Thursday, February 17, 2022

केल्याने होत आहे रे (१)

 केल्याने होत आहे रे (१)

मागच्या लेखात व्हेंचर कॅपिटल म्हणचे काय याबद्दल मी थोडक्यात लिहिले होते. आता थोडे पुढे जाऊ.


बिझिनेस रियालिटी शो असलेल्या अमेरिकन टेलिव्हिजन सिरीज शार्क टॅंकची भारतीय आवृत्ती नुकतीच (20 डिसेंबर 2021) प्रसारित झाली. इंडियन शार्क टॅंक असे तिचे  नाव असून ती सोनी एंटरटेनमेंट चॅनल वर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता प्रसारित होते. ह्या रियालिटी शो चा निर्माता अनुपम मित्तल हा सुप्रसिद्ध वधू वर सूचक वेबसाईट शादी.कॉम चा संस्थापक आहे. या सिरीज चे एकंदर 30 एपिसोड होणार आहेत.


भारतातील एका पेक्षा एक हुशार अशा आंतरपरिनर्सना या रियालिटी शो मध्ये सहभागी होऊन त्यांचे बिझिनेस मॉडेल अनुभवी आणि  तज्ञ अशा यशस्वी अंतरपरिनर्स समोर मांडण्याची संधी त्यांना मिळते. त्यांना आपल्या बिझिनेस मॉडेल्स बद्दल असलेल्या  वेगवेगळ्या शंकांचे निरसन करण्याची आणि आपले मॉडेल एक होऊ घातलेले यशस्वी व्यवसाय कसा आहे हे पटवून देण्यासाठी संधी मिळते. या मध्ये अनुपम मित्तल सहित 7 यशस्वी उद्योजक इंटरपरिनर  ह्या रियालिटी शो चे न्यायाधीश ( जजेस) आहेत. नमिता थापर, विनिता सिंग, अशनिर ग्रोव्हर, अमन गुप्ता, अनुपम मित्तल, गझल अलघ  आणि पियुष बन्सल हे ते 7 जजेस.  हे सर्व आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत. आज आपण या पैकी पियुष बन्सल ची ओळख करून घेऊ. 


कोण आहेत हा पियुष बन्सल?  26 एप्रिल 1985 मध्ये दिल्ली येथे जन्मलेले पियुष बन्सल ( वय वर्ष 36) हा दिल्लीतील भारतीय रहिवासी आहे.  तो कॅनडा मधील मॅकगिल युनिव्हर्सिटी चा इलेक्टरीकल आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (2002 ते 2006) मधील स्थानक इंजिनियर असून त्यानंतर त्याने भारतात इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट च्या बंगलोर कॅम्पस मधून इंटरप्रिंनरर्शीप ह्या विषयात मॅनेजमेंट डिग्री घेतली आहे. त्याला पहिल्यापासूनच व्यवसाय करण्याची आवड असून त्याच्या पालकांनी त्याला या विषयात सर्वतोपरी प्रोत्साहीत केले आहे.


इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये असताना त्यांनी कॉलेज कॅम्पस मधील मुलांना उपयुक्त असे सर्च माय कॅम्पस (2008, सुरवातीची गुंतवणूक रु 25 लाख)  असे पोर्टल काढून सुरवात केली. त्यानंतर आणखी काही करता येईल म्हणून इकॉमर्स ह्या विषयात त्याने लेन्सकार्ट ही ऑनलाइन चष्म्या, गॉगल, फ्रेम्स आणि असेसरीज विक्री करणारी पोर्टल वेबसाईट काढली ( नोव्हेंबर 2010). त्यांच्या लक्षात आले की ऑनलाइन बरोबरच प्रत्यक्ष दुकानात जाऊन चष्मा विकत घेण्याचा अनुभव काही वेगळा आहे. त्यानंतर त्यानी ऑनलाइन बरोबरच प्रत्यक्ष दुकाने स्थापन करणे किंवा फ्रांचाईस देणे अशी विक्री व्यवस्था स्थापन करायला सुरुवात केली. आज रोजी त्यांची एकंदर 750 चष्म्याची दुकाने असून त्यातील 720 भारतात आहेत. त्यांच्या या व्यवसायात सर्वश्री सर रतन टाटा, विप्रो चे अजीम प्रेमजी,  इन्फोसिस चे एक संस्थापक एस गोपालकृष्णन शिवाय परकीय गुंतवणूकदार टीमसेक इत्यादी फंड आहेत. येत्या काळात ते आणखी 300 दुकान स्थापन करू इच्छितात.


पियुष ची नेट्वर्थ 9680 कोटी रुपये (1.3 बिलियन डॉलर्स) एव्हडी आहे. नोव्हेंबर 2010 ते डिसेंबर 2021 हा 11 वर्षात भरगच्च दमदार कामगिरी असणारा त्यांचा व्यवसायिक प्रवास थक्क करणारा आहे. 


या रियालिटी शो मधील त्यांच्या सहभागानंतर त्यांच्या एका मुलाखतीत ते म्हणाले की खरेतर मी तेथे नवोदित इंटरपरिनरना मार्गदर्शन करण्यासाठी गेलो होतो पण त्यांच्या विविध कल्पना आणि विचारशक्ती बघून मीच नवीन चार गोष्टी शिकलो. म्हणतात शिकायला वय नसते हेच खरे.


माधव भोळे

No comments:

Post a Comment