पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी ही उक्ती म्हटल्याचे अनेकांना माहिती असेलच. आज ही उक्ती ईथे लिहिण्याचे विशेष कारण आहे म्हणजे गुगल ह्या इंटरनेट सर्च इंजिनचा व्यवसाय करणाऱ्या जागतिक सॉफ्टवेअर कंपनी बद्दल अमेरिकन न्याय पालिके बद्दलचे मत.
गुगल हे नांव अमेरिकेतच काय पण भारतासारख्या खंडप्राय देशापासून ते अगदी आफ्रिकेतील अति मागासलेल्या देशात सुप्रसिद्ध आहे. अगदी म्हाताऱ्या कोताऱ्यांपासून ते शेमड्या मुलाला जरी एखादा कठीण प्रश्न विचारला तरी ती मंडळी म्हणतात गुगल कर म्हणजे गुगल वर शोध. होय, हीच प्रसिद्धी आणि हाच लोकांचा लळा अमेरिकन न्याय पालिकेच्या डोळ्यात खूपत आहे. विशेष म्हणजे हे लोकोपयोगी काम गुगल सुरवातीपासून मोफत करत आहे. "बहुजन हिताय, बहुजन सुखाय", हे तत्व ठेवून गुगल हे काम ( निस्वार्थी पणे ?? गुगल त्या बदल्यात तुम्हांला जाहिराती दाखवते आणि आपल्या मेहेंनतीचे पैसे जाहिरातदारांकडुन वसुल करते ) करत आहे. पण ते अमेरिकेन न्यायपालिकेला मान्य नाही!!
अमेरिकन स्टॅटिस्टिक्स प्रमाणे जगातील ९०% इंटरनेट सर्च हा गुगलच्या क्रोम ह्या ब्राऊजर मधून किंवा अँड्रॉइड ह्या मोबाईल ऑपेरेटिंग सिस्टिम मधून होतो. आणि त्यामुळे गुगल ने इंटरनेट सर्च मार्केट मध्ये एक अघोषित एकाधिकरशाही (मोनोपोली ) तयार केली आहे आणि त्यासाठी त्याला भोगावे लागणार आहे. गुगलची ही मोनोपोली तोडायचा विचार अमेरिकन न्याय पालिका करत आहे.
आता अमेरिकेसारख्या फ्री मार्केट मध्ये जों जास्त सक्षम तों जास्त चांगला व्यवसाय करेल हे तत्व मान्य असताना अमेरिकन न्याय पालिका असा विचार का करते हे कोडेच आहे?
खरे म्हटले तर बिंग, याहू, बायडू यां सारखी काही प्रसिद्ध सर्च इंजिन असताना लोक गुगलवरच सर्च का करतात तर त्यांना पाहिजे असलेली योग्य माहिती त्यांना योग्य फॉरमॅट मध्ये योग्य पद्धतीने मिळते म्हणून. ज्याला फोनेटीक म्हणजे सारख्या उच्चाराचे, सिमँटिक म्हणजे सारख्या अर्थाचे किंवा सारख्या गरभीर्थाताचे शब्द तसेच योग्य तेथे योग्य वाक्प्रचार इत्यादी गोष्टी सुद्धा त्या मुळं सर्चच्या बरोबर दाखवतात जेणेकरून जर तुमच्या मनात काही वेगळे साधर्म्या असलेले शोधायचे असेल पण तुम्ही चुकीचे शोधत असाल तर तों तुम्हांला दिशा दर्शक शोध करून देतो. माणसाच्या मनाचा ठाव घेणारा हा सर्च तुम्हाला भावत असल्यामुळे तुम्ही सर्च म्हटले की गुगल हे नांव आपोआप डोक्यात फिट बसलेले असते. कोठे जायचे असले की आपण गुगल मॅप वापरतो. कॉन्फरस कॉल करायचा असेल तर गुगल मीट वापरतो. एकेकाळी गुगल चॅट ने सुद्धा आपल्याला साथ दिली आहे. अशी अनेक प्रॉडक्ट आहेत जीं गुगलने तयार केली आहे.
आता आपल्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस एव्हडी ताकदवान बनवल्यामुळे स्पर्धेकांना त्यांच्यासमोर टिकता येत नाही यात गुगल चा काय दोष?
अशीच गोष्ट चीनमधील जॅक मा नावाच्या उद्योगपतीची झाली. अलीबाबा ह्या ई कॉमर्स कंपनीने चीन आणि जगभर आपला पसारा एव्हडा वाढवला की चिनच्या एक्स्पोर्ट मध्ये त्याचा मोठा वाटा निर्माण झाला. शिवाय यां एक्स्पोर्ट्सर ना मदत करण्यासाठी आणि अन्य ग्राहकांच्या मदतीला त्याने आंट फायनानशियल नावाची कंपनी काढली. तिचा पसारा एव्हडा वाढला की जॅक मा हा चिनच्या राज्यकर्त्यांना एक जोखीम ( threat ) वाटू लागला. आणि चीन ने जॅक मा चे पंख कापायला सुरवात केली. त्यांनी आन्ट फायनानशियल च्या पब्लिक इस्यू वर बंदी आणली आणि त्याची कंपनी जास्तीतजास्त कशी अडचणीत आणता येईल यांसाठी बंधने टाकली. शेवटी जॅक मा चीन सोडून बाहेर राहू लागला.
सांगण्याचे तात्पर्य एव्हडेच की जे काम कराल ते एव्हडे मोठे करा की सत्ताधारी डळमळू लागतील.!
माधव भोळे
No comments:
Post a Comment