घरे बांधून आपली जमीन जास्त भावाला विकली जाईल असेही नाही.
आमचे एक मित्र आहेत त्यानी खूप जमीन तेथे घेऊन ठेवली आहे परंतु 8 ते 10 प्लॉट ओळखीच्या मंडळीत विकले गेले, पुढे ठप्प.
तेव्हा त्या भागात खरेदी करताना प्रथम आपल्या तेथील नातेवाईकांकडे चौकशी करा, जागेवर कमीत कमी तीन वेळा फेऱ्या मारा पैकी 2 वेळा एजंट नसताना, तेथील स्थानिक व्यक्तीला पकडून तेथील माहिती घ्या. आणि मगच व्यवहार करा. पटले तर घ्या नाहीतर सोडून दया.
माधव भोळे
No comments:
Post a Comment