माझ्या ओळखीत काही लोक मला CSR फ़ंडा बद्दल माहिती विचारत असतात, त्या समबंधी खुलासा.
उद्योग जगतातील सामाजिक जबाबदारी निधी. (CSR fund).
कम्पनी कायदा 2013 च्या बदलाप्रमाणे, ज्या भारतीय कम्पन्यांचे निव्वळ मूल्य 500 कोटी रुपये आहे, किंवा ज्यांची वार्षिक उलाढाल 1000 कोटी आहे. किंवा ज्यांचा निव्वळ वार्षिक नफा रु 5 कोटी आहे, अशा कम्पन्यांनि आपल्या मागील 3 वर्षीच्या सरासरी नफ्याच्या कमीतकमी 2% रक्कम खालील सामाजिक कार्यासाठी बाजूला काढून खर्च करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास त्यासाठी लागणारे भुर्दंड सुद्धा त्या कायद्याने तयार केले आहे.
या कायद्या अंतर्गत, खालील कामे करण्यास मंजुरी देता येते. यासाठी स्थानिक प्रकल्पना प्राधान्य देणे आवश्यक आहे.
१) अतिभूक मुक्ती आणि अतिगरिबी मुक्तीसाठी केले जाणारे प्रयत्न.
२) शैक्षणिक उत्थान
३) महिला सशक्तीकरण आणि लिंगभेद निर्मूलन
४) लहानग्यांच्या मृत्युदर कमी करणे
५) गरोदर मातांचे स्वास्थ्य
६) औषध आणि योग्य आहार संतुलन आणि व्यायामाद्वारे रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे, एड्स, मलेरिया आणि तत्सम रोगांवर रोगप्रतिबंधक उपाय योजना आणि रोगांचा प्रसार कमी करण्यासाठी केले जाणारे उपाय.
७) पर्यावरण समतोल राखणे.
८) कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. तसेच सामाजिक व्यवसाय कामे उपलब्धी ( social business projects. याचा नक्की अर्थ मला सुद्धा समजला नाही आहे)
९) पंतप्रधान किंवा राज्य प्रमुख यांनी वरील कामासाठी किंवा समाजातील दुरबल घटकांच्या विकासासाठी तयार केलेल्या फंडाना मदत करणे.
माधव भोळे.
No comments:
Post a Comment