Wednesday, April 27, 2022
देवरूखे ब्राह्मणांच्या संस्था!!
देवरूखे ब्राह्मणांच्या संस्था!!
अनेक वेळा मला आपल्या समाजतुन फोन येतात हे काम होईल का? ते काम कोण करते? वगैरे वगैरे. सर्व संस्थांशी मी संबंधित नसलो तरी कोणीतरी माझे नाव ऐकलेले असते म्हणून लोक मला विचारतात!
आश्चर्य याचेच वाटते की ज्या संस्थानी एकेकाळी समाजाला मदत करण्यासाठी भरघोस कार्य केले आणि समाजातील जुन्या पिढीने त्यांना भरपूर दिले त्या संस्थांची किंवा त्यांच्या कार्याची माहिती, किंबहुना तोंड ओळख, नवीन पिढीला नाही. या संस्था कोठेतरी कमी पडल्या का? त्यांचे कार्य आता लोकाभिमुख राहिले नाही का? त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार थांबला आहे का? नवीन पिढीपर्यंत आपण कसे पोहोचणार? काय करता येईल याचा विचार मांडण्यासाठी मी आज डिजिटल मीडियाचा वापर करत आहे.
देवरूखे ब्राह्मणांच्या 5 प्रमुख संस्था आहेत ज्या सर्व देवरूखे समाजासाठी काम करतात. शिवाय इतर स्थानिक देवरूखे ब्राह्मण संघ सुद्धा आहेत जे आपापल्या विभागात काम करतात. या सर्व संस्थांना निस्पृह कार्यकर्ते हवे आहेत जे संस्थेचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करतील. अर्थातच चांगले कार्य करायला निधीची आवश्यकता भासते आणि जमलेला निधी योग्य व्यक्तीच्या हाती असणेही तीतकेच महत्वाचे. हळूहळू या कार्यकर्त्यांना या संस्थांच्या कार्याची सखोल माहिती होऊन एकदिवस ते त्यांच्या कर्तबगारीवर त्यां संस्थांच्या कार्यकारिणीमध्ये काम करतील असा आशावाद आहे!!.
मी व्यक्तीश: यातील काही संस्थांमध्ये काम केले आहे परंतु वयोपरत्वे नवीन पिढीला या कार्यात काम करायला संधी मिळावी आणि हळूहळू हा सर्व कारभार त्यांचे हाती जावा हीच ईच्छा. शेवटी हे कार्य अव्याहत सुरू राहायला हवे तरच समाज म्हणून आपण एकत्र राहिल्याचे समाधान मिळेल.
या संस्थांची थोडक्यात माहिती देतो.
१) विद्यार्थी सहायक संस्था: ही संस्था मुख्यत्वे पहिली ते पीएचडी पर्यंत देश आणि विदेशातील शिक्षणासाठी देवरूखे विद्यार्थ्यांना मदत करते तसेच त्यांच्याकडे असलेल्या गुणांना वाव देत स्कॉलरशिप / पारितोषिके सुद्धा देते. हिचे ऑफिस 106, हेरंब बिल्डिंग, बोरभाट लेन ( क्रांतिवीर राजगुरू मार्ग), गिरगाव, मुंबई 400004. फोन 022-23881920. बाकीचे दिवशी वेळ सकाळी 11 ते 4, रविवारी 11 ते 12.30 दुपारी ई-मेल: devrukhevss@yahoo.co.in. सध्याचे अध्यक्ष श्री दिवाकर निमकर.
2) देवर्षी प्रकाश: हे त्रैमासिक पुण्याहून प्रकाशित होते. अंदाजे 1800 वर्गणीदार आहेत. पुणे सम्पर्क संपादक श्री दिवाकर निमकर 9822094688 / श्री वामन शेंडये 9423585311. यांची 10 वर्षाची वर्गणी फक्त रु 750 आहे ती भरून आपण हे त्रैमासिक आपल्या घरी मागवू शकता. ज्यांचे घरी मृत व्यक्तीच्या नावे हे त्रैमासिक येते त्यांनी संस्थेला कळवून पुन्हा नवीन वर्गणी भरून आपल्या नावे अंक सुरू करावा ही विनंती. आपला पत्ता बदलला असल्यास कळवावे. आपले चांगले समाजोपयोगी लेख याना email:
devarshiprakash@gmail.com वर पाठवू शकता.
3) सन्मित्र समाचार: हे मासिक ठाणे येथून प्रकाशित होते: या मासिकाचे अंदाजे १०५० वर्गणीदार ( subscriber) असून वर्गणीसाठी संपर्क -- रवींद्र सावले, संपादक ९३२२५१४२१२. या मासिकाचे आजीव सभासद शुल्क रू.१०००/- आहे. सभासदांना हा अंक दरमहा पोस्टाने पाठविण्यात येतो. ज्यांचे घरी मृत व्यक्तीच्या नावे हे मासिक येते त्यांनी संस्थेला कळवून नवीन वर्गणी भरून आपल्या नावे सुरू करावी ही विनंती, किंवा आपला पत्ता बदलला असल्यास कळवावे.
आपले चांगले समाजोपयोगी लेख या email Sanmitrasamachar@gmail.com वर पाठवू शकता.
4) देवरूखे ब्राह्मण अनाथ कौटुंबिक निधी: ही संस्था समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत, विधवा, निराधार, दिव्यांग( दिव्यांगाना वयाची अट नाही) 60 वरील व्यक्तींना वार्षिक मदत करते ( गेल्या वर्षी प्रत्येकी वार्षिक रु 5000/- ), तसेच 60 वर्ष खालील अशाच प्रकारच्या व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कोणतेही उपजीविकेचे साधन/ मशीन / कौशल्य विकास कोर्स करण्यास एक वेळ ( one time only) मदत करते जेणेकरून ती व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहील. देणगी / नवीन मदतीसाठी सम्पर्क : अध्यक्ष श्री श्रीनिवास कानडे ( 98334 40944 ) / चिटणीस : माधव भोळे 98194 79791 email :dbaknidhi@gmail.com.
5) वैद्यकीय मदत निधी: ही संस्था देवरूखे आणि इतर समाजासाठी डोंबिवली येथून वैद्यकीय मदत करते. देणगी / मदतीसाठी सम्पर्क : डॉ विश्वास पुराणिक ( 9821061883 )/ चिटणीस : प्रशांत जोशी 9819746867. Email : prashantjoshi22@gmail.com
या शिवाय आणखी एक संस्था आहे जी बऱ्याच मंडळींना माहिती नाही. ही संस्था सध्या कमी कार्यरत आहे परंतु या संस्थेकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. कारण या संस्थेचे म्हटले तर रिसोर्सेस मोठे आहेत पण त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत. या मध्ये कायदेशीर ज्ञान / जाण असलेल्या अनुभवी कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. कोणाला स्वारस्य असेल आणि थोडा वेळ देण्याची तयारी असेल तरच फक्त माहितीसाठी मला सम्पर्क करा 98194 79791.
ही माहिती जास्तीत जास्त देवरूखे ब्राह्मण बंधू भगिनीं पर्यंत पोहोचवाल याची खात्री आहे. कृपया सहकार्य करावे. म्हणतातना कली युगात संघ शक्तिलाच महत्व आहे.
माधव भोळे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment