यशस्वी होण्याचा सोपा मंत्र!
ब्राह्मणांना शिव्या घाला आणि आपले अपयश लपवा!
आजकाल ब्राह्मणांना शिव्या घालणे ही फॅशन झाली आहे. भारतात कोठेही कोणालाही काहीही अपयश आले मग ते निवडणुकीत असो, शिक्षणाच्या स्पर्धेत असो, नोकरीं व्यवसायात असो की कला क्षेत्रात असो, भारतात ही फॅशन झाली आहे कीं ब्राह्मणांना शिव्या घाला आणि आपले अपयश लपवा!
पण ज्यावेळी भारत रशिया कडुन तेल विकत घेतो आणि अमेरिकेच्या दबावाला झुकत नाही असे लक्षात आल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पचा व्यापार मंत्री पीटर नव्हेरो यानेही ज्यावेळी हेच उद्गार काढले कीं भारतात ब्राह्मण मंडळी इतर भारतीय लोकांच्या जीवावर नफेखोरी करतात, त्यावेळी मात्र मीं ब्राह्मण असल्यामुळे माझी छाती गर्वाने भरून आली कीं माझी ज्ञाती एव्हडी प्रसिद्ध आहे कीं ते अमेरिकेचे सिंहासन सुद्धा डळमळवू शकते. या पूर्वी अनेक ब्राह्मणांनी आपल्या तपस्चर्येने इंद्राचे सिंहासन डळमळवाल्याचे कथा पुराणात वाचले होते पण आता प्रत्यय आला.!!
विशेष म्हणजे ज्या भारताबद्धल ते बोलत आहेत त्याचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी हे अब्राह्मण आहेत तरी सुद्धा असे वाक्य म्हणणे म्हणजे पीटर नव्हेरो हे काबीले टारीफ ( तारीफ ) असेच म्हणायला हवे.
पूर्वी सर्व कथामध्ये म्हटलेले असायचे कीं "आटपाट नगर होते त्यात एक गरीब दरिद्री ब्राह्मण होता". म्हणजे ब्राह्मण दरिद्री असून सुद्धा त्याच्या विद्वत्तेमुळे त्याला मान होता. मग आता तर सरस्वती पुत्र असलेल्या ब्राह्मणांना लक्ष्मी पुत्र व्हायला विकसित भारतात अनेक संधी आहेत, तर त्यांनी आणि त्यांच्या पुढील पिढ्यानी प्रचंड मेहेनत घेऊन खूप संपत्ती जमा करावी आणि आपला कमी झालेला महिमा परत मिळवून घ्यावा आणि संपुर्ण जगावर राज्य करावे असे मीं आवाहन करतो. म्हणजे निदान आरक्षणासाठी आझाद मैदानावर आंदोलन करायला नको
माधव भोळे
No comments:
Post a Comment