भारतीय राष्ट्रवादी श्यामजी कृष्ण वर्मा ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देणारे पत्र इंग्लंडच्या टाइम्स वृत्तपत्रात लिहिले म्हणून ईनर टेम्पल ( बारिस्टर ची पदवी देणारे कॉलेज) ने ३० एप्रिल १९०९ रोजी त्यांना बार मधून काढून टाकले होते. पुढे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ नोव्हेंबर २०१५ रोजी इंग्लंडच्या दौऱ्यावर गेले त्यावेळी दिल्लीतील एका वकिलांच्या पत्राची दखल घेत ईनर टेम्पल ने वर्मांवर अन्याय झाला हे मान्य करत, बार मध्ये दिनांक ९ नोव्हेंबर २०१५ रोजी परत मनाचे स्थान दिले आणि तसे सर्टिफिकेट श्री मोदी ना हस्तांतररीत केले. याच श्यामजी कृष्ण वर्मा नि इंग्लंड येथे भारतीय विद्यार्थ्यांसाठी इंडिया हाऊस नावाचे वसतिगृह उघडून वि. दा. सावरकर, मदनलाल धिंग्रा, भिकाजी कामा, सेनापती बापट सहित अनेक भारतीय क्रांतिकारी विध्यार्थ्यांना आसरा दिला होता. या वर्मा यांचे नावे गुजरातच्या कच्छ भागात "क्रांतिगुरु श्यामजी कृष्ण वर्मा, कच्छ युनिव्हर्सिटी" श्री. नरेंद्र मोदी गुजरात चे मुख्यमंत्री असताना स्थापन झाली आहे.
माधव भोळे
No comments:
Post a Comment