नास्तिक की आस्तिक
आस्तिक
म्हणजे आस्था ठेवणारा, प्रेम करणारा, नास्तिक म्हणजे त्या विरुद्ध. ही आस्था नुसती ईश्वरापूर्ती
मर्यादित नसून, या
चराचरातील सर्व प्राणिमात्र, निसर्ग किव्वा जे जे सजीव आणि निर्जीव आहे त्यावर प्रेम करणारा
आणि विश्वास ठेवणारा तो आस्तिक अशी आहे. ईश्वराची मूळ संकल्पना तो जगनियंता
म्हणूनच केली गेली. मोठे मोठ्या डॉक्टरांकडे पाटी लिहिलेली असते, "आम्ही फक्त इलाज करतो, बरे तो करतो" कारण
त्यांना त्यांच्या किंवा मानवाच्या मर्यादा माहीत आहेत.
मी
नास्तिक आहे हे कित्येक वेळा अज्ञाना पोटी म्हटले जाते. ईश्वर या संकल्पनेची
सम्पूर्ण सकस माहिती असलेली व्यक्ती नास्तिक असू शकत नाही. आपल्या शरीरात असलेल्या
असंख्य पेशींपासून, महाकाय ढगा पासून, पाऊस कोठे पडावा आणि महापूर येऊन त्यातून
लाखो माणसे वहात असताना एखादे मुलं अलगद पाण्यावर तरंगत जाऊन कोणातरी मातेच्या
हाती सुखरूप रहावे या सम्पूर्ण व्यवस्थापनेला ईश्वरी सत्ता आणि ईश्वरी कृपा म्हटले
जाते. हे सर्व मानवी तर्काच्या आणि नियंत्रणा बाहेरील आहे. उदा द्यायचे झाले तर
आपल्या डोळ्यांचे आत मज्जापटलावर एक 2 ते 3 मिलिमिटर चा भाग असतो त्यावर 2 ते 3 लाख बिंदू असतात आणि
त्या प्रत्येक प्रकाश आणि रंग संवेदक (फोटो सेन्सेटीव्ह) बिंदूमधून एक तार
मेंदूतील वैशिष्ट भागाला जोडली जाते, तसेच मज्जा पटलावर ज्याचा आकार 2 ते 4 सेंटीमीटर असतो त्या
वर 5 कोटी
असेच प्रकाश संवेदक बिंदू असतात, त्या प्रत्येक बिंदूंच्या 5 ते 25 समूहाला एक तार जोडलेली असते ती मेंदूला
जाऊन मिळते तेव्हा कुठे एक सक्षम प्रतिमा तयार होते जी मेंदू आकलन करून सांगतो की
हा कुत्रा आहे, आणि
हा साप आहे. हे सर्व रेकॉर्डिंग very high density पद्धतीने सतत चालू असते, त्याची मेमरी फुल होत
नाही, आणि
मेंदू ते रेकॉर्डिंग ठेवून त्याचे विश्लेषण करून योग्य वेळी बाहेर सुद्धा काढतो,
आणि आपल्याला आठवते, अरे तू मला या दिवशी नाही तर या दिवशी अमुक ठिकाणी भेटला
होतास.
बर
याला लागणारी ऊर्जा (बॅटरी पॉवर) किती कमी आहे 8 ते 10 दिवस उपवास केला तरी ते छान चालू असते
इतक्या अत्यन्त कमी ताकतीवर हे सर्व चालते. मानवी शरीर हा एक नमुना आहे, असे 84 लक्ष स्पेसिस, ना
प्रत्येकाला वेगवेगळ्या श्वसन संस्था, पचन संस्था, मेंदू, आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टी त्यात आहेत.
या सर्वाचे आकलन मानवी तर्काच्या पलीकडले आहे. त्या ठिकाणी ईश्वर ही एक सत्ता
मानण्याशिवाय पर्याय उरत नाही.
सध्या संशोधन सुरू
असलेले आर्टिफिशल इंटिलीजन्स, काँजेनियल अन्यालिसिस या सारखे रोबोटिक्स मधील विषयांचा अभ्यास
हजारो संशोधक करीत आहेत. मला मागे एक कॉम्पुटर तज्ञाने सांगितले की जर यदाकदाचित
माणसाने माणसाचा मेंदू बनवण्याचा प्रयत्न केला तर त्याला एक 5 मजली बिल्डिंग एवढा
मोठ्या आकाराचा कॉम्पुटर लागेल. अर्थात आता या बाबतीत सुद्धा मानवाने प्रगती केली
असून लहानात लहान कॉम्पुटर प्रणाली तो शोधून काढत आहे. असो लिहिण्यासारखे भरपूर
आहे. पण ईश्वर हा कोणत्या मूर्तीत, सद्गुरूच्या किव्वा, निसर्ग किव्वा आणखी कोणत्या स्वरूपात
मानवा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण त्याचे अस्तिव नाकारणे म्हणजे निव्वळ अज्ञान
म्हणावे लागेल.
माधव भोळे (८४५१८८६७५९)
No comments:
Post a Comment