Saturday, June 22, 2024

महत्वाचा संदेश

महत्वाचा संदेश कॉपी पेस्ट एका मुलाने आपल्या वडिलांना स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये नेले. त्याचे वडील बऱ्यापैकी म्हातारे होते त्यामुळे थोडे अशक्तही होते. जेवताना अधूनमधून त्यांच्या शर्ट-पँटवर अन्न पडले. हॉटेल मधील इतर ग्राहकांचे चेहरे त्या म्हाताऱ्याला तिरस्काराने बघून वाकडे झाले होते.पण त्यांचा मुलगा शांत राहिला. दोघांचे जेवण झाल्यानंतर मुलाने शांतपणे वडिलांना मदत केली आणि त्यांना शौचालयात नेले. त्याच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावरील अन्नाचे कण साफ केले. त्याच्या कपड्यांवरील अन्नाचे डाग धुवण्याचा प्रयत्न केला; दयाळूपणे त्याच्या पिकल्या केसांना कंगव्याने विंचरले आणि शेवटी चष्मा लावला. तें दोघे बाथरूममधून बाहेर पडताच रेस्टॉरंटमध्ये शांतता पसरली. मुलगा बिल देऊन बाहेर जायला तयार होताच, पण जाण्यापूर्वी ग्राहकांपैकी एक म्हातारा माणूस उठला आणि त्याने पहिल्या म्हाताऱ्याच्या मुलाला विचारले: 'तुला वाटत नाही की तू इथे काही सोडून जातं आहेस?' तरुणाने उत्तर दिले: 'नाही, मी काहीही सोडले नाही.' मग तो अनोळखी माणूस त्याला म्हणाला: 'तू इथे प्रत्येक मुलासाठी एक धडा आणि प्रत्येक वडिलांसाठी आशा ठेवली आहेस! संपूर्ण रेस्टॉरंट एकदम शांत झाले, अगदी टाचणी पडली तरी ऐकू येईल असे. आजपर्यंत माहित असलेल्या सर्वात मोठ्या सन्मानांपैकी एक म्हणजे, ज्यांनी आपली काळजी पूर्वी घेतली आहे त्यांची काळजी घेण्यास सक्षम असणे. आमचे पालक आणि ते सर्व वडील ज्यांनी आपला सर्व वेळ, पैसा आणि प्रयत्न आमच्यासाठी बलिदान दिले, ते आमच्या आत्योच्च आदरास पात्र आहेत. (मूळ इंग्रजी कथा मराठी भाषांतर माधव भोळे यांचे.)

No comments:

Post a Comment