विद्वान सर्वत्र पूज्यते!!
चेन्नई आडियार मधून मैलापुर रोडला जात असताना वाटेमध्ये दुर्गाबाई देशमुख नावाचा रस्ता लागला. सर्वत्र तामिळ राजकारणी आणि महापुरुषांच्या नावाने रस्ते असताना मराठी स्त्रीच्या नावाने रस्ता आहे हे बघून अतिशय आनंद झाला.
कोण आहे ह्या दुर्गाबाई देशमुख?
नंतर लक्षात आले की भारतीय रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर आणि भारताचे तृतिय अर्थमंत्री ( १९५० ते १९५६) सर चिंतामणराव देशमुख, ICS यांच्या पत्नी दुर्गाबाई देशमुख.
दुर्गाबाईंचा जन्म आंध्र प्रदेशातील ( पूर्वीचे मद्रास राज्य ) राजमंद्री गावात एका वैदिक कुटुंबात झाला. त्यांचे माहेरचे नांव गुम्मीदिडाला असे होते. पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे त्यांचा विवाह वयाच्या आठव्या वर्षी सुब्बाराव नावाच्या व्यक्तीशी झाला, परंतु दुर्गाबाई सज्ञान झाल्यावरती त्यांनी हा विवाह नाकारला आणि त्या परत आपल्या आई-वडिलांच्या घरी आल्या. या विषयात त्याना त्यांच्या आई-वडिलांचा संपूर्ण पाठिंबा होता. त्यांच्या मते त्या सज्ञान नसताना त्यांचा विवाह होणे योग्य नव्हते.
लहानपणापासूनच त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यां आणि महात्मा गांधींच्या अनुयायी होत्या. सासरहुन परत आल्यानंतर त्यांनी आपले सर्व लक्ष अभ्यासाकडे केंद्रित केले आणि १९४२ साली मद्रास विश्वविद्यालयातून त्या वकील झाल्या. त्यांनी स्त्री उतथान आणि सामाजिक सुधारणानसाठी मोठी चळवळ उभारली. त्या केंद्रीय सामाजिक विकास समितीच्या संस्थापक अध्यक्ष होत्या. महिलांसाठी विशेष कौटुंबिक न्यायालये सुरू करण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला.
भारताच्या ३८९ सदस्य असलेल्या संविधान आराखडा समितीच्या १५ महिला सदस्यांपैकी त्या एक होत्या. १९५२ साली काँग्रेसतर्फे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये हरल्यानंतर त्या भारताच्या प्लॅनिंग कमिशनच्या पहिल्या महिला सदस्य झाल्या.
१९४९ मध्ये चिंतामणरावांची ब्रिटिश पत्नी Rosina
Arthur Wilkox ( पहिली पत्नी ) निर्वातल्यानंतर १९५३ साली त्यांनी दुर्गाबाईंकडे लग्नासाठी मागणी घातली. त्या वेळी त्या ४४ वर्षाच्या होत्या. परंतु त्या दोघांचे विचार एक होते ते म्हणजे देशाचा विकास. चिंतामणराव आणि दुर्गाबाईंचा विवाहचे स्वतः नेहरू एक साक्षीदार होते.
१९५६ साली मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ नये ह्या संबंधातील केंद्रीय कॅबिनेट बरोबर झालेल्या मतांतरामूळे चिंतामणरावांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला परंतु नेहरूंना चिंतामणरावांसारखा हिरा गमवायचा नव्हता म्हणून नेहरूंनी १९५० साली स्थापन झालेल्या प्लॅनिंग कमिशनच्या अध्यक्षपदी चिंतामणरावाची १९५६ साली नियुक्ती केली.
आपल्या निवृत्तीनंतर दुर्गाबाई आणि सी डी देशमुख हैद्राबाद येथे रहात असत. ९ मे १९८१ साली दुर्गाबाई आपल्या पतींचा आधी परलोकवासी झाल्या.
माधव भोळे
No comments:
Post a Comment