अर्थव्यवस्थेचा थर्मामीटर
गेल्या काही वर्षांमध्ये गणपती, नवरात्री, दिवाळी आणि होळी यां हिंदूंच्या मुख्य सणानमध्ये बाजारात आलेली गर्दी बघितली तर लक्षात येईल की भारतीय अर्थव्यवस्थेला किती झळाली आली आहे.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिल च्या आकड्यानुसार २०२४ भारतीय ग्राहकांनी ८०३ टन सोने विकत घेतले. २०२१ पासून दरवर्षी साधारण ७५० ते ८४० टन सोने भारतीय ग्राहक विकत घेत आहेत.
नुसत्या जी एस टी बचत उत्सवाच्या पहिल्या ८ दिवसात ( नवरात्रामध्ये ) एकट्या मारुती सुझुकी ने १.६५ लाख गाड्या विकल्या आणि त्यांच्याकडे ४.५ लाख गाड्यांचे बुकिंग आहे.
यां वर्षी गणपती उत्सवात महाराष्ट्रात ४५ ते ५०,००० कोटींची उलाढाल झाली, तर गेल्या वर्षी फक्त होळी मध्ये भारतात ६०,००० कोटींची उलाढाल झाली. नुसत्या दिवाळीमध्ये जवळजवळ १५,००० कोटीचे फटाके वाजवले जातात.
गेल्या काहींवर्षात GST कलेक्शन सरासरी ९.४% ने वाढले असून गेल्या वर्षीचे वार्षिक कलेक्शन २२.०८ लाख कोटी रुपये झाले आहे. २०२५ मध्ये महिना सरासरी २ लाख कोटी GST कलेक्शन आहे.
आता सांगा भारताला डेड इकोनॉमि म्हणणाऱ्या अर्थ तज्ञाला परत शाळेत जायला नको का?
जळगाव ला महाराष्ट्राची सोनेरी राजधानी म्हणतात. महाराष्ट्रात सर्वात जास्त सोने जळगाव येथे विकले जाते.
माधव भोळे
No comments:
Post a Comment