आजकाल अर्धवट शिकलेली मंडळी राजकारण करताना विचारत असतात, फडणविसाना शेतीतील काय कळते? मोदी अर्थ तज्ञ नाहीत, गडकरी इंजिनियर नाहीत वगैरे, अर्थात अशाच आशयाचे प्रश्न विरुद्ध पक्षातील लोक सुद्धा इतरांबद्दल बोलताना करित असतात.
मला त्या मंडळींना एक सोपी गोष्ट सांगायची आहे, बघा समजते का.
पहिली गोष्ट आज एवढे राजकीय पुढारी आहेत ज्यांनी 1 ली पासून अगदी MBBS, MBA, MTech पर्यंत शिक्षण संस्था काढल्या आहेत ते थोडेच सर्व शिकले आहेत? पण त्यातील अनेकजणांनी चांगले शिक्षक दिमतीला ठेवले, त्याना पगार, मान मरातब, हुद्दा दिला, आहे. त्यामूळे ते शिक्षणतज्ञ होण्याची आवश्यकता नाही.
एकदा हेनरी फोर्ड (फोर्ड गाड्यांच्या कंपनीचा मालक), त्यावर एका वकिलांनी केस केली, की हेनरी फोर्ड इंजिनिअर नाही तर एवढा गाड्यांचा कारखाना कसा चालवतो?
केस चालू झाली, वकिलाने विचारले, तुला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधले काय समजते, फोर्ड ने एक पोर्टेबल टेलिफोन एक्स्चेंज आणला होता, त्याने तो टेलिफोन आपल्या कम्पनीच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटला लावला म्हणाला, तेथील मुख्य इंजिनियर ला म्हणाला, या वकीलाना काय पाहिजे ती उत्तर दे. वकिलाने दुसरा प्रश्न दुसऱ्या डिपार्टमेंट चा विचारला, फोर्डने परत तेच केले.
शेवटी जजने विचारले तुला काय सांगायचे आहे? फोर्ड म्हणाला इंजिनिअरिंग कारखाना काढण्यासाठी मी इंजिनिअर असण्याची आवश्यकता नाही. मी अनेक इंजिनियर नोकरीवर ठेवून त्यांचेकडून मला पाहिजे ते योग्य काम योग्य तऱ्हेने करून घेऊ शकतो की नाही ही पात्रता माझ्यात आहे किंवा नाही हे महत्वाचे.
भारतातील सर्वात मोठा पेट्रोल रिफायनिंग कारखाना सुरू करणारे आणि चालवणारे स्व. धीरूभाई अंबानी पेट्रोलियम इंजिनियर नव्हते हे लक्षात घ्या.
त्या मुळे असले निरर्थक प्रश्न ज्या सुपीक डोक्यांच्या लोकांकडून येतात त्यांना माझा साष्टांग नमस्कार.
माधव भोळे
No comments:
Post a Comment