Wednesday, April 27, 2022
National Skill Development Corporation (N.S.D.C)
प्रिय मराठी बांधवांनो,
National Skill Development Corporation (N.S.D.C) ही भारत सरकार प्रवर्तित संस्था आहे. ह्या संस्थे तर्फे संपूर्ण भारत भर skill Development programe राबवले जातात तसेच वेरीयसे कॅटेगरी मध्ये स्पर्धा ही भरवल्या जातात. जवळपास वेगवेगळ्या ५८ कॅटागरी मध्ये ह्या स्पर्धा होत असतात. २१ वर्षा पर्यंतची मुले या स्पर्धेत भाग घेत असतात. उदा. ग्राफिक डिझाईन, वेब डिझाईन, अनिमेशन, डिजिटल फोटोग्राफी, हेअर ड्रेसिंग, प्लंबिंग, करपेंटरस, बिझनेस आयडिया अशा अनेक स्पर्धा दर २ वर्षांनी होत असतात. ज्यांना इंटरेस्ट आहे ते या स्पर्धा मध्ये भाग घेऊ शकतात. त्यासाठी एनएसडीसी ने नेमलेल्या संस्था स्पर्धकांना ट्रेनिंग देत असतात.
ज्युनियर स्किल स्पर्धेत, ६ ते ८, ९ ते १० आणि ११ ते १२ असे गट असतात. या स्पर्धांचा सर्व खर्च एनएसडीसी ही संस्था करते. म्हणजे स्पर्धकांचे ट्रेनिंग, स्पर्धेसाठी येणे जाणे, राहणे, खाणे पिणे इत्यादी. या स्पर्धेत गोल्ड, सिल्व्हर, ब्राँझ पदक मिळवणाऱ्या स्पर्धकांना दिल्ली येथे सत्कार करून मेडल, सर्टिफिकेट आणि रोख बक्षिसे दिली जातात ती ५०, ३०, २० हजार अशी असतात. नुकतेच माझ्या मुलीने ग्राफिक डिझायनिंग मध्ये ब्राँझ पदक मिळवून २० हजार रुपयाचे रोख बक्षीस मिळवले. त्यामुळे तिला आत्ताच १८ वर्षे पूर्ण झाल्यावर जॉब ऑफर्स यायला लागल्या.
२१ वर्षा पर्यंतची मुले सिनियर स्किल स्पर्धेत भाग घेऊ शकतात. त्यांनाही नॅशनल लेव्हल स्पर्धेत गोल्ड, सिल्व्हर, ब्राँझ पदक मिळवणाऱ्या स्पर्धकांना दिल्ली येथे सत्कार करून मेडल, सर्टिफिकेट आणि रोख बक्षिसे दिली जातात ती १ लाख, ५०, ३० हजार अशी असतात.
या स्पर्धा मध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या स्पर्धकांना वर्ल्ड स्किल स्पर्धेत भाग घेण्याचा चान्स मिळतो. हे स्पर्धक जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतात. या ऑक्टोबर २२ मध्ये शांघाय, चायना येथे वर्ल्ड स्किल ची स्पर्धा होणार आहे. वर्ल्ड स्किल मध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांचा संपूर्ण खर्च एन एस डी सी ही संस्था अर्थात भारत सरकार करते. अर्थात नॅशनल चॅम्पियन्स तसेच वर्ल्ड चॅम्पियन शिप ला पोहोचणाऱ्या स्पर्धकांना मोठ मोठ्या कंपन्यांच्या जॉब ऑफर्स मिळतात.
तेंव्हा अशा स्पर्धांचा लाभ घेऊन पारंपरिक अभ्यासक्रम व्यतरिक्त आपल्या मुलामधील विविध स्किल डेव्हलपमेंट ला वाव द्या. ह्या शिवाय भारत सरकारच्या काही स्किल डेव्हलपमेंट च्या परीक्षा असतात. त्यात जार मुले चांगल्या मार्कने पास झाली तर सरकार तर्फे त्यांना नवीन उद्योग (स्टार्टअप) साठी आर्थिक मदत केली जाते.
आपल्याला अधिक माहिती पाहिजे असल्यास Skill India या फेसबुक पेज वर किंवा skill India असे गूगल सर्च करून website check करा व रजिस्टर करा.
https://www.skillindia.gov.in/
हा संदेश जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यन्त पोचवा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment