Tuesday, April 8, 2025

ट्रम्प विरुद्ध चीन, एक तर्फे, टारिफ युद्ध आणि तारीफ करण्यास चीन पात्र.

ट्रम्प विरुद्ध चीन, एक तर्फे, टारिफ युद्ध आणि तारीफ करण्यास चीन पात्र.


काल चीन चा CSI 300 शेयर बाजार इंडेक्स ७.३% ने खाली आला तर हॉंगकॉंग चा Hangseng Index १३% नी खाली आला होता परंतु चिनच्या प्रशासनाने व्यापार उदिमाच्या झालेल्या घटीसाठी कमी व्याजदराचे लोन देण्याचे आश्वासन दिल्यामुळे यात थोडी वाढ़ झाली. 


चिनच्या मते अमेरिकेने दोन्ही देशातील व्यापार संबंधात एक तर्फी टारीफ युद्ध छेडले असून चीन अशा प्रकारच्या धमक्याना घाबरत नाही. ती हे मान्य करते की या आधी सुद्धा आमच्यावर असे टारिफ युद्ध लादले गेले परंतु त्यांच्या मते जेव्हडा दबाव तुम्ही आमच्यावर आणाल तेव्हढे आम्ही जास्त सक्षम होऊ आणि आम्ही दबावाखाली झुकणार नाही. 


काय खरोखरचं चीन एव्हडी सक्षम आहे का? की या महापुरात ती डुबून जाणार?


चीन आणि अमेरिका यांच्या मध्ये द्विपक्षीय व्यापार: अमेरिका चीन कडून ४३२.९ बिलीयन डॉलर एव्हडा माल आणि सेवा विकत घेते तर चीन अमेरिकेकडुन १६५.१६ बिलीयन डॉलर माल आणि सेवा विकत घेते. त्या मुळे त्यांच्यात २६७.७४ बिलीयन डॉलर्स एव्हडी तफावत आहे. 


ह्या आकडेवारी वरून ह्या टारीफ युद्धाचा पहिला आणि मोठा फटका अमेरिकेतील गोर गरिबांना बसणार आहे कारण अमेरिकेतील सुपर मार्केट जे चिनकडून विविध गृहपयोगी सामान, अवजारे, जीवनावश्यक लागणाऱ्या वस्तू, इत्यादी अतिशय स्वस्तात विकत घेतात आणि सेल लावून विकतात त्यावर आता जास्तीतजास्त कर लागल्यामुळे ते महाग होणार आणि त्याचा थेट परिणाम अमेरिकन जीवनमानावर पडणार आहे.

अमेरिकेतील कोणत्याही सुपर मार्केटमध्ये १०० पैकी ७० ते ८०% प्रोडक्ट्स चिनी असतात. 


आधीच ट्रम्पने तेथील सरकारी नोकऱ्यामध्ये कपात केल्यामुळे आणि नंतर ह्या अस्थिर इकोनॉमिचा परिणाम अमेरिकेतील इतर नोकऱ्यांवर होणार असल्यामुळे अमेरिकेत बेकारी आणि महागाई, दोन्ही वाढणार आहे. 


८ मार्च १९७८ ते १७ जून १९८३ ह्या कालावधीत डेंग झियाओपिंग ह्या उदारमत वादी कम्युनिस्ट नेत्याने चीनला माओतसें तुंग च्या कम्युनिस्ट विचारातून बाहेर काढून भांडवलशाहीचा पुरस्कार करत चीनला एक सक्षम उत्पादक देश बनवला आहे. त्यामुळे गेल्या ४७ वर्षात चीन एक अतिशय मजबूत अर्थ व्यवस्था बनली आहे. चीन एव्हडा स्वस्त माल जगात कोणीच देऊ शकत नाही. आपला स्वस्त माल विकून चिनने संपूर्ण जगाला आपल्यावर अवलंबून राहण्यास भाग पाडले आहे. चीन मधील कामगार अतिशय कष्टाळू आहेत, राजकीय व्यवस्था व्यवसायिकांना पूरक आहे, शास्त्रज्ञ् कमीतकमी खर्चात संशोधने करुन नवनवीन शोध लावत असून त्या संशोधनाचा उपयोग चांगली टिकावू आणि स्वस्त उत्पादने करण्यात करत आहेत. त्यामुळे चीनी व्यापार, सर्व सामान्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यात यशस्वी होत आहेत. त्या मुळे चीनला खात्री आहे की आमच्या शिवाय सर्व जगाचे पान अडणार आहे आणि म्हणूनच चीन अमेरिकेच्या दडपशाही विरुद्ध घट्ट पाय रोवून उभा आहे हे नक्की. 


भारताने चीन वर बहिष्कार घालण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला परंतु राष्ट्रीय प्रेम नसल्यामुळे 33 कोटी देवतांसाठी लागणाऱ्या रांगोळी पासून, पणत्या, आकाश कंदील, गणपतीच्या मूर्ती सुद्धा भारतात चीन कडुन येत आहेत. भारतातील १० पैकी ८ मोबाईल चीन बनवते तर मार्केटमध्ये असलेल्या होम अपलायन्सेस मधील ९०% पार्टस चीन कडुन आयात होतात. अगदी, सध्या जे बोगदा खणणारे ड्रीलिंग मशीन सर्वत्र वापरले जातं आहेत ती युरोप किंवा चीन मधील आहेत. आई टी सेवा सोडून सर्वच क्षेत्रात चीन भारतात एक्स्पोर्ट करते. चीन भारताकडून १६.६७ बिलीयन डॉलर चा माल आणि सेवा विकत घेते तर भारत चिनकडुन १०२ बिलीयन डॉलर्स चा माल आणि सेवा विकत घेत आहे या वरून तुम्हांला कळलेच असेल.


माधव भोळे

No comments:

Post a Comment