दीनानाथ मंगेशकर रुंग्णालय आणि जातीय समीकरणे.
आज काल कुठल्याही वादाला जातीय समीकरणाशी जोडून ब्राह्मण विरुद्ध अब्राह्मण किंवा हिंदू विरुद्ध अहिंदु असा कापोल कल्पित वाद तयार केला जातो आणि त्यात आपण आपापल्या अस्मिता राखण्यासाठी फुकट प्रयत्न करतो.
दीनानाथ मंगेशकर रुंग्णालयातील झालेली दुर्दैवी घटना म्हणजे ब्राह्मण बहुल्य रुंग्णालय प्रशासन असल्यामुळे त्यांच्यावर टिकेची झोड उठली जातं आहे आणि त्यांना इतर ब्राह्मण मंडळींनी पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा काही ब्राह्मण मंडळी करीत आहेत.
प्रथम येथे स्पष्ट करू इच्छितो की डॉक्टरी व्यवसाय हा एक शिक्षित पेशा असून त्याच्यात काही एथिक्स आणि काही कायदे लागू आहेत. तसेच ते धर्मादाय रुंग्णालय असल्यामुळे त्यांना इतर उत्तरदायित्वे सुद्धा आहेत जीं पार पडल्याची शहानिशा सरकारी आयोग, महिला आयोग आणि पोलीस करीत आहेत. त्यामुळे ही कायद्याची चौकट कोणा विशिष्ट ज्ञातीसाठी तयार झालेली नसून ती त्या व्यवसायातील सर्व व्यक्तींना लागू आहे. जर ते व्यवसायिक दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी आणि ते दोषी नसतील तर ते आपोआप सुटतील. येथे कोण कोणत्या ज्ञातीचा आहे हा प्रश्नच नाही, मीडिया फक्त आगी लावत आहे.
आणखी एक गोष्ट म्हणजे मंगेशकर रुंग्णालयातील ब्राह्मण डॉक्टर्स, ब्राह्मण समाजातील सर्व डॉक्टर्सचे प्रतिनिधित्व करत नाहीत. डॉक्टरांनी आपली कर्तव्य कायद्याला आणि व्यवसायिक नीतिमत्तेला ( प्रोफेशनल एथिक्स ) धरून पार पाडली असतील तर त्यांना कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. उगाचच जातीय ढोल बडवत बसून आपल्या चुकांवर पांघरूण घालण्याचा चुकीचा प्रयत्न करू नये.
माधव भोळे
No comments:
Post a Comment