कोकणचा इतिहास, महाराष्ट्राची अनास्था.
आज कसबा, संगमेश्वर तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे गेलो होतो. तेथील छत्रपती संभाजी महाराज्यांच्या पुतळ्याला भेट दिल्यानंतर छ. संभाजी महाराज रोडवरील सरदेसाई वाड्याला भेट दिली. हा तोच वाडा जेथे छ. संभाजी राजे आणि कवी कलश यांना मुकरब खान ह्या मोगल सरदारांने गणोजी शिर्के यांच्या फितूरीच्या साहाय्याने पकडले.
तो वाडा पूर्णपणे कोसळला असून आतील इमारती लाकडे आडवी पडली आहेत. वाड्याचा बहुतांश भाग नष्ट झाला असून सर्वात दुर्दैव म्हणजे तेथे कोणताही बोर्ड नाही की त्यावर लिहिलेले आहे की हाच तो सरदेसाई वाडा. तेथील स्थानिकांनी सांगितले तेव्हा समजले. जरी संगमेश्वरची स्थानिक जनता मुस्लिम बहुल असली तरी जवळच असलेला रत्नागिरी जिल्हाधिकारी या दुरावास्तेवर काही उपाय योजू शकत नाही हे आश्चर्य वाटते.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक विभाग दरवर्षी अनेक मंडळाना त्यांचे कार्यक्रम साजरे करायला करोडो रुपये खर्च करतात पण ह्या ऐत्याहिसिक ठेव्यावर कोणतेही लक्ष नाही. शिवाय जे छत्रपती म्हणून पिढ्यानं पिढ्या आपला वारसा हक्क चालवत छत्रपतींच्या मालमत्ता उपभोगत आहेत आणि सध्या राजकाराणात आहेत ते सुद्धा ह्या बाबतीत गप्प आहेत.
आजपर्यंत रत्नागिरी मध्ये या विषयांवरील प्रवचने आणि व्याख्यानावर स्थानिकांनी लाखो रुपये खर्च केलेले मीं बघितले आहेत पण प्रत्यक्ष स्थानाबद्दल दुरावस्था.
कोणत्या तोंडाने आम्ही पुढील पिढीला इतिहास सांगणार?
माधव भोळे
No comments:
Post a Comment