रिडेव्हलपेंट आणि रिस्क:
काल रिडेव्हलपेंट ह्या विषयावर एकाशी बोलत होतों. तों म्हणाला बाकी सर्व ठीक आहे. कित्येक रिडेव्हलपेंट चांगल्या झाल्या तर कित्येक रिडेव्हलपेंट रखडल्या, कित्येक बिल्डर पळून गेले. आपले काय होणार याची कोणी गॅरंटी देऊ शकेल का?
मीं म्हटले आयुष्यातील इतर रिस्क प्रमाणेच ही सुद्धा एक रिस्कच असते, पण ती घेण्यापूर्वी आपण शक्य असेल तेव्हडी जास्तीजास्त काळजी, अग्रीमेंट मधील डिटेल्स, कायदेशीर आणि आर्थिक सल्ले, बिल्डर चा पूर्व रेकॉर्ड सर्व तपासून बघण्याचा प्रयत्न करतो परंतु गॅरंटी कसलीच देऊ शकत नाही. प्रिकॉशन घेणे आपले कर्तव्य आहे. म्हणून रिस्क घ्यायचीच नाही असे आपण म्हणू शकत नाही.
आयष्यात आपल्याला वेळोवेळी रिस्क घ्यायला लागते. रस्त्यावर अनेक अपघात होत असतात म्हणून आपण चालायचे किंवा गाडी चालवायचे किंवा रिक्षा / बस / विमानामध्ये बसायचे सोडून देतो का?
ज्या वेळी आपण जन्माला आलो, त्याचवेळी आपल्या आईवडिलांनी रिस्क घेतली होती आणि त्यात आपल्या आईचा वाटा जास्त होता. म्हणून तर आपल्याला हे सुंदर जग बघायला मिळाले.
रिस्क ही आपल्या जन्माच्या आधी पासून सुरू झालेली गोष्ट आहे मग कशाला घाबरायचे? रिडेव्हलपेंट म्हणजे एक पुनर्जन्मच असतो हे खरे आहे.
चांगले चिंतले की चांगले होते.
माधव भोळे
No comments:
Post a Comment