Monday, July 24, 2023

एक नाडी दोष रद्दबातलं असणेबाबत विवेचन:

एक नाडी दोष रद्दबातलं असणेबाबत विवेचन: आज काल लोक विवाह गुण मिलन करताना तज्ञ ज्योतिषाकडे न जाता कॉम्पुटरवर गुण मिलन करतात. असे लक्षात येते कि वधू आणि वर यांची नाडी एक आली कि त्याला दोष मानून त्याचे शून्य मार्क धरले जाते. गुण मिलनात नाडीला ८ मार्क आहेत. अशा वेळी एकंदर ३६ गुणापैकी नाडीचे ८ मार्क आपोआप कमी होतात. या बाबतीतील अपूर्ण ज्ञानामुळे अनेक लोक एक नाडी म्हणून स्थळें नाकारतात. पण ते शास्त्रीय दृष्ट्या योग्य नाही. ज्योतिष शास्त्रमध्ये वधू वरांच्या पत्रिका बघताना त्या एक मेकांना पूरक आहेत किंवा नाहीत हे बघितले जाते. या विरुद्ध सर्वच गोष्टी सारख्या असतील आणि ३६ गुण जुळत असतील तरीसुद्धा ते निषीद्ध मानले आहे, कारण येणाऱ्या अडचणी किंवा चांगला काळ एकाच वेळी आल्यामुळे त्या विवाहात समतोल राहत नाही. हीच कल्पना सर्व विषयात राबवली आहे. नाडी दोषाला सुद्धा काही अपवाद आहेत. ते खालील प्रमाणे: वधू वरांमध्ये खालील स्थिती असल्यास दोष मानला जात नाही. १) एकच जन्म राशीं पण वेगवेगळे जन्म नक्षत्र, (२) एकच नक्षत्र पण वेगवेगळ्या राशी, (३) एकच नक्षत्र पण वेगवेगळे चरण (४) जरी नक्षत्र एक आणि एक चरण सुद्धा एक असले तरीसुद्धा भरणी, कृतिका, रोहिणी, मृगाशिरा, अर्द्रा, पुष्य, विशाखा, श्रवण, घनिष्ठा, पूर्वा भाद्रपदा, उ. भाद्रपदा आणि रेवतीमध्ये जन्माला आल्यावर नाडी दोष राहत नाही. (५) कन्येच्या नक्षत्रातून मधली नाडी नसेल तर पार्श्व नाडीवर दोष नसतो. या विषयात योग्य गुण मिलन करायचे झाल्यास onlinejyotish ही वेबसाईट जीं जास्तीजास्त अचूक गुणमिलन देते. Madhav Bhole

No comments:

Post a Comment