समाजकार्य आणि देणगीचे महत्व!!
एकदा महाराष्ट्रातील एक प्रतिथयश व्यावसायिक विकोवज्रदंतीचे मालक चालक कै. गजाननराव पेंढारकर यांना महाराष्ट्रातील एका दुर्गम भागात शाळाबांधण्यासाठी गजाननराव काही देणगी देतील या आशेने काही मंडळी भेटायला आली होती.
प्राथमिक चर्चा झाल्यानंतर गजाननराव म्हणाले. मी त्या गावातील नाही. मी त्या शाळेत शिकलो नाही. मी कशी काय देणगी देणार? हे सर्व संभाषण त्यांचे वडील आतल्या खोलीत बसून ऐकत होते. त्यांनी गजनानरावांना खूण करून हळूच आत बोलावले.
बाबासाहेब म्हणाले, अरे गजानन, तू म्हणतोस ते खरे आहे, त्या शाळेत तू शिकला नाहीस, ते तुझे गाव नाही, मग तू देणगी का द्यावी? पण एक गोष्ट समजून घे, ज्या शाळेत तू शिकलास ती तूझ्या वडिलांनी किंवा आजोबांनी बांधली नव्हती. मग ती शाळा सुद्धा कोणा दुसऱ्याच्या देणगीवर बांधली असणार ना? समाजचक्र हे असेच असते. कोणी देणगी देतो आणि कार्य पुढे चालू रहाते. तुला शक्य असेल तेवढी देणगी दे. पण त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नकोस.
गजाननरावांना ते म्हणणे पटले. त्यांनी यथाशक्ती देणगी देऊन पाहुण्यांच्या विनंतीला मान दिला. म्हणतात ना "संघे शक्ती कली युगे".
माधव भोळे.
No comments:
Post a Comment