Wednesday, April 27, 2022

एलोन मस्क च्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा.

एलोन मस्क च्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा. जगातील सर्वात श्रीमंत इंजिनियर, टेस्ला मोटर्सचा सर्वे सर्वा, स्टारलिंक इंटरनेट ह्या सॅटेलाईट द्वारा इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कम्पनीचा मोठा भागधारक, स्पेस एक्स ह्या अंतराळ संशोधन आणि रॉकेट लाँचिंग कम्पनीचा मालक, सोलर सिटी आणि टेस्ला एनर्जी ह्या ऊर्जा कम्पनीचा मालक, न्यूरोलिंक, ओपन ए आय, डीप माईंड ह्या आर्टीफिशल इंटिलीजन्स, मशिन लर्निंग आणि ओपन अल्गोरिदम ह्या नवीन तंत्रज्ञावर आधारित असलेल्या कंपन्यांचा प्रवर्तक, पे प्याल ह्या इमेल मधून पेमेंट गेटवे पुरवणाऱ्या सर्वात पहिल्या कम्पनीचा फाऊंडर, जमिनीवरून अति वेगवान प्रवासासाठी काम करणाऱ्या व्हर्जिन हायपर लूप आणि त्यासाठी बोगदे तयार करणाऱ्या द बोरिंग कम्पनी अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनाचा प्रवर्तक, मालक आणि मार्गदर्शक असलेल्या एलोन मस्क ह्या शिक्षणाने पदार्थ विज्ञान आणि मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या धडाडीच्या आणि हाडाच्या इंजिनियर इंटरप्रिंनरने ट्विटर ह्या सोशल नेटवर्किंग आणि मेसेजिंग कम्पनीला काल 44 बिलियन (4400 कोटी) अमेरिकेन डॉलर ला विकत घेतले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया असून ट्विटर जरी त्याबाबत अग्रगण्य असले तरी त्याचा परमोच्च बिंदू गाठण्याचा तो प्रयत्न करणार आणि त्यासाठी त्याच्याकडे काही कल्पना आहेत असे तो म्हणतो. जर पृथ्वीवरील वातावरण नष्ट झाले तर मानवाने मंगळावर वस्ती तयार करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान तयार करण्यासारख्या भन्नाट कल्पनांपासून ते अगदी मानवी जीवन सुसह्य व्हावे या साठी जास्तीतजास्त तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याकडे तो आपला जास्तीतजास्त वेळ उपयोगात आणतो. तो नो नॉनसेन्स एम्प्लॉयर असून दिवसाचे 16 ते 18 तास आपल्या ह्या आवडीच्या विषयांवर काम करून तशाच प्रकारचा उत्तम परफॉर्मन्स आपल्या नोकरांकडून त्याला अपेक्षित आहे. हे सर्व करत असताना व्यवसाय करण्यात नवनवीन कल्पना आणून व्यवसायात कोठेही मागे नाही. त्यांनी बहुतेक ठिकाणी वार्षिक फक्त एक डॉलर एवढाच पगार घेतला असून त्याच्या शेयर्स चे मूल्यवर्धित करणे आणि त्याद्वारे आपली मालमता वाढवणे हे त्याच्या व्यक्तिगत फायनान्स चे सुत्र आहे. ट्विटर विकत घेऊन त्याने आपल्या मुकुटात आणखी एक मनाचा तुरा खोवला आहे असे नक्कीच म्हणावे लागेल. त्याचे मनःपूर्वक अभिनंदन. माधव भोळे

No comments:

Post a Comment