Tuesday, November 23, 2021

त्र्यंबकेश्वर, एक आठवण

 एक आठवण 


एकदा मी त्र्यंबकेश्वर येथे गेलो होतो. देवरूखे ज्ञातीचे तेथिल उपाध्याय (कै) श्री सदाशिव हरी सरडे गुरुजी यांचेकडे वास्तव्याला होतो. सहज त्यांच्या स्वागत कक्षात ( ओटीवर) बसलो असता एक मोठा काळा पांढरा फोटो तेथे टांगला होता. ( आता त्यांची तीन मजली इमारत आहे त्याच्या बाजूलाच हे त्यांचे जुने घर आहे त्याच्या ओटीवर). 

नीट निरखून पाहिले तर फोटोच्या मध्यभागी स्वतः (कै) सदाशिव हरी सरडे गुरुजी ( सध्याच्या गुरुजींचे पिताश्री ज्यांना मी भेटलो त्या वेळी ते अतिशय वयस्कर होते), त्यांच्या बाजूला आमचे भाईबंद वेदशास्त्र संपन्न कै. दत्तात्रय श्रीधर भोळे तसेच ज्ञातीतील बरेच प्रतिष्ठित व्यक्ती, त्या पैकी मी ओळखत असलेले कै परशुराम भाऊ महाजन ( धनी माधवाश्रम), कै शंकर नारायण कानडे ( श्रीनिवास कानडेचे पिताश्री ) आणि जवळजवळ 20-25 देवरूखे मंडळी. 

मी त्या सरडे आजोबांना विचारले की हा फोटो आपण इथे लावण्याचे काय कारण? ते म्हणाले आता जे घर आहे त्या जागी आमचे एक पिढीजात घर होते. एकदा गोदावरी नदीला ( जीचा उगम त्रंबकेश्वर येथून होतो) खूप मोठा पूर आला होता आणि त्यात अमचे ते पूर्वापार घर पूर्ण वाहून गेले. त्यावेळी वे. शा. संपन्न दत्तात्रय श्रीधर भोळे यांनी ७ दिवस मुंबईत भागवत सप्ताह केला आणि त्याला सर्व देवरूखे मंडळींनी प्रतिसाद देऊन मला खूप आर्थिक आणि इतर मदत केली आणि त्यामुळेच आज हे घर उभे आहे. ज्या मंडळींनी त्यात पुढाकार घेतला हा त्यांचा फोटो आहे. देवरूखे ज्ञातीचे माझ्या कुटूंबियांवर खूप उपकार आहेत,  हे मी कधीच विसरू शकणार नाही.

मला फार आनंद झाला की अशा कठीण प्रसंगी आपली ज्ञाती कोणाला तरी उपयोगी आली आणि त्याचे नेतृत्व माझ्या एका भाईबंदाने केले. लोक त्यांना दत्तूशास्त्री भोळे म्हणत. ते गिरगावातील कोळीवाडी मध्ये आमच्या पिताश्रींची खोली ज्या इमारतीत आहे त्याच इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर रहात असत. अतिशय विद्वान आणि स्पस्ट वक्ते. ह्यांचे मूळ गाव वीर होते आणि आमच्या घराजवळच त्यांचा घरवंद आहे. ( दुसरे सुद्धा एक दत्तूशास्त्री भोळे होते ते सुद्धा गिरगावात अनंत ऋषींचे वाडी रहात होते आणि तेथील श्री रामाच्या देवळात पुजारी होते त्यांना टोपण नाव गोरा दत्तू असे होते. ते वेगळे).

देवरूख्यांची पहिली वेद शाळा सुद्धा वीर येथे आमच्याच जमिनीत असलेल्या घरात स्थापन झाली आणि ज्ञातीतील अनेक वैदिक ब्राह्मण पूर्वी वीर मधून शिकून गेले याचा मला अभिमान आहे.

डिक्शनरी वाले वीरकर तर सम्पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.

माधव भोळे

Friday, October 1, 2021

काश्मीर, थोडक्यात ओळख:

काश्मीर, थोडक्यात ओळख:

अशी आख्यायिका आहे की पुराण काळात, भारताच्या उत्तरेला असलेल्या अतिशय मोठ्या सरोवरामधून कश्यप मुनींनी काही भूभाग तयार केला, त्यावेळी त्या भूभागाला कश्यपमर असे नाव दिले गेले, पुढे अपभ्रंश होत ते काश्मीर झाले.

 

भौगोलिक स्थान:

काश्मीरच्या ईशान्येला आकसाई चीन हा चीनच्या अधिपत्याखाली असलेला प्रदेश असून त्यामध्ये मुसलमान बहुल्य झिंझियान हा ऊगुर वंशीय लोकांचा स्वायत्त प्रदेश आहे तर पूर्वेला तिबेट हा बौद्ध धर्मियांचा स्वायत्त प्रदेश आहे. हे दोन्ही, एके काळी बळकावलेले, चीनचे भौगोलिक भाग आहेत. पश्चिमेला पाकिस्तान तर वायव्येला अफगाणिस्तान चा काही भूभाग आहे. दक्षिणेला भारतातील हिमाचल प्रदेश आणि पंजाब चा भाग आहे.

 

काश्मीरचा बहुतेक भाग हा डोंगराळ असून, काश्मीर खोरे ( Kashmir Valley) हे पूर्वेकडे हिमालय आणि पश्चिमेला  पिर पंजाल पर्वतरांगामध्ये बसलेले आहे. 24 ऑक्टोबर 1947 रोजी, पाकिस्तानने बळकावलेला पाकव्याप्त काश्मीर ज्याला ते आझाद काश्मीर म्हणतात तो भूभाग, काश्मीर च्या उत्तरेला असलेला गिलगिट आणि बाल्टिस्थान हा पश्चिमेकडील भूभाग पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली आहे.  तर लडाख च्या पूर्वेला आकसाई चीन हा चीन ने बळकावलेला भाग आहे. आझाद काश्मीर आणि भारतीय काश्मीर हे दोन्ही निसर्गाच्या सौंदर्याने नटलेले आहेत. 

 

काश्मीरच्या उत्तरेला युरोप आणि आशिया खंडाच्या मधून ऑस्ट्रेलिया आणि भारताला जोडणारा  भूगर्भातिल एक तुकडा ( Techtonic plate) हळूहळू वेगळा होत आहे आणि ही प्रक्रिया गेले 5 कोटी वर्ष सुरू आहे. याची एक झलक सन 2005 मध्ये मोठया प्रमाणात भूकम्पाचे धक्के बसून दिसून आली. त्यावेळी पाक व्याप्त काश्मीर मधील झेलम आणि नीलम नदीच्या संगमावर बसलेले आझाद काश्मीर मधील सर्वात मोठे मुझ्झफराबाद हे शहर पूर्ण  भुईसपाट झाले. सम्पूर्ण हिमालय हा ज्वालामुखीवर उभा आहे. त्याच्याखाली भूमीच्या पोटात काही प्रमाणात हालचाली ( sesmic activities) सुरूच असतात.

 

काश्मीरची संस्कृती: 

कित्येक शतके हिंदू शैव संस्कृती जपणाऱ्या या प्रदेशामध्ये 3ऱ्या शतकात सम्राट अशोकाने ( मौर्य साम्राज्य) बौद्ध धर्माचा प्रसार केला, तोच प्रसार पुढे अफगाणिस्तान आणि चीन पर्यंत गेला. काश्मीरची श्रीनगर ही राजधानी त्यानेच बसवली आणि त्याचे नाव श्रीनगरी असे ठेवले. या आधी काश्मीर मध्ये सम्राट अशोकाचे आजोबा सम्राट चंद्रगुप्त मौर्य हे राज्य करत होते. मोर्या नंतर पुढे 625 CE मध्ये काराकोटा साम्राज्य आणि 855 CE उत्पल साम्राज्याने या भूभागावर राज्य केले. 

 

8 व्या ते 9 व्या शतकाच्या मध्ये कधीतरी आदी शंकराचार्यांनी सध्याच्या आझाद काश्मीर मध्ये नीलम नदीच्या किनारी असलेल्या  शारदापीठाला भेट दिली होती आणि त्यांनी त्या विद्यापीठामधील मीमांसा तसेच वेदांताच्या अभ्यासकांबरोबर धार्मिक चर्चा करून ती चर्चा जिंकून शारदापिठाचे दक्षिणेकडील दरवाजे अभ्यासाचे दृष्टीने खुले केले.

 

10 व्या शतकात श्रीनगर मधील प्रद्युमन पर्वतावर वशिष्ठ मुनी आणि श्री राम यातील झालेली प्रश्नोत्तरे  30,000 श्लोकांमध्ये गुंफून "मोक्षोपाय" नावाचा ग्रंथ तयार झाला. पुढे 11 ते 14 व्या शतकामध्ये याच मोक्षोपाय या ग्रंथाचे वेदांच्या चौकटीत बसवून तयार झालेला ग्रंथ हा "योग वशिष्ठ" म्हणून प्रसिद्ध झाला. 

 

काश्मिरचा इतिहास:

साधारण 1001 ( 10 व्या शतकात) ते 1320 पर्यन्त येथे हिंदू खासा जमातीचे "लोहारा हिंदू साम्राज्य" होते. 1313 मध्ये मीर कासीम हा सध्याच्या पाकिस्तानातील स्वाट प्रदेशातील व्यक्ती  त्यावेळचा लोहारा हिंदू राजा सहदेवचा सरदार म्हणून काम करू लागला. आपल्या कटकरस्थानाने आणि हुशारीने तो पुढे नावारूपाला आला. 

 

1320  साली राजा सहदेव आणि त्याचा भाऊ उदयनदेव च्या मृत्यनंतर मीर कासीम ने सहदेवाची पत्नी कोटाराणी हिला त्याची पत्नी होण्याची मागणी केली पण तिने ती स्पस्टपणे  नाकारली. त्यानंतर 1320 ते 1323 ह्या काळात काश्मीरच्याच लडाख प्रदेशातील लोहारा साम्राज्याचा जहागीर रिंचन हया मुसलमान राज्याने राज्य केले.  परत कोटा राणी ने आपल्या अवयस्क मुलाला गादीवर बसवून 1323 ते 1339 पर्यन्त काश्मीरवर राज्य केले. मीर कासीम ने 1339 ते 1342 या दरम्यान राज्य करून त्याने काश्मीरमध्ये मीर कासीम इस्लामिक साम्राज्याचा पाया घातला आणि हे इस्लामिक साम्राज्य पुढे 1561 पर्यन्त चालले. त्यामध्ये गिलगिट, बाल्टिस्तान, राजोरी, लेह या प्रदेशांचा समावेश होता.

 

या काळात काश्मीर मध्ये इस्लामची पकड मजबूत झाली. मीर कासीम आणि त्याच्या वारसांनी मध्य आशिया मधून मीर सय्यद अली हमदानी नावाचा इस्लामिक उलेमा ( धर्मगुरू) आणून काश्मीर मधील अनेक हिंदूंचे जबरदस्ती धर्मांतर करवले. पुढे त्याच्या मुलाने सुद्धा हेच कार्य केले. सन 1400 पर्यन्त काश्मीर मध्ये बहुतेक सर्व हिंदू मुसलमान झाले होते.

 

सन 1585 मध्ये दिल्ली दरबाराचा पातशहा अकबर याने काश्मीर मधील शिया सुन्नी वादाचा फायदा घेऊन काश्मीर आपल्या अधिपत्याखाली आणले आणि तेथून मुघल साम्राज्य काश्मीरमध्ये सुरू झाले. पुढे अकबराचा मुलगा जहांगीर याला काश्मीर चे सौंदर्य खूप आवडले आणि त्याने आपली २० वी पत्नी नूर जहा साठी  शालिमार बाग, निशात बाग ही प्रसिद्ध भव्यदिव्य गार्डन्स 1619 मध्ये तयार करवली जी मुघल गार्डन्स म्हणून प्रसिद्ध आहेत. ही पर्शियन गार्डन्स च्या धर्तीवर असून या मध्ये तलाव, कारंजी, कनाल ( पाणी प्रवाह), रंगी बेरंगी फुलझाडे, आणि विशेष म्हणजे आयताकृती लेआऊट चा समावेश असतो.

 

1751 ते 1819 पर्यन्त काश्मीर मध्ये अफगाणिस्तान मधील दुराणी साम्राज्याची सत्ता होती आणि त्याकाळात अफगाणी सत्तेने अतिशय क्रूरपणे काश्मीर मधील इस्लाम सोडून सर्व धार्मिक पंथ जवळजवळ नष्ट करून टाकले.

 

1819 साली लाहोर मधील शीख साम्राज्याचा राजा रणजित सिंह ने दुराणी साम्राज्याचा पाडाव करून काश्मीर आपल्या ताब्यात घेतले. सुरवातीला शिखांचे काश्मीर मध्ये स्वागत झाले परंतु शिखांनी मुस्लिम विरोधी कायदे पास करून तसेच त्यांच्या शेतीवर भरमसाठ कर लावून स्थानिक जनतेचा रोष ओढवून घेतला. 

 

1822 चे दरम्यान राजा रणजित सिंह च्या दरबारातील गुलाब सिंह नावाचा काश्मीर मधील डोग्रा जमातीचा हिंदू सरदार जो शीख साम्राज्याने जम्मू चा राजा म्हणून घोषित केला होता त्याने 1840 पर्यन्त काश्मीर च्या आजूबाजूचे कारगिल, लडाख, बाल्टिस्तान, राजोरी, किस्तावर इत्यादि भाग जिंकून आपल्या राज्याला जोडले.

 

लाहोरच्या शीख सम्राट रणजितसिंहने या आधी 1809 मध्ये ब्रिटिशांबरोबर एक करार करून अफगाणिस्तान जिंकण्यासाठी तसेच आपल्या आजूबाजूला असलेली इतर छोटी शीख राज्ये गिळंकृत करण्यासाठी आणि आपले स्थान बळकट करण्यासाठी एक करार केला होता तो अमृतसर करारनामा-१  म्हणून गणला जातो.

 

रणजितसिंह च्या मृत्यूनंतर 1845 मध्ये पाहिले ब्रिटिश - शीख युद्ध झाले. 1846 पर्यन्त गुलाबसिंह या युद्धापासून अलिप्त राहिला आणि जसे लाहोरच्या साम्राज्याचा पाडाव व्हायला लागला तसे मार्च 1846 मध्ये दोन करार करण्यास त्याने ब्रिटिशांच्या बाजूने मध्यस्ती केली. पैकी एका करतात लाहोरचा 7 वर्षाचा अवयस्क शीख राजा दिलीप सिंह आणि ब्रिटिश सत्तेमध्ये  गुलाब सिंह ने बियास आणि सिंधू नदीच्या मध्ये असलेल्या लाहोरच्या शीख साम्राज्याला एक कोटी रुपयांचा जातमुचलका म्हणून ओलीस ठेवून शीख साम्राज्य सुरक्षित ठेवले तर दुसऱ्या कराराने जम्मू आणि काश्मीर मधील काश्मीर चा पर्वतीय भाग आपल्या अधिपत्याखाली आणण्यासाठी ब्रिटिशांना 75 लाख नानक शाही रुपये ध्यायचे कबूल करून जम्मू आणि काश्मीर हे स्वतंत्र संस्थान म्हणून ब्रिटिशांकडून मान्य करवून घेतले. भारतातील इतर संस्थाने आणि संस्थानिकांप्रमाणे गुलाबसिंह चे जम्मू आणि काश्मीर संस्थान ब्रिटिशांचे मांडलिक झाले. 1857 च्या प्रथम स्वातंत्र्य लढ्यात गुलाब सिंह ने ब्रिटिशांना साहाय्य केले आणि त्याबदल्यात त्याचे देय असलेले 75 लाख रुपये ब्रिटिशांनी माफ केले.  पुढे गुलाब सिंह चा मुलगा रणबीर सिंह, रणबीर सिंह चा मुलगा प्रताप सिंह आणि प्रताप सिंह चा मुलगा हरी सिंह यांनी २६ ऑक्टोबर 1947 पर्यन्त डोग्रा जमातीचे राज्य जम्मू आणि काश्मीर मध्ये चालावले.

 

दुसरे महायुद्ध, भारताची फाळणी आणि काश्मीर चे भारतात विलीनीकरण: 

 

दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या जोरदार आक्रमणामुळे ब्रिटन रडकुंडीला आल्यानंतर अमेरिकेकडे मदत याचनेसाठी गेलेल्या ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेन राष्ट्राअध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट ( ज्यांना वयाच्या 39 व्या वर्षी कंबरेखाली पक्षघात झाला होता आणि ते कायमचे एका बाजूला कंबरेखाली अधू होते) यांच्यामध्ये 9 ते 12 ऑगस्ट 1941 रोजी अर्जेंटिना च्या नेव्हल बेस वर एक शिखर परिषद झाली. त्या मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर तयार होणारी वर्ल्ड ऑर्डर ( जागतिक व्यवस्थापन कसे करायचे) याचा उहापोह केला गेला. अमेरिका सुद्धा एकेकाळी ब्रिटिश वसाहत असल्यामुळे अमेरिकेने ठणकावून सांगितले कि जर जर्मन आक्रमक आहे तर ब्रिटन सुद्धा गेले कित्येक शतके जगभर आक्रमणच करत आहे. पुढील युद्धे टाळायची असतील तर ब्रिटनने आपल्याकडे असलेले सर्व आक्रमीत भूभाग आणि वसाहती सोडून देऊन तेथील जनतेला स्वतःचे राज्य चालवण्याचे अधिकार ध्यायला हवेत तसेच ब्रिटन या पुढे कोणावर आक्रमण करणार नाही याची ग्वाही तिने द्यायला हवी. परिषदेमध्ये नाईलाजाने का होईना, ब्रिटनने या गोष्टी मान्य केल्यामुळे अमेरिकेने ब्रिटनच्या बाजूने महायुद्धात उडी घेतली आणि दोस्त राष्ट्रे दुसरे महायुद्ध जिंकली.  या शिखर परिषदेमध्ये नाटो अलायन्स, गॅट, युनायटेड नेशन्स सारख्या नवनवीन संस्थांचा सुद्धा जन्म झाला. 14 ऑगस्ट 1941 रोजी केलेल्या या सर्व करारनाम्यांना अटलांटिक चार्टर-१ असे म्हणतात. 

 

त्याचाच एक भाग म्हणून दोस्त राष्ट्रांनी दुसरे महायुद्ध जिंकल्यानंतर भारताची सत्ता ब्रिटिशांनी भारतीयांना हस्तांतर करण्याचे ठरवले.  2 सप्टेंबर 1945 रोजी दुसरे महायुद्ध संपल्याचे जाहीर झाल्यानंतर वचनपूर्तीचा भाग म्हणून 16 मे 1946 रोजी भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबेटनने १९४६ च्या कॅबिनेट मिशनच्या सल्ल्यानुसार देशाच्या प्रमुख नेत्यांसमोर धर्मावर आधारित भारताच्या फाळणीचा प्रस्ताव ठेवला. प्रथम काँग्रेस ने फाळणीला विरोध केला आणि मुस्लिम लीग आणि इतर पक्षांनी त्याला मान्यता दिली. परंतु मोहमद अली जिनांच्या हट्टापायी काँग्रेसचा नाईलाज होऊन काँग्रेसने ही फाळणी मान्य केली. नेहरू आणि गांधीजी या फाळणीसाठी तयार नव्हते परंतु सरदार वल्लभभाई पटेलांनी लक्षात घेतले की जर हा तिढा सोडवायचा असेल आणि देशाला स्वातंत्र्य मिळायला हवे असेल तर फाळणीशिवाय पर्याय नाही. वल्लभभाईनि पुढाकार घेऊन गांधीजी, नेहरू आणि इतर काँग्रेसच्या नेत्यांना फाळणी मान्य करण्यास समजावून सांगितले. 

 

स्वातंत्र्यपूर्व भारताच्या हंगामी संसदेतील भारतीय  काँग्रेस, मुस्लिम लीग आणि शीख समुदायाच्या लोकनिर्वाचित प्रतिनिधींनी 3 जून 1947 रोजी भारताची फाळणी करण्याचे मान्य केल्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटने 18 जुलै 1947 रोजी “भारतीय स्वातंत्र्याचा कायदा-1947”  मंजूर केला.

 

२५ जुलै १९४७ रोजी लॉर्ड माउंटबॅटन यांनी संस्थानिकांच्या एका परिषदेला संबोधित केले कि आता ब्रिटन, ब्रिटिश भारतावरील आपले अधिपत्य सोडत असून आता तुम्ही पाकिस्तान किंवा भारत या पैकी कोणत्याही एका राज्याचा घटक बनू शकता.  शक्यतो आपण आपल्या सीमेला लागून असलेल्या राज्यात सामील व्हावे. परंतु हा सर्वस्वी तुमचा आणि तुमच्या प्रजेचा एकत्रित निर्णय असणार आहे.

 

 

भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य  मिळाले. हंगामी संसदेच्या विनंतीवरून शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन, १५ ऑगस्ट १९४७ ते २१ जून १९४८ पर्यंत स्वत्रंत भारतचे पहिले गव्हर्नर जनरल झाले. हे विभाजन मुस्लिम बहुल्य पश्चिम पंजाब, पूर्व बंगाल आणि हिंदू भारताच्या मुख्य भूमीचे होते. त्यामुळे या भूभागाचे दोन भाग झाले, एक इस्लामिक पाकिस्तान जो विभागलेला पश्चिम पंजाब, सिंध, बलुचिस्तान, पख्तुनिस्तान चा काही भाग आणि विभागलेला पूर्व बंगाल मिळून तयार झाला आणि उरलेला भाग भारत म्हणून तयार झाला. ज्यावेळी ब्रिटिश सत्ता सोडून गेले तेव्हा भारतामध्ये ब्रिटिश सरकारच्या थेट हुकमती खाली (under direct British rule) असलेला भारताचा भूभाग आणि इतर 565 संस्थाने होती. या सर्व संस्थानांमध्ये आपापले संस्थानिक राजे होते.

 

या सर्व संस्थानांचे भारतात विलीनीकरण व्हावे म्हणून  ल्लभभाई पटेल आणि त्यांचा सहायक वि. पी. मेनन यांचेकडे हे काम सोपवले गेले.  काही संस्थांनाना वाटले कि हीच वेळ आहे, ब्रिटिशांच्या आणि भारताच्या नियंत्रणापासून स्वतंत्र होण्याची. बहुतेक सर्व संस्थाने भारतात विलीन व्हायला तयार होती परंतु पाच संस्थाने अशी होती की त्यांचे निर्णय डळमळीत होते.

 

त्रावणकोर

दक्षिणेकडील त्रावणकोर राज्याच्या दिवाण सर सी. पी. रामस्वामी ऐयर ह्याचा भारताला संलग्न होण्यास विरोध होता. त्याच्या भौगोलिक स्थानामुळे त्याला समुद्री मार्गातून खूप उत्पन्न होते ते त्याला सोडायचे नव्हते. परंतु केरळ मधील सोशालिस्ट पार्टीच्या एका सभासदाने त्याच्यावर खुनी हल्ला केल्याने त्याने आपले मत बदलून, ३० जुलै १९४७ रोजी त्रावणकोर भारतात विलीन झाले (सध्याचा काही केरळ आणि काही तामिळनाडू चा भाग)

 

जोधपूर

जोधपूर हे पाकिस्तान लगतचे राज्य असल्यामुळे हिंदू राजा महाराज हणवन्त सिंह आणि बहुतेक प्रजा हिंदू असूनसुद्धा पाकिस्तानने त्याला खूप प्रलोभने दाखवली आणि तो पाकिस्तानात विलीन होण्यास तयार होता,  हे जेव्हा पटेलांना कळले तेव्हा त्यांनी आपले सेक्रेटरी मेनन याना ताबड्तोक तेथे पाठवून विलीनीकरणाचा मसुदा सही करायला सांगितले, परंतु हणवन्त सिहाने आपले पिस्तूल त्या सेक्रेटरी च्या डोक्यावर ठेवून सांगितले कि तूम्ही सांगाल तसे मी वागणार नाही. (Don’t Dictate me).  परंतु काही वेळातच आपला विचार बदलून त्याने भारतात विलीनीकरणाच्या करारावर सही केली.

 

हैदराबाद

हैदराबाद मध्ये राजा सातवा निझाम मीर उस्मान अली खान मुसलमान आणि बहुतांशी प्रजा हिंदू होती. निझाम अतिशय श्रीमंत होता. निझामने माउंटबॅटनला कळवले कि त्याचे राज्य स्वायत्त राज्य असावे, त्यासाठी त्याने ब्रिटिश कॉमनवेल्थचे सभासदत्व घेण्यासाठी अर्ज सुद्धा केला होता, परंतु माउंटबॅटन ने त्याला स्पष्ट केले,  राणी फक्त पाकिस्तान आणि भारतालाच कॉमनवेल्थमध्ये सभासद म्हणून मान्यता देणार आहे. निझाम पाकिस्तान धार्जिणा आणि मुस्लिम लीगचा कट्टर पुरस्कर्ता होता आणि या करणास्तव निझामने १९४८ साली लंडनमधील पाकिस्तानचा राजदूत हबीब इब्राहिम रहिमतुल्ला याचेकडे १ मिलियन पौंड सुरक्षिततेसाठी पाठवून सुद्धा दिले होते जे त्याने लंडन मधील नॅशनल वेस्टमिनिस्टर बँक मध्ये एका ट्रस्टच्या रूपात ठेवले. ( जे आता व्याजासकट ३५ कोटी पौंड झाले असून त्यावर पाकिस्तान ने आपला दावा ठोकला. पाकिस्तानच्या मते हे पैसे निझामाने हैद्राबादच्या रक्षणासाठी शस्त्रात्र खरेदीसाठी दिले होते. दुर्दैवाने पाकिस्तान तो दावा कोर्टाच्या खर्चासाहित हरले आणि आता ते पैसे भारत आणि निझामचे दोन वारसांना मिळतील). भारतात, हैद्राबाद स्वतंत्र असणे, देशाला परवडणारे नव्हते. या काळात पाकिस्थान च्या साहाय्याने दंगेखोर कासीम रझवी च्या नेतृत्वाखाली हैद्राबाद मध्ये खूप जातीय आणि धार्मिक दंगे झाले. रझाकार मंडळींनी नवाबाच्या प्रधानाला घेराव घालून बंडाळी केली.   २१ जून १९४८ रोजी माउंटबॅटननि गव्हर्नर जनरल पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने निर्णय घेतला आणि १३ सप्टेंबर १९४८ आणि  १८ सप्टेंबर १९४८ या दरम्यान हैद्राबाद मधील दंगेखोरांचा बंदोवस्त करण्यासाठी आपली लष्करी सेना हैद्राबाद मध्ये घुसवली ( पोलीस ऍक्शन ( Counter insurgency) - ऑपरेशन पोलो) आणि नंतर  निझाम भारताला शरण आला. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद भारतात विलीन झाले.

 

जुनागढ

जुनागढ हे पूर्वीच्या काठियावाड (सध्याचे गुजराथ मधील सौराष्ट्र ) राज्याचे एक महत्वाचे संस्थान होते. तेथील राजा नवाब मुहंमद महाबत खानजी-३ हा मुसलमान होता तर बहुतेक प्रजा हिंदू होती. पुढे  जुनागढ च्या नबाबाने मुस्लिम लीगचा पाकिस्थान मधील नेता सर शहा नवाझ भुट्टो (झुल्फिकार अली भुट्टो चे वडील आणि बेनझीर भुट्टो चे आजोबा ) याला आपला मंत्री बनवला. त्याने जुनागढच्या नवाबला पाकिस्तानमध्ये विलीनीकरण करण्याचा सल्ला दिला आणि जुनागढ पाकिस्तान मध्ये विलीन झाले. वल्लभभाई पटेलांनी या बाबतीत पाकिस्तानकडे तक्रार केली आणि हे मुस्लिम लीगच्या दोन देश तत्वाच्या ( Two Nation Theory) विरुद्ध होते कारण प्रजेला विचारात घेणे आवश्यक होते. दरम्यान नबाब पाकिस्तान मध्ये पळून गेला आणि २० फेब्रुवारी १९४८ रोजी जुनागढ मध्ये सार्वजनिक मतदान (Plebistic) होऊन ९१ % जनतेने भारतात विलीन होण्याचा निर्णय दिला आणि जुनागढ भारतात विलीन झाले. (पुढे याच घटनेचा फायदा पाकिस्तानने काश्मीर मध्ये घेतला.)   

 

जम्मू आणि काश्मीर संस्थान:

जम्मु आणि काश्मीर संस्थान (सध्याच्या आझाद काश्मीर, गिलगिट, बाल्टीस्थान लेह, लडाख सहित ) हे एक असे संस्थान होते जे भौगोलिक दृष्टया फार महत्वाचे होते. दोन्ही बाजूला दोन शत्रू चीन आणि पाकिस्तान अतिशय जवळ जवळ होते. काश्मीर हा भारताचा शिरपेच होता आणि आहे. या ठिकाणी राजा हरिसिंह हा हिंदू होता तर बहुतांश प्रजा मुसलमान होती. हरिसिंह ने याच परिस्थीचा फायदा घ्यायचे ठरवले. त्याने दोन्ही देशांना विनंती केली कि माझे अजून नक्की मत होत नाही तरी थोडे दिवस थांबा (Standstill agreement). परंतु पाकिस्थान जवळील पूंछ भागात पाकिस्तानने बलुचिस्तान आणि पख्तुनिस्तान मधील भटक्या जमातीतील  टोळीवाले लढवैये कडवे सैनिक बिना लष्करी पोशाख घुसवायला सुरवात केली तसेच काश्मीरकडे येणार माल रोखायला सुरवात केली जेणेकरून काश्मीर दबावाला बळी पडेल. पूर्वी जी ब्रिटिशांची मदत महाराजांना मिळायची ती मिळायची बंद झाली आणि भारताकडे मागण्याची सोय नव्हती. अशातच पाकिस्थान ने त्यांच्या डॉन या वृत्तपत्रात लेख लिहून आणला ज्यात महाराज्याना उघड उघड धमकी होती कि जर काश्मीर पाकिस्तान मध्ये विलीन झालानाही तर परिणामाला तयार रहा.. लवकरच पाकिस्तान ने आक्रमक टोळ्यांची संख्या वाढवल्या आणि त्या टोळ्या अगदी श्रीनगर पासून अगदी  अर्ध्या तासाच्या अंतरावर आल्या. २५ ऑक्टोबर रोजी हरिसिंग ने आपला तातडीचा संदेश गव्हर्नर जनरल माउंटबॅटनना पाठवला. पटेलांनी स्पष्ट केले कि जेथपर्यंत काश्मीर,  भारतात विलीन होत नाही तेथपर्यंत भारत तुला काही मदत करू शकत नाही. पटेलांनी आपला सचिव वि पी मेनन याला हरिसिंहना प्रत्यक्ष भेटण्यास सांगितले, तो पर्यंत महाराज श्रीनगर सोडून जम्मू ला निघून गेले होते. शेवटी २६ ऑक्टोबर १९४७ रोजी हरिसिंहनि भारतात विलीनीकरण होण्याचा करार केला, तो २७ ऑक्टोबर १९४७ पासून लागू झाला. दरम्यान २७ ऑक्टोबर १९४७ रोजी अंबाला आणि दिल्ली मधून काही विमाने आणि भारतीय लष्कराने काश्मीर आणि पीर पंजाला पर्वत रांगांमधून घुसखोरांना हुसकावून लावण्याचे काम सुरु केले आणि जवळजवळ एक आठवड्याच्या आत भारताने पाकिस्तानचा पहिला छुपा हल्ला परतवला.

२७ ऑक्टोबर १९४७ ला विलीनीकरणाचा करार मान्य करत लॉर्ड माउंटबॅटनने पत्रात असे लिहिले कि जम्मू आणि काश्मीर मधील अस्थिरता कमी झाली कि लोकांच्या निर्णयाने ह्या कराराची मान्यता पूर्ण होईल. अशा रीतीने काश्मीर भारतात विलीन झाले परंतु पाकिस्तान ने काश्मीर चा काही भाग (ज्याला आझाद काश्मीर म्हणतात),  गिलगिट आणि बाल्टीस्थान आपल्या ताब्यात ठेवले ते आज पर्यंत पुढे पाकीस्तान ने काश्मीर विषयावरून संयुक्त राष्ट्रांमध्ये बराच हंगाम केला आणि फार मोठी कहाणी पुढे आहे ती नंतर केव्हातरी लिहू.

 

माधव भोळे


Thursday, August 12, 2021

दीपक पांडुरंग गद्रे, गद्रे मारिन एक्स्पोर्टस प्रा. ली.

 ध्येय छोटे असणे गुन्हा आहे, पडलात किंवा अयशस्वी झालात तर काही फार मोठा गुन्हा नाही केला !! ( Having low aim is crime, failure is not).


गेल्या वेळेला देवरुख, रत्नागिरी मधील एका गद्रे मंडळींची गोष्ट लिहिली होती (दामोदर शिवराम गद्रे HP चहा). 


योगायोगाने आणखी एक गद्रे रत्नागिरीमध्ये मोठे नाव आहे ते म्हणजे गद्रे मारिन एक्स्पोर्टस प्रा. ली.

माझ्या समजाप्रमाणे हे वेगळे कुटुंब आहे. असो. 


1970 चे दरम्यान दीपक पांडुरंग गद्रे या रत्नागिरीतील व्यापाऱ्याचा सम्पर्क रत्नागिरी मधील मासेमारी करणाऱ्या ट्रोलर्स बरोबर आला. स्वयंचलित ट्रोलर्स ला लागणारे डिझेल ते पुरवत असत. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या लोकांबरोबर त्यांच्या ओळखी वाढत गेल्या आणि त्याचा फायदा त्यांना झाला. 


दीपक गद्रे यांनी फ्रोझन मासे पॅकिंग करण्याची पहिली फॅक्टरी 1978 ला मिरजोळे, रत्नागिरी  येथे टाकली तेथून या व्यवसायाची खरी सुरवात झाली. रत्नागिरी चा प्रचंड मोठा समुद्र किनारा आणि स्थानिक मासेमारी मुळे लागणारा कच्चा माल त्यांना मिळत गेला.  श्रीम्पस, सक्विड्स, कटल फिश आणि इतर मासे यांचे बर्फ़ातील पॅकिंग करून एक्स्पोर्ट करायला त्यांनी सुरवात झाली.


पुढे जपान येथे भेट दिल्यानंतर त्यांचा सम्बन्ध सुरीमी या माश्याच्या प्रोडक्टसशी आला. जपान मध्ये ते खूप वापरले जाते. त्या साठी त्यांनी 1994 मध्ये भारतात प्रथमच सुरीमी तयार करण्याची फॅक्टरी रत्नागिरी येथे टाकली.


जसजसे कंपनीचा कारभार वाढत गेला तसतसे त्यांनी माणसांचा कमीतकमी स्पर्श लागणारे, पूर्णपणे स्वयंचलित मशिनरी बसवून सुरीमी चे उत्पादन सुरू केले. सुरीमी म्हणजे  माशाची पेस्ट बनवणे. ही पेस्ट जपानी किंवा इतर मासे खाणारे  लोक जेवणात वापरून त्यापासून खेकडे किंवा लोंबस्टर चे मांस असल्यासारखे कृत्रिम मास तयार करतात. शीत मासे (फ्रोझन फिश) या विषयात त्यांची कीर्ती वाढत जाऊन 1999 पर्यन्त एक उत्तम दर्जेदार, मासे आणि मस्यपदार्थ निर्यातक म्हणून त्यांचा जगात नाव लौकिक झाला.


दक्षिण कोरिया, जपान, मलेशिया, तैवान आणि ऑस्ट्रेलिया सारख्या मासे खाणाऱ्या देशात त्यांनी आपले अव्वल स्थान निर्माण केले.


2004 मध्ये नॉटिंगहॅंम, युके मधून मॅनेजमेंट ची पदवी घेतलेले त्यांचे चिरंजीव श्री अर्जुन दीपक गद्रे या ताज्या दमाच्या मॅनेजिंग डायरेक्टर ने सुरीमी पासून तयार होणारे मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याची फॅक्टरी टाकली आणि मॅरीनेटेड (मसाले लावलेले किंवा वेगळ्या प्रकारे मुरवलेले) माश्याचे वेगवेगळे तयार पदार्थ तसेच शिजवायला तयार (ready to cook) स्वच्छ केलेले आणि कापलेले मासे आणि तत्सम पदार्थ या फॅक्टरी मधून बाहेर पडू लागले. 2013 साली हिंदुस्तान लिव्हर च्या मारिन एक्स्पोर्ट च्या फॅक्टरीवर नियंत्रण (takeover)  मिळवून त्यांनी आपला व्यवसायिक चाणाक्षपणा (accumen) दाखवून दिला. 


त्यांच्या काही ब्रँड ची नावे crab sticks, surimi masala prawn, Mackerel असे आहेत. या सर्वात त्यांनी आपल्या वैशिष्ट्य पूर्ण कोकणी आणि मालवणी मसाल्याना स्थान देऊन पदार्थांची लज्जत वाढवली आहे. सध्या गद्रे मारिन ही सुरीमी पदार्थांची जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी निर्यातदार कम्पनी असून मिरजोळे रत्नागिरी, ब्रह्मावर कर्नाटक आणि चोरवाड गुजरात (धीरूभाई अंबानींचे जन्मस्थान) या ठिकाणी त्यांचे प्रोसेसिंग प्लांट आहेत. 


स्पर्धात्मक किमतीत दर्जेदार उत्पादने देण्यासाठी ते आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. लवकरच ते भारतातील नवीन पिढीला आवडेल, आणि शरीराला उपयुक्त अशा मत्स्यपदार्थांची भारतात विक्री करण्याचे दृष्टीने तयारी करीत आहेत. एक्स्पोर्ट प्रमोशन अवॉर्ड, मारिन एक्स्पोर्ट प्रमोशन अवार्ड, हलाल सर्टिफिकेशन, चांगल्या उत्पादन पद्धती (GMP), HACCP सारखी अनेक बिरुदे त्यांच्या पाठीशी आहेत.


2016 च्या अकड्याप्रमाणे त्यांनी भारतात 250 टन फ्रोझन सी फूड ची विक्री केली असून 34000 टन चे मासे आणि 15400 टन चे मूल्यवर्धित सी फूड निर्यात केले आहे". त्यांचा 2019 चा टर्न ओव्हर 500 कोटी रुपये आहे.


माधव भोळे (संकलित, स्रोत कम्पनी वेबसाईट)

Saturday, July 31, 2021

गुगल आणि सुंदर पिचाई, एक यशोगाथा

 गुगल आणि सुंदर पिचाई, एक यशोगाथा


गुगल, हे नाव कोणाला माहीत नाही असा माणूस जगात विरळच. आपल्या सर्वांच्या जीवनात हा गुगल कायम आपला मित्र बनून राहिला आहे. 
काल या गुगल मध्ये एक मोठा व्यवस्थापकीय बदल झाला आहे. 

गुगल ही कम्पनी दि. 4 सप्टेंबर 1998 ला  लॅरी पेज आणि सेर्गे ब्रीन या स्टँनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पी. एच. डी. करणाऱ्या दोन विध्यार्थ्यांनि कॅलिफोर्निया मधील एका गॅरेज मध्ये सुरू केली. गुगल चे नाव जरी घेतले किव्वा ऐकल तरी लगेचच मला स्वामी समर्थांच्या "जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्याशी शिकवावे, शहाणे करुनि सोडावे सकल जन" या उक्तीची आठवण येते. कोणत्याही गोष्टीची आपणास माहिती पाहिजे असल्यास आपण गुगल कडे धाव घेतो, जसा काय तो जादूचा दिवाच.

2018 मध्ये मायक्रोसॉफ्ट या जागतिक सॉफ्टवेअर कंपनीला मागे टाकत 116 बिलीयन डॉलर एवढा प्रचंड व्यवसाय करून ही कम्पनी जगातील एक नंबर ची सॉफ्टवेर कम्पनी ठरली आहे. विशेष म्हणजे गुगलच्या अनेक सेवा मोफत आहेत तरी सुद्धा ते एवढे पैसे कमावतात त्याचे कारण म्हणजे गुगल सेवा वर असणाऱ्या जाहिरातींमधून त्यांना उत्पन्न मिळते. 

गुगल मोठी झाल्यावर गुगल ने वेगवेगळ्या सेवा देण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या काढल्या, त्या सर्वांची होल्डिंग कम्पनी किंवा पालक कम्पनी  म्हणून 2 ऑक्टोबर 2015 ला अल्फाबेट नावाची कम्पनी काढली गेली ज्याचे सीईओ काल पर्यन्त लॅरी पेज होते. त्याच वेळी 24 ऑक्टोबर 2015 ला गुगल मधील आपला पदभार सोडत पेज ने भारतीय वंशाच्या सुंदर पिचाई या आपल्या सहकाऱ्याला  गुगल चे सी इ ओ पद आणि अल्फाबेट चे निर्देशक पद (डायरेक्टर) दिले. काल लॅरी पेज आणि सेर्गे ब्रीन यांनी जाहीर केले की आजपासून श्री सुंदर पिचाई हे या दोन्ही कम्पन्याचे सी ई ओ असतील, आणि ते दोघे आजपासून दैनंदिन व्यवहारात दखल घेणार नाहीत. विशेष म्हणजे हे दोन्ही मंडळी फक्त 48 वर्षांची असून सुद्धा त्यांना या पदांचा मोह नाही, नाहीतर आपल्याकडे 90/90 वर्ष झाली तरी पदे सोडायला लोक तयार नाहीत. सुंदर चे वय सुद्धा फक्त 46 वर्ष आहे. 

आपल्या 1,24,000 सहकाऱ्यांशी सम्पर्क साधताना लॅरी पेज लिहितात "सुंदर एक विनम्र व्यक्ती असून सहकाऱ्यांशी मिळूनमिसळून काम करत,  समोर असलेली आव्हाने लीलया पेलण्याची त्याची हातोटी आम्हाला भावली त्याच बरोबर संस्थापकांची दूरदृष्टी, स्वप्ने समजून ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लागणारी समज, कष्ट करायची प्रामाणिक तयारी, आणि ती सहकाऱ्यांकडून पूर्ण करून घेण्याची त्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे म्हणून ही जबाबदारी त्याला देण्यात आम्हाला कोणताही संदेह नाही."

कोण आहेत हे सुंदर पिचाई? 10 जून 1972 साली मदुराई, दक्षिण भारत स्थित एका मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेले पिचाई, आय आय टी खरगपूर चे मेटालर्जी मधील स्थानक असून, स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी मधून एम एस आणि व्हारटन युनिव्हर्सिटी चे एम बी ए आहेत. गेले 15 वर्ष ते गुगल मध्ये काम करत असून, गुगल क्रोम हा वेब ब्राऊसर तयार करण्यात आणि तो यशस्वी रित्या चालवण्यात  टीम लीडर म्हणून त्यांचा मोठा वाटा आहे. तेव्हापासून गुगल च्या मॅनेजमेंटच्या दृष्टीपथास ते आले आणि त्यांच्या कसोटी ला उतरले.

स्वतःबद्दल सांगताना सुंदर सांगतात, आम्ही मदुराईमध्ये भाड्याने रहात होतो, आमच्याकडे फ्रीज सुद्धा नव्हता. सर्व मंडळी जमिनी वरच झोपायची. दक्षिणी असल्यामुळे मला हिंदीचे वावडे होते, खरगपूर आय आय टी मध्ये मला अभ्यासात कधी कधी क वर्ग सुद्धा मिळाला आहे. वाचनाची प्रचंड आवड, आणि फावल्या वेळात मैदानी खेळ या मध्ये माझे बाल पण गेले. गुगल मला जबाबदारी देत गेले आणि मी त्याला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला एवढेच. सुंदर चा 2018 चा वार्षिक  पगार 19 लाख डॉलर एवढा आहे. त्याची सम्पत्ती 60 करोड डॉलर एवढी आहे. तर त्याचा बॉस लॅरी पेज फक्त वार्षिक 1 डॉलर पगार घेतो. त्याची सम्पत्त 51.1 बिलियन डॉलर असून तो जगातला 10 वा श्रीमंत माणूस आहे. 

वयाच्या 50 शी चे आत ही मंडळी एवढी कशी यशस्वी होतात? त्यांचे कोणते गुण आपल्यात नाही किव्वा आपल्याकडे असलेले कोणते गुण आपण कसे वापरतो? या बद्दल आपण आपले आत्मपरीक्षण करणे जरुरीचे आहे. वय काहीही असून दे.

माधव भोळे

Sunday, July 25, 2021

1 जुन हा, आंतराष्ट्रीय ब्राह्मण दिवस

 आज 1 जुन हा, आंतराष्ट्रीय ब्राह्मण दिवस मानला जातो. जो ब्रम्ह जाणतो, ज्याला वेद अध्ययन करण्यास अधिकार दिले आहेत तो ब्राह्मण. जो सोळा संस्कार पूर्ण करतो तो ब्राह्मण अशी ब्राह्मणाची व्याख्या आहे. भारतात खालील प्रमाणे १०४ ब्राह्मण ज्ञाती आहेत. यातील काही मांसाहारी ब्राह्मण सुद्धा आहेत पण ते वरील व्याख्येत बसतात कारण देश, कालमान आणि ऋतुमानानुसार आपल्याला आहार निवडण्याची मुभा हिंदू धर्माने दिली आहे. या बाबतीत काही मतभिन्नता असू शकते परंतु हिंदू धर्म वैचारिक विविधतेवर आधारित असून ते लोकशाहीचे द्योतक आहे.


Anavil
Andhra Brahmin
Aranyaka
Assamese Brahmin
Audichya
Bagar
Barendra
Bengali Brahmin
Bengali Vaidyas
Bhatt
Bhumihar
Bihari Brahmin
Chattad Sri Vaishnava
Chitpavan
Chitrapur Saraswat
Daivadnya 
Deshastha
Deshastha Rugvedi
Devrukhe
Dogra
Dravida
Gangaputra
Garhwali
Gaud
Gaud Saraswat
Gaur
Gossain
Goswami
Gujarati Brahmin
Gurukkal
Halua
Haryanvi Brahmin
Havyaka
Himachali Brahmin
Hoysala
Hundet
Iyengar
Iyer
Jangid
Jhadua / Jharia
Jujhautiya / Jijhotia
Kamrupi 
Kandavara
Kannada Madhva
Kanyakubj
Karhade
Kashmiri Pandit
Kerala Brahmin
Kota Brahmin
Kudaldeshkar Gaud Saraswat
Kulin
Kumaoni
Madhva
Mahapatra
Maithil
Malyali Brahmin
Manipuri Brahmin
Modh
Mohyal
Nagar
Namboodiri / Nambudiri
Narmadiya
Nepali Brahmin
Niyogi
Oriya Brahmin
Others
Padarthi
Padia
Panchadesi
Panda
Pandit
Punjabi Brahmin
Pushkarna
Pushpaka
Rajasthani Brahmin
Rarhi
Rudraj
Sakaldwipi
Saklapuri
Samvedi
Sanadya / Sanidya
Sankethi
Saraswat Brahmin
Saraswat Rajapur
Sarola 
Saryuparin
Shivalli
Shrimali
Smartha
Sri Vaishnava
Sthanika / Stanika
Tamil Brahmin
Telgu Brahmin
Tuluva
Tyagi
UP Brahmin
Utkala
Uttarakhand Brahmin
Vaidiki
Vaikhanasa
Varendra
Velanadu
Viswabrahmin
Vyas
Yajurvedi

माधव भोळे.

Education and practice

आजकाल अर्धवट शिकलेली मंडळी राजकारण करताना विचारत असतात, फडणविसाना शेतीतील काय कळते? मोदी अर्थ तज्ञ नाहीत, गडकरी इंजिनियर नाहीत वगैरे, अर्थात अशाच आशयाचे प्रश्न विरुद्ध पक्षातील लोक सुद्धा इतरांबद्दल बोलताना करित असतात.


मला त्या मंडळींना एक सोपी गोष्ट सांगायची आहे, बघा समजते का.

पहिली गोष्ट आज एवढे राजकीय पुढारी आहेत ज्यांनी 1 ली पासून अगदी MBBS, MBA, MTech पर्यंत शिक्षण संस्था काढल्या आहेत ते थोडेच सर्व शिकले आहेत?  पण त्यातील अनेकजणांनी चांगले शिक्षक दिमतीला ठेवले, त्याना पगार, मान मरातब, हुद्दा दिला, आहे. त्यामूळे ते शिक्षणतज्ञ होण्याची आवश्यकता नाही.

एकदा हेनरी फोर्ड (फोर्ड गाड्यांच्या कंपनीचा मालक), त्यावर एका वकिलांनी केस केली, की हेनरी फोर्ड इंजिनिअर नाही तर एवढा गाड्यांचा कारखाना कसा चालवतो? 

केस चालू झाली, वकिलाने विचारले, तुला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधले काय समजते, फोर्ड ने एक पोर्टेबल टेलिफोन एक्स्चेंज  आणला होता, त्याने तो टेलिफोन आपल्या कम्पनीच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटला लावला म्हणाला, तेथील मुख्य इंजिनियर ला म्हणाला, या वकीलाना काय पाहिजे ती उत्तर दे. वकिलाने दुसरा प्रश्न दुसऱ्या डिपार्टमेंट चा विचारला, फोर्डने परत तेच केले. 

शेवटी जजने विचारले तुला काय सांगायचे आहे? फोर्ड म्हणाला इंजिनिअरिंग कारखाना काढण्यासाठी मी इंजिनिअर असण्याची आवश्यकता नाही. मी अनेक इंजिनियर नोकरीवर ठेवून त्यांचेकडून मला पाहिजे ते योग्य काम योग्य तऱ्हेने करून घेऊ शकतो की नाही ही पात्रता माझ्यात आहे किंवा नाही हे महत्वाचे. 

भारतातील सर्वात मोठा पेट्रोल रिफायनिंग कारखाना सुरू करणारे आणि चालवणारे स्व. धीरूभाई अंबानी पेट्रोलियम इंजिनियर नव्हते हे लक्षात घ्या.

त्या मुळे असले निरर्थक प्रश्न ज्या सुपीक डोक्यांच्या लोकांकडून येतात त्यांना माझा साष्टांग नमस्कार.

माधव भोळे

क्रांतिगुरु श्यामजी कृष्ण वर्मा

भारतीय राष्ट्रवादी श्यामजी कृष्ण वर्मा ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देणारे पत्र इंग्लंडच्या टाइम्स वृत्तपत्रात लिहिले म्हणून ईनर टेम्पल ( बारिस्टर ची पदवी देणारे कॉलेज) ने ३० एप्रिल १९०९ रोजी त्यांना  बार मधून  काढून टाकले होते. पुढे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ नोव्हेंबर २०१५ रोजी इंग्लंडच्या दौऱ्यावर गेले त्यावेळी दिल्लीतील एका वकिलांच्या पत्राची दखल घेत ईनर टेम्पल ने वर्मांवर अन्याय झाला हे मान्य करत, बार मध्ये दिनांक ९ नोव्हेंबर २०१५ रोजी परत मनाचे स्थान दिले आणि तसे सर्टिफिकेट श्री मोदी ना हस्तांतररीत केले.  याच श्यामजी कृष्ण वर्मा नि इंग्लंड येथे भारतीय विद्यार्थ्यांसाठी इंडिया हाऊस नावाचे वसतिगृह उघडून वि. दा. सावरकर, मदनलाल धिंग्रा, भिकाजी कामा, सेनापती बापट सहित अनेक भारतीय क्रांतिकारी विध्यार्थ्यांना आसरा दिला होता. या वर्मा यांचे नावे गुजरातच्या कच्छ भागात "क्रांतिगुरु श्यामजी कृष्ण वर्मा, कच्छ युनिव्हर्सिटी" श्री. नरेंद्र मोदी गुजरात चे मुख्यमंत्री असताना स्थापन झाली आहे.


माधव भोळे