काश्मीर आणि काश्मिरी उत्पादनावर बहिष्कार घाला!!
काल पेहेलगाम येथे पर्यटनासाठी आलेल्या २८ हिंदू पर्यटकांची क्रूर हत्या करण्यात आली. हत्या करताना प्रत्येक व्यक्तीला त्याचा धर्म विचारून त्याला गोळया घातल्या गेल्या असे म्हणतात.
काश्मीर मध्ये ऑक्टोबर २०२१ मध्ये मीं प्रत्यक्ष गेलो असता तेथील जनतेशी संवाद साधण्याचा योग आला. मुस्लिम बहुल्य असलेली ही जनता १९४७ च्या काश्मीरचे भारताशी झालेले विलीनकरण ह्या मुद्यावर अडून बसली आहे. त्यांना अजूनही स्वतंत्र काश्मीर, कश्मिरीयत ( काश्मीरची संस्कृती ) आणि काश्मीरचे भौगोलिक स्थान याचा अभिमान आहे. भारताबरोबर झालेले विलीनकरण त्यांना मनःपूर्वक मान्य नाही. त्यांच्या तरुणांशी बोलताना असे लक्षात येते की त्यांच्या मते त्यांना भारताची गरज नाही आणि त्यांना शेख अब्दुलाने अपेक्षिलेला स्वतंत्र काश्मीर हवा आहे जों गिळायला पाकिस्तान टपलेली आहे.
काश्मीरच्या भौगोलिक स्थानामुळे आणि काश्मीर मधील राजकीय आणि सामाजिक प्रश्नांमुळे, गेले कित्येक वर्ष काश्मीरमध्ये मिलिटरीचे साम्राज्य आहे. स्थानिक नेते पाकिस्तान आणि टेररिस्ट लोकांची भाषा बोलतात. त्यांचा बोलवीचा धनी पाकिस्तान आहे.
आम्ही तेथे विविध ठिकाणी गेलो असता जागोजागी मिलिटरीचा पहारा होता. पर्यटक गाड्यांची आणि इतर वाहनांची कसून चौकशी होत असते. त्या दिवशी अमित शहा तेथे येणार होते तेव्हा प्रत्येक ८ फुटावर आणि घरांच्या छपरांवर मिलिटरीचा बंदूकधारी उभा होता. ते दृश्य बघितल्यावरच काय समजायचे ते समजलो.
जम्मू आणि काश्मीर मध्ये गेल्या वर्षी २.३६ कोटी पर्यटक आले होते तर नुसत्या काश्मीर मध्ये ३४.९८ लाख टुरिस्ट आले होते. एकट्या काश्मीर मध्ये ८००० कोटी रुपयांचा पर्यटन व्यवसाय झाला.
भारतातील पर्यटक काश्मीर मध्ये येत असल्यामुळे आणि स्थानक व्यापाऱ्यांचे पोट पर्यटन व्यसायावर अवलंबुन असल्यामुळे, गेले १० /१५ वर्ष दहशदवादि आणि स्थानिक व्यापारी यांच्यात एक अलिखित करार होता की पर्यटकांवर गोळ्या झाडायच्या नाहीत त्यामुळे पर्यटकांवर दहशदवादी हल्ले कमी झाले होते, पण काल त्या दहशदवाद्यानी माणुसकीचे सर्व संकेत तोडले आणि पर्यटकांवर हल्ला केला.
आपण काश्मीर बघायला जातो म्हणजे काश्मीरची बर्फअच्छादित हिमालयाची शिखरे बघायला जातो, तेथील सृष्टी सौंदर्य आणि मोठ मोठाले शाही बगीचे आणि दाल लेक मध्ये फेर फटका मारायला जातो, घोड्यावर बसून फोटो काढायला जातो. अर्थात यातील सर्व गोष्टी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दर्जिलिंग, कलिंमपॉंग, आसाम, मेघालंय या ठिकाणी बघायला मिळतात. मग काश्मीरच कशाला हवा. आपल्या पर्यटन कंपन्यानी नवीन पर्यटन सर्किट शोधावीत म्हणजे त्यांचे नुकसान होणार नाही आणि पर्यटकांना पर्याय उपलब्ध होतील.
या पुढे काश्मीर पर्यटनावर बहिष्कार घालणेच योग्य. त्यांच्या आर्थिक नाड्या जेथपर्यंत आवळल्या जातं नाहीत तेथपर्यंत हा हैदोस थांबणार नाही. पर्यटनाद्वारे अप्रत्यक्ष रित्या आपण त्यांच्या कारवायाना बळच देत आहोत. ते थांबायला हवे. तसेच सौरक्षण दृष्ट्या आवश्यक नसलेला काश्मीरच्या विकासावर भारताने खर्च कमी करावा जेणेकरून भारताबरोबर न राहिल्याचे तोटे त्यांना उमगतील.
हे सुधारणार नाहीत मग आपण तरी सुधारूया.
माधव भोळे