Thursday, March 14, 2024
बेल आणि कोठडी
बेल आणि कोठडी
देवेंद्र फडणवीसांना धमकी देणारा आरोपी किंचक नवले आणि योगेश सावंत यांना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर ते हायकोर्टात गेले आणि तेथे त्यांना जमानत ( बेल ) मिळाली.
बऱ्याच वेळा गंभीर आरोप असलेल्या आरोपीला जमानत मिळते आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा कोर्टावरील विश्वास उडून जातो त्यामुळे प्रथम जमानत का आणि केव्हा मिळते ते समजून घेतले पाहिजे.
जेथेपर्यंत एखाद्या आरोपीवर बेलेबल गुन्हा दाखल झालेला असतो तेव्हा पोलिस प्राथमिक चौकशीसाठी आरोपीला पोलीस कोठडीमध्ये नेण्याची परवानगी मागू शकतात. पुढे चौकशी पूर्ण झाल्या नंतर अधिक तपासासाठी पोलीस कोठडीत वाढ किंवा न्यायालयीन कोठडी मागू शकतात, अशा वेळी आरोपीचा वकील कोर्टात अर्ज करतो की पोलीस आणि सरकारी यंत्रणेला ज्या ज्या वेळी आवश्यक वाटेल त्या त्या वेळी किंवा ठरवलेल्या वेळापत्रकनुसार पोलिसांना / सरकारी यंत्रणेला सहकार्य करण्याच्या अटीवर बेल बॉण्ड देऊन आपली न्यायालयीन कोठडी वाचवू शकतो. आणि जर पुढे आरोप सिद्ध झाला तरच त्याला तुरुंगात जावे लागते किंवा दंड भरून त्याची सुटका होऊ शकते.
त्यानंतर ९० दिवसाच्या आत पोलिसांना पूर्ण आरोप पत्र सादर करून न्यायालयीन केस करावी लागते. आधीच्या केसला साधी पोलीस केस म्हटली जाते. जरी ९० दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल झाले नाही तरी आरोपी बेल मागू शकतो
कायद्याचा भाषेत Bail is rule, jail is an exception.
मी वकील नाही पण काही चुकले असेल तर जरूर सांगा म्हणजे मला कळेल.
Madhav Bhole
भविष्याचे वेध आणि कॉम्पुटिंग रिसॉर्सेस:
भविष्याचे वेध आणि कॉम्पुटिंग रिसॉर्सेस:
६ मार्च २०२४ रोजी NVidia कॉर्पोरेशन हि २.१५ ट्रिलीयन डॉलर मार्केट कॅपिटलाझेशन असलेली जगातील ४ थी आणि अमेरिकेतील ३ ऱी जास्तीतजास्त किमती कंपनी ठरली. ऍपल आणि मायक्रोसॉफ्ट नंतर अमेरिकेत ३ नंबर वर आणि जगात सौदी आरामको ह्या कंपनी नंतर ४ थी किमती कंपनी म्हणून तिचा नंबर लागतो.
काय आहे ह्या NVidia चे प्रॉडक्ट्स? आपण आतापर्यंत कॉम्पुटर मध्ये CPU हा शब्द ऐकला असणार. CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. कोणत्याही कॉम्प्युटर चा CPU हा एक अविभाज्य भाग आहे. CPU हे कॉम्पुटर चे हृदय आहे. कॉम्पुटर मधील सर्व गणिते तसेच डेटा वाहतूक CPU मधून होते. CPU बंद पडला की कॉम्पुटर बंद.
तर CPU चा नवीन अवतार GPU आहे. GPU म्हणजे ग्राफिकलं प्रोसेसिंग युनिट. हा GPU, ग्राफिक्स, अतिशय किचकट असे गेम्स, भलीमोठी गणिते तो CPU पेक्षा जास्त वेगाने सोडवतो. प्रत्यक्ष GPU हा साधे काम करण्यासाठी आखलेला आहे परंतु त्याचे अनेक GPU जोडून संच तयार केले की तो अतिशय वेगवान काम करतो. तो ह्या मध्ये Parallel processing करतो त्यामुळे एक काम अनेक GPU मध्ये वाटतो आणि लवकर परिणाम तयार करतो, जशी आपण एक भाजी ४ लोकांना सोलायला किंवा चिरायला दिली की पटकन तयार होईल तसे.
सध्या जगभरात बोलबाला असलेल्या आर्टिफिशल इन्टीलीजन्स ( कृत्रिम बुद्धिमत्ता ), मशीन लर्निंग सारख्या अध्ययावत विषयात प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लाखो पॅरामीटर्स ( बदलणारी गृहिते ) असतात आणि ती वापरून निष्कर्ष तयार करण्यासाठी प्रचंड कॉम्पुटर मेमरी आणि वेग लागतो आणि तो वेग ह्या GPU मध्ये CPU पेक्षा जास्त असतो. ( एक GPU हा साधारण पणे १० ते २०० पट वेगवान असतो. ).
तर असे GPU बनवण्यात NVidia, AMD, intel, Qualcom ( for mobile and telecom) ह्या काही प्रमुख कंपन्या आहेत. त्यात सर्वात जास्त वेगवान GPU बनवणारी कंपनी NVidia आहे. त्यांचे H100 GPU मॉडेल आहे. हे त्याच्या आधीच्या मॉडेल A100 पेक्षा ६ पट जास्त वेगवान आहे. NVidia link switch वापरून असे २५६ H100 एकत्र जोडता येतात. अशा प्रकारचे संच Cloud computing मध्ये वापरतात जे पुढे AI अँड मशीन लर्निंग मध्ये वापरतात. सध्या ह्या गोष्टीचे पेव आल्यामुळे NVidia च्या H100 ला खूप मागणी आहे.
तुलनाचं करायची झाली तर AMD च्या GPU असलेल्या MI300X ह्या चिपसेट ची किमत १० ते १५ हजार डॉलर्स आहे तर Nvidia च्या H100 ची किमत साधारण ४०,००० डॉलर्स आहे. २०२३-२४ च्या तिसऱ्या तिमाही मध्ये NVedia ने सुमारे ५,००,००० H100 विकले. मायक्रोसॉफ्ट आणि मेटा हे त्यांचे दोन मोठे ग्राहक आहेत.
Perplexity Ai म्हणून एक San Fransisco, California मधील आर्टिफिशल इन्टीलीजन्स वर काम करणाऱया कंपनीचा एक संस्थापक अरविंद श्रीनिवास म्हणतो, मी मेटा( पूर्वीची फेसबुक ) कंपनी मधील एका आर्टिफिशल इन्टीलीजन्स शास्त्रज्ञाला आमच्याकडे काम करतोस कां म्हूणन विचारले तर तो म्हणाला की आधी "१०,००० H1000" काम करण्यासाठी उपलब्ध कर मग माझ्याकडे विचारायला ये. इतकी सध्या कॉम्पुटर रिसॉर्सेसची गरज आहे. आणि इतकी GPU ला मागणी आहे. AI चा पूर्ण प्रवास हा कॉम्पुटर रिसॉर्सेस वरतीच अवलंबुन आहे. आणि अर्थात ह्या रिसॉर्सेस साठी सेमी कंडक्टर, सिलिकॉन इत्यादी मटेरियल ला विशेष महत्व आले आहे.
मायक्रोसॉफ्ट ची अझूरे नावाची एक cloud computing शाखा आहे आणि आर्टिफिशल इन्टीलीजन्स मध्ये आतापर्यंत पुढे असलेली कंपनी Open AI जीचा मुख्य प्रवर्तक सॅम अल्टमन आहे ( चॅट जीपिटी ४ वाला). तर काळाची पावले ओळखून, सॉफ्टवेअर मध्ये दादा असलेल्या मायक्रोसॉफ्टने OPEN Ai कंपनी मध्ये एकंदर १३ बिलीयन डॉलर्स गुंतवून ४९% भागीदारी घेतली आहे. ती सुद्धा या अटीवर की ओपन AI यातील बहुतेक रक्कम अझूरे प्लॅटफॉर्म वापरून खर्च करेल. म्हणजे चित भी मेरी और पट भी मेरी. म्हणजे इकडे १३ बिलीयन गुंतवायचे आणि इकडे १३ बिलीयन चा व्यवसाय बांधून घ्यायचा.
असो अशाच प्रकारे ज्या टेक्नॉलॉजी वर आधारित हे GPU आहेत त्या तंत्रज्ञातील एक भारतीय शास्त्रज्ञ्, गणिती, पुण्यातील डॉ. नरेंद्र करमरकर, हे आहेत, आणि त्यांनी सिम्प्लेक्स मेथड ह्या मॅनेजमेंट थियरी वापरून parallel processing च्या वर आधारित सुपर कॉम्पुटर काढण्याचा आराखडा २००६ मध्येच तयार केला होता आणि भारतातील दिग्गज अशा एक मोठ्या व्यवसायिक ग्रुपबरोबर भागीदारी सुरु केली होती परंतु बौद्धिक संपदा हक्क कोणाचे राहतील यावर काही अटींवर मान्यता न झाल्यामुळे ती भागीदारी रद्द झाली. या साठी दोन्ही पार्टीचे नक्की कुठे बिनसले ते कळले नाही परंतु एक गोष्ट नक्की की व्यवहारात दोन्ही बाजूनी अडेल तट्टू पणा झाला की व्यवहार पूर्ण होत नाही आणि कार्य नाश होतो. करमरकर यांचे नावावर अनेक पेटंट्स आहेत. हे झाले असते तर कॉम्पुटिंग पावर मध्ये भारताचा झेंडा अटकेपारच काय पण जगाच्या पुढे गेला असता. अर्थात हे सर्व करायला दूर दृष्टी लागते, त्याचा अभाव भारतीय व्यवसायिकात आहे. संशोधनावर पैसे खर्च करणे म्हणजे त्यांचे मते वाया घालवणे आहे. तसेच प्रत्येकाला ते नोकरच समजतात.
माधव भोळे
Saturday, March 2, 2024
राखेतून उभे राहणारे - ब्राह्मण
आज काल ब्राह्मणांना शिवीगाळ आणि धमक्या देण्याचे, त्यांच्यात दहशत निर्माण करण्याचे काम काही समाज कंटक करताना दिसत आहेत. त्यांना ब्राह्मण म्हणजे पालापाचोळा वाटतो. ईश्वर आराधना करून समाजाला आदर्शवादाकडे नेणे, समाजाला शिक्षित आणि सुसंस्कृत करणे, समाजाला शिस्त लावणे आणि मार्गदर्शन करणे अशी कामे ब्राह्मण करतात.
भारतवर्षाच्या आजवरच्या प्रगतीमध्ये ब्राह्मणांचा वाटा मोठा आहे.
चंद्रगुप्त मौर्याला राज्य शासनाबद्दल सल्ला देणारा चाणक्य, ब्राह्मण होता.
पन्हाळ्याहून सिद्धी जोहरचा वेढा फोडून छत्रपती शिवरायांनी विशाळगडावर सुखरूप पोहोचावे म्हणून शत्रूला पवनखिंडीत (घोडखिंड ) रोखून धरण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारा बाजी प्रभू देशपांडे, ब्राह्मण होता.
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पश्चात त्यांची सून ताराबाई आणि नातू शाहू महाराज १ (संभाजी पुत्र ) यांच्यामध्ये सामंजस्य तयार करून पुढे महाराज्यांचे मराठा साम्राज्य निष्ठेने चालवणारा आणि वाढवणारा पेशवा बाळाजी विश्वनाथ, हा ब्राह्मण होता.
पुढे मराठा साम्राज्य अटके पर्यंत वाढवून मराठा सम्राज्याला स्थईर्य देणारा बाजीराव पेशवा ब्राह्मण होता, त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढणारे मेहेंदळे, पटवर्धन असे अनेक सरदार ब्राह्मण होते.
१८५७ ला इंग्रजांविरुद्ध मेरी झान्सी नही दूंगी म्हणत युद्ध पुकारणाऱी झाशीची राणी लक्ष्मीबाई नेवाळकर, तात्या टोपे आणि बिठुरचे नाना साहेब पेशवे २ हे सर्व ब्राह्मण होते.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना प्रथम मुलींच्या शाळेसाठी जागा देणारे भिडे ब्राह्मण होते.
प. पु. बाबासाहेब आंबेडकरांना सकपाळ ऐवजी आंबेडकर नांव आवडते म्हणून शाळेत बदलून देणारे मुळे गुरुजी ब्राह्मण होते.
पुढे स्वातंत्र्य लढ्यात ३% लोकसंख्या असून सुद्धा बलाढ्य अशा इंग्रज्यानपुढे आघाडीच्या नेत्यात लढणारे गोपाळ कृष्ण गोखले, टिळक, आगरकर पुढे तात्याराव सावरकर, त्यांचे बंधू बाबाराव सावरकर आणि अनेक स्वातंत्र्य सैनिक ब्राह्मण होते.
प्लेग च्या साथीमध्ये पुण्यात इंग्रजांनी केलेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी रॅनड ची हत्या करणारे चाफेकर बंधू ब्राह्मणच होते.
किती उदाहरण देऊ, फेसबुक भरून जाईल 😄
देशासाठी एव्हडे करून सुद्धा ब्राह्मणांचा वंश विच्छेद करण्याची भाषा बोलणारे हे उर्मट कार्यकर्ते, नक्की कोणत्या समाजाचे नेतृत्व करतात? ब्राह्मण आणि मराठे यांचे संबंध एव्हडे वाईट कधीच नव्हते कारण खरे मराठे ब्राह्मणांची किंमत जाणतात.
मराठा स्वतःला कुणबी प्रमाणपत्र लावून घ्यायला तयार नाहीत. जरंगे सरसकट सर्वाना कुणबी प्रमाणपत्र द्यायला सांगत आहे आणि ते अस्सल मराठ्यांना मुळीच मान्य नाही असे दिसते.
एक लक्षात घ्या एका नथुराम गोडसेनी गांधीजींना मारले म्हणून संपूर्ण ब्राह्मण समाजाला गावा गावातून हाकलवून लावून सुद्धा ब्राह्मणांचे अस्तित्व संपत नाही. संपलेले नाही कारण ब्राह्मण कोणापुढे लाचार नाही. ब्राह्मण स्वकर्तृत्वावर जगतो. त्याची ताकद त्याच्या बुद्धिमत्तेत आहे आणि ती जपण्याचा तो पुरेपूर प्रयत्न करतो. मग तुम्ही कितीही शिव्या द्या नाहीतर तूताऱ्या वाजवा.
ब्राह्मणाना दुसरे नांव आहे द्विज म्हणजे दोनदा जन्मणारा. एकदा जन्मतो त्यावेळी आणि एकदा मुंज झाल्यानंतर असे ब्राह्मणाचे दोन जन्म असतात असे शास्त्र सांगते.
लिहून ठेवतो की यदाकदाचित जरी त्याला संपवायचा प्रयत्न केला तरी तो राखेतून उभा राहील याची त्याला खात्री आहे. संपवणारे संपतील पण ब्राह्मण संपणार नाही.
माधव भोळे
Wednesday, January 31, 2024
केल्याने होत आहे (एक अनुभव)!
केल्याने होत आहे (एक अनुभव)!
परवा जव्हार, पालघर येथे दोन दिवस फिरायला गेलो होतो. अर्थात ती जागा पावसाळी पर्यटन करण्यासाठी जास्त योग्य आहे पण आम्हाला आता वेळ होता म्हणून आता गेलो होतो. तेथे शाकाहारी रेस्टॉरंट नाहीत. शोधावी लागतील. ५०% वस्ती मुस्लिम आहे, उरलेले आदिवासी आणि इतर.
पालघर जव्हार करत एक रस्ता त्रंबक ( नाशिक ) येथे जातो तर दुसरा जव्हार वरून सेलवास (गुजरात दादरा नगर हवेली ) येथे जातो. बाकी एसटी आगारातून महाराष्ट्रात अनेक भागात बसेस जातात.
तेथील एका हॉटेल मालकाशी ओळख झाली. तो शाकाहारी मारवाडी होता. अंदाजे वय ४५ असावे. म्हणाला आमचे पूर्वज ६५ वर्षापूर्वी येथे आले. अजूनही जव्हार गावचं आहे. २ किमीच्या पलीकडे सर्व शेत जमिनी. तर ६५ वर्षांपूर्वी काय स्थिती असेल? रस्ते सुद्धा धड नसतील. वीज अर्थातच नसावी.
म्हणाला आज आम्ही ४ भावंड व्यवसायात एकत्र आहोत, संसार वेगवेगळे आहेत. आमचे २ रिसॉर्ट आहेत एकामध्ये ५० तर दुसऱ्यात ६० रूम्स आहेत. आणि एक हॉटेल आहे ते २५ वर्षांपूर्वी बांधले त्यात २४ रूम्स आहेत आणि आता जवळच आणखी एक ५ मजली हॉटेल आणि खाली २ मजली शॉपिंग असे ५ कोटी रुपये खर्च करून बांधत आहोत. शिवाय वेगवेगळ्या मोक्याच्या ठिकाणी १०० एकर जमीन आहे. बहुतेक हॉटेल मध्ये मॅनेजर ठेवले असून शिवाय मी आणि मोठा भाऊ दररोज साठी छोटे मोठे कॅन्स्ट्रक्शन चे काम करतो. आम्ही जास्त शिकलो नाही पण मुले चांगली शिकत आहेत.
म्हणाला हे सर्व एकदम झालेले नाही. आमच्या आजोबानी एसटी स्टॅन्ड समोर चहा, बिस्कीट अशी टपरी टाकून सुरवात केली. पुढे माझ्या वडिलांनी पहिले २४ रूमचे हॉटेल बांधले. अर्थात कर्ज घेऊनच.
दर पाच वर्षानी आम्ही एखादा नवीन प्रोजेक्ट हाती घेतो आणि तो पूर्णतःवास नेवून त्याची व्यवस्था लावतो. सर्व व्यवसाय चालू स्तिथीत आहेत. त्यामुळे कॅश फ्लो चा प्रॉब्लेम नाही. दिवसेंदिवस पसारा वाढवतच आहोत. कोणाशी भांडण नाही तंटा नाही.
काही वर्षांपूर्वी येथे जमीन ६० रुपये फूट होती पण येथे राजकारणी मंडळींनी भरपूर जमीन घेऊन ठेवली असून आताचा भाव १००० रु. फूट आहे.
आज आमची मुले शिकली तरी ती हेच व्यवसाय पुढे चालवणार. आमच्या वडिलांनी आमची व्यवस्था केली, आम्ही आमच्या पुढील पिढीची.
मी म्हटले आमच्या कोकणात याच्या पेक्षा जास्त सृष्टी सौंदर्य आहे. तो म्हणाला तुमच्याकडे थोडे पैसे असतील तर तुम्ही रिसॉर्ट काढून कृषी पर्यटन म्हणून MTDC मध्ये नोंद करा. चांगला प्रॉफिट आहे. पण तुमची मुले हे सांभाळणार असतील तर. ह्यात सुरवातीला थोडा वेळ लागतो पण एकदा तुमचे नांव झाले की मग प्रश्न नाही.
अर्थात जव्हार मध्ये कोम्पिटिशन नाही कारण पर्यटन स्कोप लिमिटेड वाटला. पण म्हणाला पावसाळ्यात ४ महिने फुल जाते.
मी निष्कर्ष काढला तो असा, ४ भावंडे एकत्र काम करतात. एकदा निर्णय झाला की सर्व एकत्र काम करतात. त्यांच्या फॅमिली ची साथ आहे त्यासाठी ते जव्हार येथे राहणे पसंद करतात, मुले धंदा सांभाळणार आहेत, सांभाळत आहेत. कष्ट करण्याची तयारी आहे. स्वभाव सरळ वाटला.
माधव भोळे
Thursday, January 18, 2024
शाकाहारी रहा, शाकाहारी व्हा!!
# दोन तोळे मांस
मगधसम्राट बिंदुसर यांनी एकदा त्यांच्या सभेत विचारले, 'देशातील अन्नाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वात स्वस्त वस्तू कोणती? '
मंत्रीपरिषद आणि विधानसभेचे इतर सदस्य विचारात होते. काही वेळाने शिकारीची आवड असलेले सामंत म्हणाले, 'राजन, सर्वात स्वस्त अन्न म्हणजे मांस. '
सामंत यांच्या बोलण्याला सर्वांनी पाठिंबा दिला, पण चाणक्य गप्पच होता. सम्राटाने त्याला विचारले, 'तुला याबद्दल काय वाटते? '
चाणक्य म्हणाला, 'मी उद्या माझे विचार तुमच्यासमोर ठेवेन. '
रात्री चाणक्य त्या सामंताच्या वाड्यात पोहोचला. सामंत यांनी दार उघडले. चाणक्य म्हणाला, महाराज संध्याकाळी अचानक आजारी पडले, राजवैद्य म्हणाले की राजाला दोन तोळे ह्रदयाचे मांस मिळाले तर त्यांचा जीव वाचवू शकतो, म्हणून मी तुमच्याकडे फक्त दोन तोळे हृदय मागण्यासाठी आलो आहे. यासाठी तुम्हाला एक दशलक्ष सोन्याची चलने घ्या. सामंत यांनी चाणक्यचे पाय धरून माफी मागितली आणि उलट एक लाख सोन्याचे चलन दिले की या पैशातून दुसर्या सामंताच्या हृदयाचे मांस विकत घ्यावे.
अशाप्रकारे पंतप्रधान चाणक्य एकामागून एक त्या सर्वांकडे गेले ज्यांनी मांसाचे समर्थन केले परंतु कोणीही मान्य केले नाही परंतु इतर कोणाचे मांस विकत घेण्याची माफी मागून सर्वांनी चाणक्याला एक लाख सोन्याचे चलन दिले.
चाणक्य सकाळच्या आधी राजवाड्यात परतला आणि राजासमोर अनेक लाखांचे सोने ठेवले.
बादशहाने विचारले, 'हे सर्व काय आहे? '
तेव्हा चाणक्यने सांगितले की दोन तोळे हृदयाचे मांस खरेदी करण्यासाठी इतके पैसे जमा झाले, तरीही दोन तोळे मांस मिळाले नाही.
'राजन, आता तुम्हीच विचार करा की मांस किती स्वस्त आहे? जीवन अमूल्य आहे. जसे आपण आपल्या जीवनावर प्रेम करतो, तसेच इतर सर्व सजीवांचे आपल्या जीवनावर तितकेच प्रेम असते. पण ते त्यांचे प्राण वाचवू शकत नाहीत. प्राणी बोलू शकत नाहीत आणि त्यांच्या वेदना सांगू शकत नाहीत. मग हाच त्यांचा जगण्याचा हक्क हिरावून घ्यायचा का?
शुद्ध अन्न, शाकाहारी!
मानवी अन्न, शाकाहारी!
शाकाहारी रहा, शाकाहारी व्हा!!
Wednesday, December 27, 2023
Y combinator: स्टार्टप ऍक्सिलरेटर
Y combinator: स्टार्टप ऍक्सिलरेटर
आपणास आठवत असेल की या आधी मी माझ्या एका पोस्ट मध्ये "थील शिष्यवृत्ती" आणि ओयो ह्या हॉटेल अग्रीगेटर आणि बुकिंग वेबसाईट चा संस्थापक रितेश अगरवाल याचे बद्दल लिहिले होते.
अशाच एका स्टार्टप ऍक्सिलरेटर बद्दल आज लिहीत आहे. स्टार्टप ऍक्सिलरेटर म्हणजे नवीन सुरु होणाऱ्या कंपन्याच्या संस्थापकाना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना सतत मार्गदर्शन करणे आणि त्याचबरोबर त्यांच्या व्यवसायासाठी बीज भांडवल पुरवणे.
"Y Combinator management LLC" नावाची एक खाजगी संस्था पॉल ग्राहम, जेसीका लिविंगन्स्टन, रॉबर्ट तपन मॉरीस आणि ट्रिव्हर ब्लॅकवेल या संस्थापकांनी २००५ साली वरील उद्देशानी स्थापन केली. ह्याचा पत्ता माउंटन व्यू, कॅलिफोर्निया हा आहे.
ही संस्था दर सहा महिन्यांनी नवनवीन कंपन्याकडून त्यांचे अर्ज आणि माहिती, बिझिनेस मॉडेल इत्यादी मागवते. साधारण पणे दर ६ महिन्यातून जगभरातून १०,००० कंपन्या अर्ज करतात. गेल्या ६ महिन्यामध्ये एकंदर २४,००० कंपन्यानी अर्ज केले होते. त्यातील फक्त १.५ ते २% कंपन्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात सहभागी होण्याची संधी मिळते.
हा अभ्यासक्रम वर्षातून दोन वेळा प्रत्येकी ३ महिन्याचा ( जानेवारी ते मार्च आणि जून ते ऑगस्ट ) या काळात असून त्यातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या तज्ज्ञ व्यवसायिक आणि मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन मिळते. सहभागी होणाऱ्यांचे विचार आणखी सुस्पस्ट केले जातात आणि गैरसमज दूर केले जातात. शेवटच्या आठवड्यात प्रत्येक विद्यार्थ्याकडून प्रेसेंटेशन होते.
निवडलेल्या सर्व कंपन्याना सुरवातीला प्रत्येकी १,२५,००० डॉलर्स एव्हडे बीज भांडवल दिले जाते आणि त्याबद्दल्यात त्या कंपनीचे ७% भांडवल Y Combinator ला मिळते. कंपनीच्या पुढील फंडिंग राउंड मध्ये त्याला ३,७५,००० डॉलर्स काही विशिष्ठ अटींवर Y Combinator पुरवते.
२००५ पासून ह्या कंपनीने आजपर्यंत ९,००० संस्थापकांच्या ४,००० स्टार्टपना बीज भांडवल दिले असून त्या कंपन्यानची एकंदरीत मार्केट कॅप $१ ट्रिलीयन इतकी आहे.
या वर्षीच्या बॅच मधील २८२ कंपन्या पैकी १२ कंपन्या भारतीय आहेत. २०२३ पर्यंत, Ycombinator नें २३३ भारतीय कंपन्यामध्ये पैसे गुंतवले आहेत.
Razorpay, Meesho, Zepto, khatabook अशा काही नामांकित कंपन्याना Y Combinator कडुन निधी मिळाला आहे.
Ycombinator सारखेच काम करणारी संस्थापक "सीकोषा सर्ज" नावाची संस्था भारतात काम करते तिला सिकोशा कॅपिटल नावाची संस्था वित्त पुरवठा करते.
माधव भोळे
आर्टिफिशल इन्टीलीजन्स भीती आणि बागुलबुवा
आर्टिफिशल इन्टीलीजन्स भीती आणि बागुलबुवा
आजकाल असे लेख येत आहेत की आर्टिफिशल इन्टीलीजन्स नें जगात भारी हैदोस घातला जाणार आहे. कोणीतरी लिहिले आहे की रोबोट एव्हडे तयार होतील की ते माणसाच्या नाशालाच कारणीभूत होतील. ही भीती सर्वतः चुकीची आणि अर्धवट माहितीच्या आधारे पसरवली जातं आहे.
अशा प्रकारचे मनोरंजन पूर्वी हॉलिवूड च्या सिनेमांत येत असे पण तसे काही होईल असे वाटत नाही. या पूर्वी अणूशक्तीचा शोध लागला आणि अणुबॉम्ब तयार झाले ज्याने संबंध जगाला हादरवून टाकले आणि तशी ताकद सुद्धा त्यात आहे परंतु म्हणून काय प्रत्येक होणारे युद्ध आणविक युद्धच होईल असे नाही. तसेच बनणारे सर्व रोबोट म्हणजे महाभुतेच असतील असे नाही. अणूशक्तीचा उपयोग चांगल्या कामासाठी सुद्धा केला जातो जसे की वीज निर्मिती, कॅन्सर ट्रीटमेंट वगैरे.
ज्या ज्या वेळी बदल होत गेले त्या त्या वेळी माणसानी विरोध केला आहे, मग ते राष्ट्रीयकृत बँक मधील संगणकीकरण असो की ऑफिस मधील खुर्चीची जागा बदलणे असो. यु पि आय असो की जी एस टी असो.
परिवर्तन हा जीवनाचा पाया आहे. घोडा गाडी जाऊन ट्राम आली, ट्राम जाऊन ट्रेन आली. पहिली ट्राम चालू झाली त्यावेळी ती लोकांना भूत व्यवस्था वाटली आणि लोक त्यात बसायला घाबरात. आज जो उठतो तो विमानाने जातो आहे हा परिस्थितील बदल.
जे नवीन व्यवस्थेशी जोडले गेले ते यशस्वी झाले, जे जुनेच कुरवाळत बसले ते घरीच बसले. छत्रपती शिवरायांनी सुद्धा नुसत्या तलवारिंवर अवलंबुन न राहता टोपीकरांकडून लांब पल्ल्याच्या तोफा घेतल्या तर पोर्तुगीज तंत्रज्ञा कडुन नौका बांधणी करून अरमार उभे केले.
तुम्ही कितीही थांबवण्याचा प्रयत्न केलात तरी ह्या सुनामीतून तुम्हांला जावेच लागणार आहे. लाटाना भीऊन जाण्यापेक्षा त्यावर स्वार व्हायला शिकले पाहिजे.
आर्टिफिशल इन्टीलीजन्स चा उपयोग सर्वत्र जेथे माणसाची बुद्धी चालते त्या सर्व ठिकाणी होईल आणि त्यासाठी तसा डेटा असणे आवश्यक आहे. अजून तरी जे ठाऊक आहे तेच तो गतीमान पद्धतीने तुमच्या समोर आणून ठेवतो. त्याला स्वतःचे डोके नाही. तो विचार करू शकत नाही. तो कोरीलेट (एकमेकांशी संबंध जोडणे) करू शकतो , तो एक्सट्रापोलेट ( तर्क लढवून नवीन माहिती तयार करणे) करू शकतो. असलेल्या माहितीच्या आधारे नवीन माहिती तयार करू शकतो, ऍक्शन घेऊ शकतो. या त्याच्या ताकदीचा उपयोग वैद्ध्यक शास्त्र, रसायन शास्त्र, इंजिनियरिंग, संख्या शास्त्र, फायनान्स, अशा एक ना अनेक विषयात त्याचा उपयोग आहे.
मानव एव्हडा मूर्ख नाही की तो दुसऱ्याला आपल्यावर हवी होऊन देईल. तरी कृपया भीती सोडून द्या.
माधव भोळे
Subscribe to:
Posts (Atom)