Tuesday, September 29, 2026
वीर येथे पर्यटनासाठी संधी!
वीर येथे पर्यटनासाठी संधी!
लवकरच वीर काजूर्ली पूल मान्य होऊन पुढील २ वर्षात म्हणजे २०२९ चे आधी काम पूर्ण होईल अशी आशा करूया.
ह्या पुलामूळे गणपतीपुळे, जयगड आणि कोळीसरे येथील पर्यटक, राई भातगाव पुला मार्गे काजूर्ली जुगाई देऊळ करत वीर बंदर आणि देवपाट मार्गे वहाळ येथे जातील.
श्री लक्ष्मी मल्लमर्दन मंदिर आणि देवपाट धबधबा ह्यांचे खूप मार्केटिंग झाले आहे. त्यात श्री संदेश पांडुरंग वीरकर यांनी केलेल्या गणपती डेकोरेशन देखव्या मूळे वीर गावाचे पर्यटन विषयक महत्व अजून अधोरेखित झाले आहे.
आता श्री लक्ष्मी मल्लमर्दन मंदिर, वीर देवपाट धबधबा, वीर नौकानयन, कातळ शिल्प, इत्यादी गोष्टीना लोक आवर्जून भेट देतील.
त्यांच्यासाठी बौद्ध वाडी सपाटी, ब्राह्मणवाडी सहाण, वर जावळे वाडी कातळ येथे टेन्ट व्य्वस्था करणे शक्य होईल का याचा विचार करायला हरकत नाही.
सहाणेवर एक राईस प्लेट खानावळ आणि एक कॉफ़ी शॉप किंवा फास्ट फूड कॉर्नर उभारले जाऊ शकते.
तसेच ज्यांना शक्य असेल ते आपली घरे दुरुस्त करून रंग रांगोटी करून तेथे होमस्टे चालवतील..
संधी नेहमी आपल्या समोर असते. पण ती ओळखता आली पाहिजे.
माधव भोळे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment