Saturday, September 23, 2023
जीवन काय आहे?
जीवन काय आहे?
जीवन एक अनोळखी प्रवास आहे, ज्याचे लक्ष आपण ठरवत असतो परंतु ते साध्य होईल किंवा नाही याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. परंतु, म्हणून तो प्रवास सुरूच करु नये असे नाही.
या प्रवासात तुम्हांला अतिशय सुंदर बगीचे मिळतील, त्यात तुम्ही रममाण व्हाल आणि आपले लक्ष विसरून जाल, तर कधी पुढे गेल्यावर संपूर्ण कोरडे वाळवंट लागेल ज्या मध्ये मृगजळ दिसून सुद्धा तेथे पाणी असणार नाही आणि तुम्ही उन्हामुळे होरपळून, तहानेने व्याकुळ व्हाल, तर कधी घनदाट जंगल लागेल जेथे चारही बाजूने पाणीच पाणी दिसेल. तुमची तहान भागल्यावर तुम्ही पुढे जाताना नक्की रस्ता कोणता बरोबर आहे हे कळणे कठीण झाल्यामुळे कदाचित तुम्ही सुकर वाटेने पुढे जाल तर कदाचित काटेरी रस्त्यावर जाल, हे सांगणे कठीण आहे. शेवटी नशिबावर भरोसा ठेवून जी वाट तुम्ही निवडाल त्यातून तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचाल किंवा श्वापद तुम्हांला शिकार करतील, हे सांगणे कठीण आहे.
या सर्वामध्ये एक आशा जगाला आहे, ती म्हणजे परमेश्वर, ज्याला कोणीही बघितले नाही, पण त्याच्यावर सर्वांची श्रद्धा आहे, की तो माझ्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी तो मला मार्गदर्शन करेल. मग कोणी त्या परमेश्वराला ईश्वर म्हणतो कोणी अल्ला म्हणतो कोणी येशू म्हणतो तर कोणी वाहे गुरु किंवा महावीर किंवा गौतम बुद्ध म्हणतो. कोणी स्वामी म्हणतो तर कोणी दिगंबर तर कोणी हजरत किंवा सेंट म्हणतो. ज्याच्या त्याच्या श्रद्देचा हा भाग आहे. बाकी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे ऐकायला चांगले वाटते.
माधव भोळे
वाढता वाढता वाढे भेदीले शून्य मंडळा!!!
वाढता वाढता वाढे भेदीले शून्य मंडळा!!!
दिनांक १८.९.२३ रोजी श्रीमती जसवंतीबेन जमनदास पोपट यांचे ९३ वर्षी, हलाई लोहाना निवास, शंकर बारी लेन, ठाकुरद्वार, मुंबई येथे राहत्या घरी निधन झाले, अशी बातमी त्यांच्या सुनेने पेपरात दिल्याचे वृत्त मी आज वाचले.
१५ मार्च १९५९ रोजी त्या रहात असलेल्या वरील घरात दुपारी ५ महिला एकत्र बसून गप्पा मारत होत्या. गप्पा मारता मारता विषय निघाला की घरी बसून गप्पा मारण्यात वेळ घालवण्यापेक्षा काहीतरी लोकोपयोगी काम करूया. मग असे ठरले की त्या सर्व महिलांना पाककला सहज जमु शकते, तर पापड बनवणे सुरु करूया असे ठरले.
पण यासाठी भांडवल कुठून आणणार? त्यांच्या ओळखीच्या छगनलाल पारीख या एका सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांनी रु. ८० फक्त उधार घेऊन पापडाला लागणारे साहित्य आणि कच्चा माल विकत घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी घरची कामे आटपून चाळीच्या गच्चीवर या पाच महिला पोळपाट, लाटणे, पापड बनवायचे साहित्य घेऊन गेल्या आणि पापड बनवायचा श्रीगणेशा केला. पहिली बॅच जवळच्याच वाण सामानाच्या दुकानात विकायला दिली आणि ती विक्री झाल्यावर त्यांचा उत्साह वाढला.
अशी झाली लिज्जत पापडची सुरवात जिचा प्रवास रु. ८० पासून करून आज ती रु. १६०० कोटींची वार्षिक उलाढाल करते, त्या संस्थेचे नांव आहे "श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड", आणि त्या संस्थेच्या संस्थापक श्रीमती जसवंतीबेन जमनदास पोपट आणि इतर चार महिला.
आज ह्या संस्थेच्या भारतातील १७ राज्यात एकंदर ८२ शाखा असून त्यात २७ प्रकरच्या उत्पादन शाखा गृहपयोगी वस्तू बनवतात. ही संस्था सहकारी संस्था असून येथे काम करणारी व्यक्ती ही संस्थेची सभासद असते. आज पर्यंत ४५,००० महिला सभासद या व्यवसायात योगदान देत आहेत.
ही संस्था १४ प्रकारच्या पापडांशिवाय, मसाला, अपलम, खाकरा, गहू आटा, बेकरी प्रॉडक्ट्स, तयार चपाती आणि ससा डिटर्जंट पावडर इत्यादी उत्पादने आणि विक्री करते. ही संस्था आपली उत्पादने २५ देशात निर्यात करते आणि त्यातून त्यांना भरपूर फायदा होतो.
वयाच्या ८० पर्यंत जसवंतीबेन ने या संस्थेसाठी प्रत्यक्ष काम करून अनेक महिलांना हक्काचा रोजगार दिला तसेच त्यांच्या कुटुंबियांना शिक्षणात मदत केली आहे.
२६ जानेवारी २०२१ रोजी त्यांच्या या महिला सक्षमीकरण आणि व्यवसायिक योगदाना साठी भारत सरकारने त्यांना पदमश्री देऊन गौरवले आहे.
त्यांचे पार्थिव शरीर दिनांक १८ सप्टेंबर २३ रोजी अनंतात विलीन झाले.
अशा ह्या महान, दुरदर्शी, समाजसेविकेला माझी विनम्र श्रद्धांजली.
माधव भोळे
Sunday, August 13, 2023
बारसु चा विरोध बघत
बारसु चा विरोध बघता खालील प्रश्न मनात येतात:
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक गावात कमीतकमी 2 ते 3 सामाजिक मंडळे आहेत. या सर्वांची काही असोसिएशन वगैरे आहे कां?
जर असेल तर त्यांनी आपापल्या गावचा विकास सोडून, संपूर्ण तालुका किंवा जिल्ह्याचा विकास होण्यासाठी कोणता प्रकल्प आणण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत का? सरकारी योजना गावोगावी समजावून सांगण्यासाठी आणि त्याचा लाभ घेण्यासाठी काही मार्गदर्शन केले आहे कां?
मोठ्या प्रमाणात सहकारी तत्वावर किंवा इतर पद्धतीने
1) फूड प्रोसेसिंग
2) मत्स्योत्पादन आणि एक्स्पोर्ट
3) मधुमक्षी पालन
4) रेशीम किडा पालन
5) मसाला झाडें लागवड
6) कॉफी लागवड
7) रंगीत मासे पालन आणि प्रोजोत्पादन तसेच एक्स्पोर्ट
8) इतर पर्यावरण पूरक प्रकल्प
9) वृक्षारोपण
इत्यादी प्रकल्पासाठी काही प्रयत्न झाले कां?
फक्त कारणे देऊन उपयोग नाही, विरोध करून उपयोग नाही तर कोकण विकासासाठी पर्याय हवाच...
अँटी कॅथी वुड गुंतवणूक सूत्र:
अँटी कॅथी वुड गुंतवणूक सूत्र:
आज एक बातमी वाचली. अदानीच्या फॅमिली ट्रस्ट ने रू. 15, 446 करोड ( $ 1.87 बिलियन) किमतीचे अदानी एंटरप्राईसेस, अदानी पोर्ट, अदानी ग्रीन, अदानी ट्रान्समिशन ह्या कंपन्यांतील स्वतःचे मालकीचे सरासरी सुमारे 3.5% समभाग GQG पार्टनर ( ग्लोबल क्वालिटी ग्रोथ) ह्या अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन स्टॉक एक्सचेंज नोंदणीकृत मालमत्ता फंडला विकले. अदानीचे हे चारही समभाग गेल्या 2 महिन्यात 50 ते 70 % ने घसरले होते. GQG partners जगभरात 92 बिलियन डॉलरचा फंड मॅनेज करतो. त्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी राजीव जैन असून त्यांना या विषयातील 22 वर्षाचा अनुभव आहे. जैन ह्या फंडचे प्रवर्तक आहेत.
त्यांच्याबद्दल लिहिताना पत्रकार लिहितो की ते अँटी कॅथी वुड गुंतवणूक सूत्र वापरतात. काय आहे हे अँटी कॅथी वुड सूत्र? अँटी कॅथी वुड ह्या ए. आर. के. इनोवेशन ई.टी. एफ. फंड चालवतात. हा एक फोकस फंड आहे. ज्या वेळी इंटरनेट, कॉम्पुटर, नवीन टेक्नॉलॉजी ह्या विषयात शेयर मार्केटमध्ये तेजी होती तेव्हा ह्या टेक्नॉलॉजी फंडाने खूप कमाई करून दिली. करोना नंतर गेले 2 वर्ष अमेरिका आणि युरोपमधील मंदी, महागाई आणि युक्रेन युद्ध या मुळे टेक्नॉलॉजी शेयर मध्ये झालेली घसरण या विरुद्ध मूलभूत किंवा पारंपरिक व्यवसायाला आलेली मागणी या मुळे त्या शेयर मध्ये भरभराट दिसून आली. भारतात सुधा पेटीएम, झोमॅटो, नायका, सारख्या टेक्नॉलॉजी कंपन्यांचे भाव घसरले. अमेरिकेत अनेक टेक्नॉलॉजी कंपन्यांमध्ये लोकांना कामावरून काढून टाकले गेले.
आता अमेरिकेत अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजी फोकस गुंतवणुकीला कॅथी वुड गुंतवणूक सूत्र म्हणतात. पारंपरिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हे एक नवीन "अँटी कॅथी वुड सूत्र असे घोषवाक्य तयार केले आहे.
GQG partners च्या राजीव जैन यांचे मते अदानी यांचे वरील कंपन्यांचे सद्याचे मूल्य गुंतवणूक करण्यायोग्य असून त्यांच्या कंपन्या पुढे अपेक्षित काम करू शकतील असा त्यांना विश्वास वाटतो. तसेच त्यातील बहुतांश पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या असल्यामुळे त्या भारताला आवश्यक असलेल्या प्रगतीसाठी दमदार कामगिरी करू शकतील.
एक लक्षात घ्या राजीव जैन जरी भारतीय वंशाचे असेल तरी ते एक मुरब्बी गुंतवणूक तज्ञ असून 92 बिलियन डॉलरचा फंड सांभाळत आहेत. लाँग टर्म गुंतवणुकी वर त्यांचा विश्वास आहे. काल ही बातमी आल्यानंतर त्याचा ताबडतोब परिणाम म्हणजे ऑस्ट्रेलियन शेयर मार्केट मध्ये GQG partners चा शेयर 3.02% ने कमी झाला. परंतु असे खाली वर मार्केट होतच असते. गेल्या 3 वर्षात हा शेयर 7.52% सरासरी परतावा देत होता जो अमेरिकन किंवा ऑस्ट्रेलियन बाजाराच्या मानाने चांगला आहे परंतु गेल्या महिन्यात त्याने -2.43 परतावा दिला आहे.
माझ्यामते व्यक्तिगत गुंतवणूकदारांनी कोणत्याही एका सेक्टरवर अवलंबून न राहता 5 ते 7 मुख्य प्रगतिशील सेक्टर मधील चांगले शेयर आपल्या पदरी ठेवले आणि त्याचा वेळोवेळी रिव्ह्यू घेतला तर नक्कीच फायदेशीर होईल.
माधव भोळे
मातृदिन mothers day विशेष:
मातृदिन mothers day विशेष:
आज 14 May म्हणजे mothers डे.
खरोखरच कल्पना चांगली आहे. ज्या मातेने आपल्या भविष्याची आणि प्राणाची परवा न करता आपल्याला वाढवले तिची आठवण अथवा तिचा सन्मान करणे हे आपले कर्तव्यच आहे.
पण मातेला वृद्धाश्रमात ठेवून मदर्स डे च्या शुभेच्छा देणारे, ५ मुले किंवा मुली असताना प्रत्येक मुलगा किंवा मुलगी ७३ दिवस सांभाळणार म्हणून मातेचा हिशोब करणारे, आईने किंवा वडिलांनी बहिणीला सुधा इस्टेटी मधील वाटा दिला म्हूणन त्यांचा छळ करणारे किंवा मुलीने सुधा पालकांचा सांभाळ करायला हवा म्हणून नवऱ्याला बजावणाऱ्या सुना मी बघितल्या आहेत.
हे जिवंत पणी ज्यांना भोगायला लागले तरीसुद्धा माझ्या मुला नातवंडांचा संसार सुखाचा होवो म्हणून त्यांना आशीर्वाद देणारे ते पालक खरोखरचं धन्य मानायला हवेत. आपणही कधी वृद्ध होऊ शकतो आणि आपल्यावर सुद्धा अशी वेळ येऊ शकते याचे भानच अशा वाईट वागणाऱ्या मंडळींना नसते.
नुसता पैसा असला म्हणजे सर्व जग जिंकले असे वाटणारी ही मंडळी ज्यावेळी आजारी पडतात त्यावेळी त्यांना त्यांची सर्व कर्म आठवतात.
कोणतीही अपेक्षा न ठेवता, आपले सर्वस्व वाहून जे पालक आपल्या मुलांना लहानचे मोठे करतात, त्या सर्व पालकांना माझा नम्र प्रणाम.
माधव भोळे
मेडिक्लेम विमा योजना हा एक तारणहार आहे
माझा एक मित्र आहे, प्रत्येक पैसा विचार करून खर्च करणारा. त्याच्या मते मेडिक्लेम पॉलिसी ही चांगली गुंतवणूक नाही, म्हणून तो आपल्याच नातेवाईक असलेल्या विमा प्रतिनिधीला नेहमी टाळायचा.
आठ दिवसा पूर्वी अचानक त्याच्या वडिलांना अर्धअंगाचा चा झटका आला (आपत्ती कधी सांगून येत नाही). खाजगी रुग्णालयात गेला, पहिल्याच दिवशी 25 हजार उडाले, म्हणून मुंबईतील मोठ्यातल्या मोठ्या सरकारी रुग्नग्णालयात गेला. 5 दिवस कारभार बघितला, तोबा गर्दी, पेशन्टकडे दुर्लक्ष, दोन दोन वेळा टेस्ट साठी वेळा निश्चित होऊन सुद्धा आयत्या वेळी रद्द, त्यामुळे पेंशनट आणि नातेवाईकांना होणार शारीरिक आणि मानसिक त्रास. त्यात ट्रीटमेंटच्या हलगर्जीपणा मुळे झालेले रोग्याचे आबाळ हे बघितल्यावर पुन्हा खाजगी रुग्णालयात हलवणे आणि त्याचे लाखात बिल. हे लक्षात घेता आता तरी त्याला पटले असावे.
मेडिक्लेम विमा योजना हा एक तारणहार आहे. (मी विमा दलाल नाही परंतु फेसबुक वर अनेक वेळा ऑपरेशनला अमुक लाख खर्च झाला त्याला मदत करा वगैरे पोस्ट वाचतो आणि प्रत्यक्षात आलेला अनुभव याचा ताळमेळ घालावा म्हणून टाकलेली पोस्ट. पुढच्या ला ठेच, पाठचा शहाणा !!!, हेल्मेट सक्ती सुद्धा असेच आहे, अपघातापासून संरक्षण. लक्षात ठेवा हेल्मेट नसेल तर मेडिक्लेम पास होत नाही).
सत्य घटनेवर आधारित.
माधव भोळे
मी मराठी व्यवसाईकाबद्दल लिहिलेले कोणाला तरी आवडले नाही.
मी मराठी व्यवसाईकाबद्दल लिहिलेले कोणाला तरी आवडले नाही.
ठीक आहे कोणाला पाण्याचा ग्लास अर्धा भरलेला वाटतो, तर कोणाला तो अर्धा रिकामा वाटतो. इंग्रजी मध्ये म्हण आहे "beauty is in beholders eyes" म्हणजे बघणार्याच्या दृष्टीकोनावर औलंबून आहे. आपल्याला वाटते मराठी व्यवसाईकाने खूप मोठे व्हावे म्हणून हा खटाटोप.
पर्वा दादरच्या जुन्या प्रसिद्ध मराठी कापडाच्या दुकानात गेलो होतो पितांबर घ्यायला सर्व किमती छापील लावल्या होत्या. आम्ही दोन पितांबर म्हणून रुपये 3,500 चा माल घेतला. शेटजींना म्हटले काही कमी करा. एक नाही दोन नाही सरळ 3500 चे बिल प्रिंट करून हातावर ठेवले. मी त्यांच्या हातावर 3450 ठेवले. त्यांनी सांगितले आणखी 50 ध्या. शेवटी मी विचारले अहो एव्हडा माल घेतला काहीतरी कमी करा. ते म्हणाले एक रुपया कमी होणार नाही.
मला वाटते याना शाळेत / कॉलेजात अंकगणितात डिस्काउंट, वोल्युम डिस्काउंट, व्हॅल्यू डिस्काउंट, कस्टमर रिलेशनशिप कशी सांभाळायची याचे शिक्षण नसावे. या उलट आमच्या मालाडला बिल दिल्यानंतर सुद्धा (परप्रांतीय) शेटजी एवढया रकमेत 50 कमी दिले तरी घेतो आणि उलट हसत सांगतो, दोन आठ्वद्यांनी दिवाळीचा नवीन माल येणार आहे तेव्हा एक चक्कर टाका. अहो शोधले तर अशी दहा दुकाने असतील. कोण कशाला झक मारायला दादर ला त्याची आठवण करेल. ते असेच आठवणीत राहतील "आमची कोठेही शाखा नाही" सारखे.
माधव भोळे
Subscribe to:
Posts (Atom)