Thursday, February 17, 2022

भारत आणि अमेरिका, सांस्कृतिक आणि वैचारिक दरी

 भारत आणि अमेरिका, सांस्कृतिक आणि वैचारिक दरी


काल भारतीय सुप्रीम कोर्टाने कडक नियम पाळून बैल गाडा शर्यतीला परवानगी दिली आणि महाराष्ट्रातील स्थानिक शेतकरी जेसीबी च्या साहायाने गुलाल उधळत स्थानिक नेत्यांना घेऊन ढोल ताशाच्या नादावर जोरदार नाचताना दिसले . लाखो शेतकरी कर्जबाजारी असताना आणि हजारो शेतकरी आत्महत्या करत असताना बैलगाडा शर्यत सुरू झाल्यामुळे होणाऱ्या मनोरंजनातून काही तास का होईना, त्यांच्या जगण्याचा आधारच निर्माण झाला अशीच त्यांच्या मनात भावना दिसली.  असो कोणाचा आनंद कशात असेल हे सांगणे कठीण आहे. 

त्याचवेळी म्हणजे 15 डिसेंबर 21 रोजी,  गेल्या  28 एप्रिल 2020 ला नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने सूर्याच्या बाहेरील कोरोना या तप्त ( सूर्याचे पृष्ठभागावरील तपमान सुमारे  5,600 सेल्शियस तर आतील तपमान सुमारे 1.5 कोटी सेल्सिअस एवढे आहे) वातावरणातील भागात जाऊन त्याचा अभ्यास करणाऱ्या पारकर सोलर प्रोब या अवकाश यानाने आणलेल्या माहितीच्या आधारे सूर्याभोवती चुंबकीय क्षेत्राचे नागमोडी वळण घेत असणारे वारे वाहात असून त्याशिवाय आणखी काही माहिती मिळत आहे का याचा शोध घेत आहोत असे जाहीर करून मानवजातीला मिळालेल्या अवकाशाबद्दलच्या आणखी काही माहितीला प्रसिद्धी दिली. विशेष म्हणजे हे सोलर प्रोब अवकाशयान ताशी 5 लाख किलोमीटर एव्हड्या वेगाने जात असून जर काही कारणामुळे ते अपेक्षेपेक्षा जास्त तापले तर पटकन त्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी हा वेग आवश्यक आहे असे लक्षात घेऊन बनवले असून ते उत्तम रीतीने आपले कार्य करत आहे असे जाहीर केले. अर्थातच या संशोधनाचे पाठी लाखो प्रयोग आणि संशोधने झाली असल्याशिवाय या उच्चतम पातळीला अमेरिका येणे शक्य नाही हे लक्षात घ्यायला हवे. आमची सर्वात वेगवान जेट फायटर विमाने ताशी 7,200 किमी एवढीच वेगाने  धावत असताना ताशी 5 लाख किलोमीटर एव्हडा वेग असणारे अवकाशयान तयार करणे आणि त्या वेगात आणि त्या तप्त वातावरणातसुद्धा त्याच्याबद्दल  माहिती गोळा करण्याचे काम करणे हे संशोधनाची पराकाष्टा आहे असे म्हणायला हरकत नसावी.

दोन संस्कृती मधील हा फरक नक्कीच लाक्षणिक आहे. शिक्षण, संशोधन, व्यापार, शस्त्रास्त्र, शेती  अशा अनेक विषयात अमेरिका भारतापेक्षा कैक पटीने पुढे आहे कारण ती मंडळी आपापल्या विषयात झोकून देऊन काम करतात, नुसतेच राजकारण करत नाहीत. हीच त्यांची संस्कृती आहे. आम्ही भारतीय प्रत्येक विषयात राजकारण आणि राजकारणात प्रत्येक विषय घालून घुसळत बसतो है दुर्दैव आहे.

माधव भोळे

No comments:

Post a Comment