घातक खेळी
आज सुजित भोगले यांचा लेख वाचला. कळव्याचे सर्वेसर्वा जितूद्दीन आव्हाड यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष बनवण्यासाठी भाजपच्या आशिष शेलारांनी दिलेला पाठिंबा हे अजित पवार आणि एकनाथजी शिंदे यांचे पंख छाटण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेली एक चाल आहे हे उघड आहे.
ज्या उद्धव ठाकरेंनी बंद खोलीत आश्वासन दिले ते पाळले नाही म्हणत २० वर्ष एकत्र काम केलेलेल्या भाजपची साथ सोडली आणि उबाठा काँग्रेसच्या वळचणीला गेली त्याला नमोहरम करण्यासाठी शिंदे आणि अजित पवारांच्या कुबड्या देवेंद्रजिनां घ्यायला लागल्या तेच शिंदे आणि पवार आता त्यांना डोईजड व्हायला लागले म्हणून ही खेळी आपण खेळत आहात.
कालच बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्षपद सुद्धा आपण उद्धव ठाकरे यांना बहाल केलेत. पण चिखलात खेळलेल्या राजकारणामध्ये सर्वच रुतुन बसतात कारण चिखलच एव्हडा घट्ट झाला आहे.
सर्व सामान्य हिंदू मतदाराला जितूद्दीन सारख्या I love gaza म्हणणाऱ्या आणि अनंत करमुले सारख्या सामान्य माणसाला बंगल्यावर नेऊन पोलिसांसमोर मारझोड करणारा नेता डोक्यात गेला आहे. एक वेळ उद्धवजींना ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्षपद बहाल केले ते जनता मान्य करेल कारण ते नैसर्गिक खेळी वाटते पण जितुधीनला पाठिंबा देणे अयोग्यच.
तुम्ही आजपर्यंत राजकारणात जेव्हड्या खेळी खेळलात त्यातील बऱ्याच उलटल्या. तुमची प्रतिमा दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. तुमच्या प्रचंड बुद्धिमत्तेचा उपयोग यापेक्षाही चांगला झाला असता. पण प्रशासन आणि आपले गृहखाते सुधारून आपली प्रतिमा उचवण्यात लक्ष न देता आपला सारा वेळ आपणच तयार केलेले खड्डे भरण्यात जात आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
माधव भोळे
No comments:
Post a Comment