Saturday, September 5, 2026
ईश्वर आणि विधिलिखित
ईश्वर आणि विधिलिखित
फेसबुकवर गणेश सुवर्णा तुकाराम ह्या व्यक्तीचा लेख वाचला. तो लिहीत होता तो देवधर्म मानत नाही, तो कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी मांसाहार करतो इत्यादी स्वतःची फुशारकी मारत होता आणि त्यासाठी कारणमिमांसा करताना त्याने आपल्या जीवनातील काही कटू प्रसंग दिले होते. त्याला मी दिलेले उत्तर.
उत्तर :
ईश्वर आणि विधिलिखित ह्या दोन गोष्टी ज्याला समजल्या तो असे कधीच लिहिणार नाही.
ईश्वर जग्गनियंता आहे. आईन्स्टाइन म्हणतो मी देवाला मानत नाही परंतु तो म्हणतो की अशी एक शक्ती आहे जीं जगाचे नियंत्रण करते. त्यालाच सामान्य लोक ईश्वर म्हणतात. देवाची उपासना म्हणजेच ईश्वराचे आभार मानण्याची प्रक्रिया. मटण चिकन खाऊन ना तुम्ही बाटत ना ईश्वर बाटत . तुम्ही आपल्याजागी तो आपल्या जागी बरोबर. ज्याचा जसा आहार तसा त्याचा नैवध्य हीं संकल्पना हिंदू धर्माला मान्य आहे. बंगाली लोक मासे शाकाहारी मानतात. ज्या एकविरा देवीला ब्राह्मण शाकाहारी नैवेद्य दाखवतात त्याच एकविरा देवीला कोळी बोकड कापून मांसाहारी निवेद्य दाखवतात. ईश्वर कोणावरही रागवत नाही. जर एखादा देव कोपत असेल तर लोक त्याला पूजणार नाहीत.
सर्व धर्मात ईश्वर हीं माणसाने सदाचारी वागण्यासाठी तयार केलेली एक संकल्पना आहे. आपल्या पूर्वजांनीं तो एक आदर्श मानवजाती समोर ठेवला आहे.
आपण जीवनातील कटू प्रसंगासाठी देवाला दोषी धरता पण चांगल्या प्रसंगासाठी त्याचे आभार मानता का? की चांगले ते माझ्या कर्तृत्वामुळे आणि वाईट ते ईश्वर कोपामूळे असा आतबटयाचा व्यवहार ईश्वराशी करता?
आता विधिलिखित म्हणाल तर ते अटळ आहे. ना ते कृष्णाला चुकले ना रामाला. सावरकर देवांना मानत नव्हते आणि गांधीजी ईश्वर अल्ला एक आहे म्हणून मानत होते तरी सावरकरांना जन्म ठेप झाली त्यातून ते सुटले आणि ८२ वर्ष जगले आणि गांधीजींची ७८ व्या वर्षी हत्या झाली.
विधिलिखित कोणीहीं टाळू शकत नाही. ईश्वराला एव्हड्याचसाठी पुजायला हवे की ८४ लक्ष योनीमधून सर्वोत्तम प्रगत असलेला मानवी जन्म आपल्याला मिळाला म्हणून. आणि या साठी आपण जेथपर्यंत जिवंत आहोत तेथपर्यंत आपण त्याचे ऋणी आहोत हे मानायला हरकत नाही. आता कोणी कृतघ्न असतील तर ती त्यांची मर्जी.
बाकी सर्व लोक आपापल्या सोयीनुसार लालबागच्या राजा पासून शिर्डीचे साईबाबा आणि तिरुपती बालाजी ला काही रुपया, दागिन्या पासून करोडो रुपये अर्पण करतात ते फक्त देवाशी सौदा करण्याचा प्रयत्न करतात. पण देव थोडाच कच्चा व्यापारी आहे की तुम्ही त्याला एक नारळ द्याल आणि तो तुम्हांला दीर्घायुष्य देईल.
बाकी तुम्ही जे सर्व लिहिलेत तो फक्त अहंकार. तुम्ही स्वीकारून किंवा नाकारून देवाचे अस्तिव सिद्ध होत नाही.
माधव भोळे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment