Sunday, April 2, 2023

Chatrapati Shivaji Maharaj and Veer Village

वीर गावा संबंधि पर्यटन विषयक माझा लेख देवर्षी प्रकाश मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर श्री संतोष सोबळकर, पुणे यांनी मला कौतुकाचा फोन केला. त्यांचा बाबासाहेब पुरंदरे यांचा चांगला परिचय होता. ते असे म्हणाले कि पुरंदरे म्हणाले कि छत्रपती शिवाजी महाराजां नी जावळीच्या चंद्रराव यशवंतराव मोरे ( चंद्रराव हा 'किताब आहे ) यांचे वर हल्ला केल्यानंतर, खोपी, तालुका खेड येथून सातारा येथे जाणारा रघुवीर घाट येथे 360 मोऱ्यांचा नि:पात केला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिंदू मराठा नरसंहार झाल्यामुळे जिजाबाई दुःखी झाल्या. त्यांनी छत्रपती ना प्रायश्चित घेण्यास सांगितले. त्या नंत्तर शिवथर येथे असलेल्या मोऱ्यांच्या वाड्यातून एक लाकडी देव्हारा आणि त्यातील देव घेऊन ज्या ठिकाणी मोऱ्यांचे उपाध्याय पळून वीर येथे आले होते त्या चौसोपी वाड्यात छत्रपती नी ते देव आणि तो मोठा देव्हारा उपाध्याच्या ताब्यात दिले आणि छत्रपती निघून गेले. मी या विषयी काही कागदपत्र आहेत का असे विचारले असता ते म्हणाले कि बाबासाहेबानी ते दिले नाहीत पण त्यांच्याकडे ते आहेत. पण काल शोध घेता असे लक्षात आले कि मोरे बखर नावाचे एक पुस्तक आहे तसेच जावळी येथील काळ भैरव देवळाचे पुजारी नारायण गुरुजी यांचेकडे मोरे कुटुंबियांनसंबंधि बरीच माहिती आहे. ही माहिती घेताना असे सुद्धा समजले कि अनेक मोरे कुटुंबात लग्न कार्यात देवक ठेवताना 360 दिवे लावतात ते ह्या शाहिद मोऱ्यांसाठीच. ही माहिती मला एकदा एसटी णे जाताना सहप्रवश्यासानी दिली. स्वतः सोबळकर यांचे मूळ घर निवेंडी असून त्यांच्या म्हणण्यानुसार झाचीच्या राणीचे माहेर तांबे यांचे मूळ गाव निवेंडी असून त्यानंतर ते लांजा आणि पुढे मध्यप्रदेश मध्ये गेले. अजूनही त्यांची पालखी तांब्यांच्या घरी जाऊन मग पुढे गावात फिरते. त्यांच्या माहितीनुसार धामणसे येथील दीक्षित घराणे आणि रत्नेश्वर यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर संभाजी महाराज यांचा खूप जवळचा परिचय होता आणि छत्रपती शिवाजी महाराज धामणसे येथे येऊन गेले आहेत. असो मला जी माहिती सोबळकरांनी सांगितली ती मी तुम्हांला सांगितली. आपणास या संबंधी काही अधिक माहिती असल्यास जरूर कळवा. माधव भोळे

No comments:

Post a Comment