Monday, October 26, 2026
नाना - नाना पाटेकर
नाना!
आज सकाळी ५.२० वाजता प्रसिद्ध नाट्य सिने कलाकार श्री नाना पाटेकर यांचे ह्रिदयघाताने ( heart attack ) त्यांच्या गोव्यातील घरी निधन झाले. अतिशय खेळकर आणि मस्तीखोर व्यक्तीमत्व. कामात तगडा.
त्यांना मी प्रथम पहिले ते आमच्या सुहास वीरकर बरोबर छबीलदास हायस्कूल, दादर येथे. त्यावेळी जीनची पॅन्ट आणि मरून रंगाचा बुश शर्ट घातलेला नाना अविष्कार ह्या अरविंद देशपांडे आणि सुलभा देशपांडे ह्यांच्या प्रायोगिक रंगमंचला वाहिलेल्या संस्थेमध्ये तुघलक ह्या नाटकाची तालीम करताना. त्या वेळी तेथे रोहिणी ओक ( लग्नानंतर हट्टगडी ) आणि जयदेव हट्टगडी, अरविंद आणि सुलभा देशपांडे तसेच त्यांचे नातेवाईक बापू लिमये उपस्थित होते. सुहासचे सर्वांशी चांगले संबंध होते त्यामुळे तालीम झाल्यावर त्याने माझी सर्वांशी भेट घालून दिली.
त्या नंतर त्याचे अनेक चित्रपट बघितले पण माझ्यामते सर्वात चांगले काम बघितले ते परिंदा सिनेमातील. ॐ पुरी, अमरेश पुरी, नासिरूद्धीन शहा, नासिरूद्धीन सिद्दीकी सारखेच खूप आधी नाना ने सिद्ध केले की फिल्म इंडस्ट्रिमध्ये नांव कमवायला चेहऱ्या पेक्षा तुमची मेहनत, तुमचे कौशल्य आणि भूमिकेला तद्रूप होण्यासाठी लागणारी एकाग्रता ह्या तीन गोष्टी जास्त महत्वाच्या ठरतात.
त्यांच्या आत्म्यास सदगती लाभो हीं प्रार्थना.
माधव भोळे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment