Practice makes men perfect
आपण शाळेत असताना असे अनेक सुविचार लिहायला शिकलो पण त्याचे खरे महत्व आपल्या पैकी किती जणांना कळले तें माहिती नाही.
आज सोनू शर्मा ह्या प्रेरणादायी वक्तृत्व करणाऱ्या एका सदगृहस्थाचे भाषण युट्यूब वर ऐकत होतो.
तों सांगत होता. ५ ऑक्टोबर २००७ साली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मधील एका ODI मध्ये ऑस्ट्रेलीयन तरुण क्रिकेटीयर Brad Hogg नें सचिन तेंडुलकर चा क्लीन बोल्ड केला. त्या वेळी तरुण असलेल्या ब्रॅडला अर्थातच ती मोठी अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट होती. त्या खुशीत संध्याकाळी मॅच संपल्यावर तों त्या क्षणाचा फोटो घेऊन सचिनच्या ड्रेसिंग रूम मध्ये गेला आणि त्याला त्या फोटोवर सही करण्याची विनंती केली.
सचिननें कोणताही राग मनात न धरता त्या फोटोवर सही केली आणि त्या खाली एक संदेश लिहिला "तुला परत कधी माझी विकेट मिळणार नाही". त्यानंतर कमीतकमी ३० तें ३२ वेळा सचिन विरुद्ध Hogg खेळले पण एकदाही तों सचिनला आउट करू शकला नाही. अर्थात तों आत्मविश्वास होता प्रॅक्टिसचा. आपला शब्द खरा करण्यासाठी त्याने अपरंपार कष्ट केले आहे, उगाच नाही तों जगातील एक श्रेष्ठ फलंदाज आहे.
अशीच एक गोष्ट, जगातील एक प्रख्यात स्पॅनिश चित्रकार पाबलो पिकासो बद्धल आहे. एकदा तों रस्त्याने जातं असताना एका बाईने त्याला ओळखले आणि ती आनंदाने नाचायला लागली. तिने त्याला विचारले तुम्ही पाबलो पिकासो नां? त्याने आपली ओळख कबूल केली. ती म्हणाली मी तुमची खूप मोठी फॅन आहे. माझी तुम्हांला एक विनंती आहे. तुम्ही आताच्या आता मला एक चित्र काढून द्या. योगायोग म्हणजे तिच्या पिशवीत एक कागद आणि पेन्सिल होती. पिकासो नें उभ्या उभ्याचं एक पेन्सिल स्केच पटकन ३० सेकंदात काढून दिले आणि म्हणाला जा घेऊन हे ५० लाख डॉलर्स चे चित्र. ती खूष झाली पण नंतर तिला वाटले की तिला खूष करण्यासाठी त्याने चित्राची किंमत ५० लाख डॉलर्स सांगितली असणार. विश्वास न बसल्यामुळे ती तीन चार आर्टस् स्टुडियो मध्ये गेली आणि हे चित्र विकण्याबद्दल तिने विचारणा केली. बहुतेक सर्वांनी तें चित्र ५० लाख किंवा जास्त किमतीला विकत घेण्यासाठी तयारी दर्शवली. त्यानंतर तिने तें चित्र विकले नाही आणि पिकासोचा पत्ता शोधत शोधत ती त्याच्यापर्यंत पोहोचली आणि तिने त्याला सांगितले. तुम्ही म्हणालात त्या प्रमाणे अनेक लोक हे चित्र ५० लाखाला घ्यायला तयार आहेत. पण मला एक सांगा तुम्ही ३० सेकंदात एव्हडे चांगले चित्र काढू कसे शकता. मला पण तुमच्याकडे ही कला शिकायची आहे. त्यावर पिकासो नम्रपणे म्हणाला. ताई, जे सुंदर चित्र मी अवघ्या ३० सेकंदात काढले ती कला अवगत व्हायला ३० वर्ष घालवली आहेत. प्रॅक्टिस किंवा ज्याला आपण रियाझ म्हणतो तों गेले ३० वर्ष मी करत आहे तेव्हा कुठे हे जमले आहे. हाच तों रियाझ चा प्रभाव.
एकदा हॉकी मधील भारतातील सर्वोत्तम खेळाडू ध्यानचंद एका अंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळत होता. जवळजवळ अर्धा तास झाला तरी एकही गोल तों करू शकला नाही. शेवटी त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला विचारले काय रे तुझ्या भरवशावर आपण ही मॅच खेळत आहोत आणि तुझा प्रभाव अजुनसुद्धा काही दिसत नाही. असे झाले तर मॅच आपण हरू. त्यावर तों न रागावता म्हणाला. ही मॅच खेळायचे थांबवा कारण येथील गोल पोस्ट चुकीच्या अंतरावर आहे असे वाटते. त्यावेळी सर्वांनी त्याला मुर्खात काढले परंतु रेफ्रि ला सांगून मॅच थांबवली आणि गोल पोस्ट चे अंतर, ठरलेल्या स्टॅंडर्ड्स प्रमाणे आहे की नाही तें चेक केले.आणि खरोखरच तें योग्य प्रमाणापेक्षा २ फूट कमी भरले. याला म्हणतात आत्मविश्वास आणि प्रॅक्टिसचा प्रभाव.
अगदी प्रसिद्ध गोष्ट म्हणजे सुप्रसिद्ध भारतीय इंजिनियर सर विश्वेशवरईया एकदा सुरवातीच्या काळात रेल्वेने रात्रीचा प्रवास करत होते. तों ब्रिटिश इंडियाचा काळ होता. रिझर्वेशन न मिळाल्यामुळे विश्वेशवरईया खिडकीला डोके टेकून झोपले होते. अचानक त्यानां रेल्वेच्या आवाजात काहीतरी जाणवले आणि त्यांनी रेल्वे थांबवण्याची साखळी खेचली. थोड्या अंतरावर रेल्वे थांबली. त्या नंतर गार्ड आणि मोटरमेन दोन्ही त्यांच्या पर्यंत पोहचले आणि साखळी का खेचली म्हणून विचारले. त्यांनी सांगितले की माझ्या अंदाजाप्रमाणे पुढे रूळ तुटलेला आहे. त्याप्रमाणे गार्ड नें तेथपर्यंत जाऊन बघितले असता तों रूळ पुढे १०० मिटर वर खरोखरच तुटलेला होता. गार्डनें स्वतः परत येऊन विश्वेशवरईयानां सांगितले की बरे झाले तुम्ही चेन खेचलीत म्हणून नाहीतर हजारो प्रवाश्याचें जीव धोक्यात आले असते. पण मला सांगा तुम्हांला कसे कळले की पुढे रूळ तुटला आहे तें? त्यावर तें म्हणाले जेथपर्यंत रूळ एकसंध होता तेथपर्यंत रेल्वे चा आवाज एका लायित येत होता, पण जसे पुढे रूळ तुटला त्यावेळी गाडीचा आवाजाची लय बदलली होती. आणि माझ्या कानाला तें लगेच लक्षात आले. एक इंजिनियर म्हणून निरीक्षण आणि अभ्यास ह्या गोष्टींमुळे तें महान झाले.
म्हणून म्हणतात "Practice makes men perfect".
असो.
माधव भोळे
No comments:
Post a Comment