Monday, March 14, 2022

आम आदमी पार्टी

आम आदमी पार्टी: पंजाब मध्ये एकहाती सत्तांतर करवून जिंकून आल्याबद्दल सर्वप्रथम आम आदमी पार्टी चे संस्थापक श्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. कोणतीही जाती, धर्म किंवा अन्य फोडाफोडीची भाषा न वापरता, पंजाब मधील लोकांशी प्रत्यक्ष सव्वाद साधून नवीन सरकारकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत याचा सर्व्हे करून त्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपने दिलेली वचने या मुळेच हा विजय मानावा लागेल. वर्षानुवर्ष अँटी चेंबर किंवा पक्ष कार्यालयात बसून स्वतःच्या मनाप्रमाणे जाहिरनामे तयार करणार्यांना हा एक मोठा धडा आहे. नुसते मोठं मोठे पुतळे बांधून किंवा रामराज्य आणण्याची स्वप्न दाखवणाऱ्यांवर न भुलता पंजाब मधील लोकांनी दिल्लीमध्ये टेस्ट केलेला एक नवीन पर्याय निवडला आहे कारण या आधी अकाली दल, काँग्रेस सारख्या पक्षांनी केलेले पंजाबचे वाटोळे त्यांना माहिती आहे. भ्रष्टाचार मुक्त आणि ड्रग मुक्त सुशासन, कायदा आणि सुव्यवस्था सुधारणे, शिक्षण, आरोग्य, शेती आणि उद्योगाचा दर्जा सुधारणे,ठराविक वीज बिलपर्यंत पूर्ण वीज माफी त्यावर 50% बिल माफी आणि या मुळे घरगुती वीज बिलाचा सर्वसामान्यांचा बोजा कमी करणे, प्रत्येक 18 वर्षावरील महिलेला मासिक रु 1000 भत्ता देणे. पंजाब मधील शहरांना दिल्ली सारखे स्वच्छ, सुंदर, सुशोभित करणे, सम्पूर्ण वीज, इंटरनेट, इत्यादी केबल जमिनीखालून नेणे, सरकारी हॉस्पिटल आणि शाळा सुधारणे आणि त्यात मोफत उपचार करणे मोफत शिक्षण देणे. मोहोलला औषध योजना तयार करणे, 24 तास वीज उपलब्ध करून देणे, पिण्याचे पाणी, रोड, सार्वजनिक स्वछता गृह, पार्किंग व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, मुख्य म्हणजे पुढील पाच वर्षात टॅक्स वाढवणार नाही. भ्रष्टाचार वर उपाय म्हणून जनलोकपाल नेमणे इत्यादी हे जाहीर नाम्यात आहे. यात कोठेही अमक्या समाजाला एव्हडे कोटी, तमक्याच्या स्मारकाला एव्हडे कोटी, शेतकऱ्यांना जास्त सवलत, शहरी भागाला कमी सवलत हा विषय नाही. नाही कोणत्या समाजात चढाओढ. खरे म्हटले तर नागरिकांच्या या सर्व रास्त अपेक्षा आहेत. यातील भ्रष्टाचार हा मुद्धा सोडला तर बाकी योजना राबविणे सहज शक्य आहे. यातील किती पूर्ण होतील ते बघणे महत्वाचे आहे पण मेनुकार्ड तर चांगले आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत तो एव्हडा खोलवर रुजला आहे की तो 5 वर्षात निघणे कठीण आहे पण त्याची मात्रा वेगवेगळ्या उपायांनी कमी करता येते हे मोदोनी सर्व योजना आधार ला जोडून निदान 15% करून दाखवले. अजून उच्च पातळीवरील भ्रष्टाचार कमी करण्यात त्याना माफक यश आले आहे. असे 10 तरी केजरीवाल आणि योगी अजून तरी तयार व्हायला हवेत जे सुशासन करून प्रस्थापिताना सुधारतील आणि सुशासनाच्या बाबतीत उत्तम चढाओढ होईल. माधव भोळे

No comments:

Post a Comment