Thursday, February 17, 2022

केल्याने होत आहे रे ( भाग 2)

 केल्याने होत आहे रे ( भाग 2)

मागच्या लेखात आपण बघितले की इंडियन शार्क टॅंक ह्या सोनी एंटरटेनमेंट चॅनल वरील बिझिनेस रिऍलिटी शो, जो भारतातील नवोदित उद्योजकांना मार्गदर्शन करते, त्यांच्या व्यवसायिक कल्पनांवर चर्चा करून त्या कल्पना आणखी विस्तृत आणि सशक्त बनवण्यासाठी मदत करते आणि त्यातील कोणती कल्पना व्यवहारिक वाटली तर त्यामध्ये व्हेंचर कॅपिटल सुद्धा गुंतवते,  त्यातील 7 जजेस पैकी एक पियुष बन्सल यांची माहिती आपण काल बघितली. आज आपण सौ नमिता थापर यांचे बद्दल जाणून घेऊ.


1977 मध्ये जन्मलेल्या पुणे स्थित नमिता थापर ह्या पुण्यातील एमक्युयर ह्या औषधी कम्पनी ( फार्मा ) च्या एक्सिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. त्यांचे वडील श्री सतीश मेहता हे ह्या कम्पनीचे संस्थापक,  CEO आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. एमक्युयर फार्मा कम्पनी चा वार्षिक टर्नओव्हर 6091 कोटी रुपये असून त्यांचेकडे 11,000 नोकर आहेत आणि 70 देशात त्यांचे जाळे असून त्यांच्या 14 प्लांट मधून 350 औषधी ब्रँड तयार होतात.


नमिताचे शालेय आणि कॉमर्स मधील कॉलेजचे शिक्षण पुण्यातूनच झाले.  त्या चार्टर्ड अकाऊंट झाल्या आणि पुढे नॉर्थ कॅरोलिना, अमेरिका मधील ड्युक्स युनिव्हर्सिटी च्या फुकवा स्कुल ऑफ बिझिनेस मधून त्यांनी एम बी ए केले. अमेरिकेत गायडंट कॉर्पोरेशन मध्ये 6 वर्ष काम केल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांच्या व्यवसायात भारतात मदत करायला सुरुवात केली. त्यांनी प्रथम चीफ फायनॅन्सीयल ऑफिसर हे पद सांभाळले आणि पुढे त्या एमक्युयर च्या एक्सिक्युटिव्ह डायरेक्टर झाल्या. त्यांनी विकास थापर यांच्याशी विवाह केला असून ते एमक्युयर मध्ये ते कॉर्पोरेट प्रेसिडेंट, बिझिनेस अँड फायनान्स पदावर काम करतात.


हे करत असताना नमिता थापर ह्या फुकवा स्कुल ऑफ बिझिनेस च्या भारत विभागात बोर्डवर नेमल्या गेल्या,  शिवाय भारतातील TiE ( The Indus Enterprenures) ह्या 1992 साली सुरू झालेल्या सिलिकॉन व्हॅली, अमेरिका येथील कनवल रेखी, सुहास पाटील आणि प्रभू गोयल ह्या तीन टेक्नॉलॉजिस्ट नि सुरू केलेल्या स्टार्टअपस ना फ़ंडिंग करणाऱ्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या बोर्डावर त्या आहेत. TiE हे स्टार्टअप साठी एक मोठे व्यासपीठ आहे. आजपर्यंत 10,000 स्टार्टअप ह्या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत.  यंग प्रेसिडेंटस ऑर्गनायझेशनच्या त्या सक्रिय सभासद आहेत.


ह्या शिवाय नमिता थापर,  हार्वर्ड बिझिनेस स्कुल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद, इकॉनॉमिक टाईम्स वूमन कॉन्फरन्स, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्त्ररीज ( FICCI) ह्या ठिकाणी विशेष वक्त्या म्हणून मार्गदर्शन करत असतात.


तरुणांना व्यवसाय मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी इनक्रेडीबल व्हेंचरस ही शैक्षणिक संस्था काढली असून त्यामार्फत 18 ते 24 वर्षापर्यंत च्या तरुणांना स्टार्टअप साठी मार्गदर्शन करतात. आजपर्यंत 25 स्टार्टअप मध्ये त्यांनी स्वतः गुंतवणूक केली आहे. 


त्या स्वतः एक यशस्वी व्यावसायिक असून इंडियन शार्क टॅंक मार्फत नवोदित स्टार्टअपना त्या मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या मालमत्तेची बाजारी किंमत 600 कोटी रुपये एव्हडी आहे.


माधव भोळे

No comments:

Post a Comment