Wednesday, June 12, 2024

गडकरिंचा नाद खुळा!

गडकरिंचा नाद खुळा! काल नितीन गडकरिंचा एक छोटा व्हिडिओ बघितला. तें म्हणत होते, मी गणितातून एक गोष्ट शिकलो. समजा अ आणि ब दोन कार्यकर्ते आहेत आणि दोघेही उत्तम काम करतात. त्यांची वेगवगळी कामगिरी = (अ वर्ग + ब वर्ग ) समजू या. पण त्या दोघांनी एकत्र काम केले तर त्यांची कामगिरी ( अ + ब ) वर्ग = अ वर्ग + ब वर्ग + २xअ xब एवढी होते. हे २xअ xब हे एकत्र कामगिरीचे जास्तीचे फळ आहे. म्हणून नेहमी संघटनेने काम करावे त्याचा फायदा अनेक गुणित होईल. किती छान आणि सोपी पद्धत असते काही माणसांची समजावून सांगण्याची. माधव भोळे

No comments:

Post a Comment