निश्चयाचा महामेरू - आनंद बनसोडे
आनंद बनसोडे हे नांव तुम्ही कदाचित ऐकले ही असेल.
प्रबळ ईच्छाशक्ती, घोर मेहनत, साहसी वृत्ती, नवनवीन आव्हाने स्वीकारण्याची आणि अडचणीनवर मात करण्याची तयारी आणि या सर्वांचा उपयोग आपल्या आयुष्यात करण्यासाठी लागणारे व्यवहारज्ञान याचे सुंदर मिश्रण म्हणजे आनंद बनसोडे.
सोलापूर मधील एका अतिशय सामान्य घरात जन्मलेल्या आनंद बनसोडेला जन्मा पासूनच बोलण्यातील तोतरे पणा (Rhotacism)आणि शिक्षणातील लिहिता वाचता येण्यामधील अडचणी (dyslexia) होत्या. त्यामुळे बुद्धी असूनही तो शिक्षणात मागे पडला. शाळेत बोलताना त्याच्यावर अनेकजण हसत असत त्यामुळे तो एकलकोंडा असे. त्यात तो 9वी नापासही झाला. नापास होऊनही पुढे पुन्हा 9 वी व पुढील शिक्षण सुरु ठेवले.
अनेक अपमानातून जगण्यासाठी लहानपणीचे त्याचे स्वप्न होते, 'जगाच्या सर्वोच्च उंचीवर जायचे'. 12 वी नंतर गिर्यारोहणा मध्ये आनंद मिळू लागला. त्यानंतर तो घरचा विरोध पत्करून वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेक व गिर्यारोहाणाच्या कोर्सेसला जात असे.
दिनांक १९ मे २०१२ रोजी त्याने एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. शारीरिक आणि मानसिक तयारीचा तो कसोटीचा क्षण होता. एका बाजूला तो पुण्यात शिकत होता आणि दुसऱ्या बाजूला तो जगातील अत्यूच्चं शिखरांवर गिर्यारोहणाच्या चढाया यशस्वी करीत होता. भयानक थंडी असताना सुद्धा एव्हरेस्ट कॅम्प २ वर गिटार वाजवण्या पासून ते चारही खंडातील उंचच उंच गगन चुंबी शिखरे पादाक्रांत करण्याचे रेकॉर्ड्स त्यांनी गाजवले आहेत. Guinness Book of रेकॉर्ड्स , Limca Book of रेकॉर्ड्स , India Book of रेकॉर्ड्स , and High Range Book of रेकॉर्ड्स ह्या चारही पुस्तकात त्याच्या नांवे वेगवेगळे रेकॉर्ड्स नमूद आहेत.
त्यानंतर २०१५ साली अमेरिकेतील अलास्का येथे देनाली ह्या शिखरावर चढाई करीत असताना त्याला त्याच्या वडिलांच्या दुःखद निधनाची बातमी समजली आणि ती चढाई त्याला अर्धवट सोडून द्यायला भाग पडले. म्हणतात ना दुःख आली की चहूं बाजूनी येतात तसेच झाले. २०१५ मध्येच एक दिवस अचानक त्याच्या मणक्याला इंज्यूरी झाली आणि तो अंथरुणात खिळून राहिला. त्याच्या डॉक्टरनी त्याला सांगितले की कदाचित तो आयुष्यात परत कधीच चालू शकणार नाही. परंतु आनंदचे मन ते मानायला तयार नव्हते. महिनानुमहिने अतिशय परिश्रमपूर्वक फिजियोथेरपी, व्यायाम आणि विश्रांती ह्यांच्या साहाय्याने त्या अडचणीनवर मात करत त्याने गाडी परत पूर्व पदावर आणली. यात सर्वात मोठी साथ दिली त्याच्या घरच्यांनी व त्याची त्यावेळची मैत्रीण व सध्याची बायको अक्षया हिने. वडिलांच्या निधनानंतर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. वडिलांचे निधन व त्यात कोणतेही आर्थिक उत्पन्नाचे स्रोत नव्हते. आनंदच्या सर्व हालचालीवर मर्यादा आल्या होत्या.
अशातच 26 जानेवारी 2016 रोजी अक्षया व आनंद यांनी कोणतीही शास्वती नसताना फक्त प्रेमावर विश्वास ठेवून विवाह केला. घर चालवण्यासाठी आर्थिक बळ पाहिजे हे त्यांनी जाणले. त्यात २०१६ मध्ये त्याच्या पत्नीने एका क्लासेसमध्ये शिकवायला सुरवात केली पण अवघ्या १२ दिवसातच तिला नोकरीवरून काढले. त्यानंतर स्वतःचे "अक्षय्य क्लासेस" या नावाने क्लासेस सुरु करून अक्षयाने कुटुंबास आधार दिला.
तो म्हणतो की त्या अडचणीच्या काळात त्याला अनेक परिचित आणि अपरिचित लोकांनी खूप मदत केली आणि त्यामुळे काम्युनिटी सपोर्ट चे महत्व त्याला माहिती झाले.
गिर्यारोहणाच्या अनुभवामुळे कमीतकमी सुखसोयी आणि जास्तीतजास्त मानसिक तणावात काम करण्याची त्याला सवय झाली.
आर्थिक स्थिरता आणण्यासाठी त्याने आपला छंद हाच आपला व्यवसाय करण्याचे ठरवले. सन २०१७ मध्ये त्याने 360 Explorer LLP हे ऍडव्हेंचर टुरिसमची (साहसी पर्यटन) कंपनी सुरू केली. ह्या कंपनीतर्फे तो जगभरामध्ये वेगवेगळ्या साहसी टूर, गिर्यारोहण, ट्रेकिंग आयोजन करतो. शिवाय एंटरप्रिनरशिप, बिझिनेस कोचं ह्या विषयावर तो ट्रेनिंग देतो. जगभरातील ३,००,००० विध्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयात त्याने ट्रेनिंग दिले आहे. 2024 पर्यंत त्याने America आणि कॅनडा मध्ये वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून तेथील नागरिकांना तो साहसी पर्यटन, साहसी गिर्यारोहण इत्यादी विषयात सेवा पुरवतो. त्याच्या 360 Explorer LLP ह्या कंपनीला सिलिकॉन व्हॅली मधील ऍक्सिलरेटर प्रोग्राम मध्ये मान्यता मिळाली आहे. डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट असणाऱ्या आनंदने अनेकांना याची सेवाही पुरवली आहे व अनेकांना स्टार्टअप कोचिंग केली आहे.
त्याने आतापर्यंत ५ प्रेरणादायी पुस्तके लिहिली असून तो फिजिक्स मध्ये पीएच डी करत आहे. २०१७ मध्ये न्यू यॉर्क मधील युनायटेड नेशन्सचे headquarter मध्ये त्याचे भाषण झाले आहे. युनायटेड नेशन्स च्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बरोबर तो ऍडव्हन्चर टुरिसम मध्ये काम करत आहे. एके काळी ९ वी मध्ये तो फेल झाला होता पण आज त्याच्या आयुष्यावर ९ वी इयत्तेच्या पुस्तकात हिंदी प्रथम भाषेत धडा आहे.
उद्योजगता, चिकाटी आणि लवचिकता हे त्याच्या यशाचे गमक आहे असे म्हणायला हरकत नाही.
माधव भोळे
No comments:
Post a Comment