चंपतराय आणि SIT.
चंपत राय बन्सल, विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष, राष्ट्रीय स्वयंमसेवक संघांचे पूर्णवेळ प्रचारक, एक निस्सीम देशभक्त, एक निष्ठावंत समाज कार्यकर्ता आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे माजी जनरल सेक्रेटरी.
सध्या वादाच्या भोऱ्यात सापडलेली राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची दानपेटी आणि त्यामुळे बसलेली SIT या मुळे चंपत राय यांची चौकशी होणे साहजिकच आहे. जरी त्यांचे नांव प्राथमिक माहिती अहवाल ( FIR) मध्ये नसले तरी ज्या व्यक्तीवर राम मंदिर न्यासाची रोजच्या कारभाराची जबाबदारी आहे त्याची चौकशी होणे क्रमप्राप्त आहे. आणि जर त्यांची चौकशी होणार असेल तर त्याना त्यांच्या राम जन्मभूमी न्यासाच्या रोजच्या देखरेखीचा कोणताही नैतिक अधिकार रहात नाही त्यामुळे त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला किंवा त्यांना तो द्यावा लागला याने काही फरक पडत नाही.
अनेक लोकांचे म्हणणे आहे कीं काही लोक त्यांच्या वाईटावर आहेत आणि त्यामुळे त्यांना कट रचून त्यांचा काटा काढला गेला. पण जीं व्यक्ती आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडू शकत नाही त्याला त्या पदावर राहण्याचा अधिकारच नाही मग त्याचे पूर्व चारित्र्य कितीही स्वच्छ असो. येथे प्रश्न चरित्र्याचा आहेच पण क्षमतेचा सुद्धा आहे. एव्हडया मोठ्या कारभारावर लक्ष ठेवण्यास चंपत राय असमर्थ ठरले हे नक्की. तसें नसते तर एव्हडा मोठा घोटाळा राजरोस झाला नसता.
आता राहता राहिला प्रश्न कीं त्यांचा ह्या सर्व घोटाळ्यात आणि लुटीमध्ये थेट किंवा अप्रत्यक्षरित्या सहभाग होता का? तसेच ह्या लु्टीमुळे त्यांना किंवा त्यांचा परिवार, नातेवाईक किंवा मित्र मैत्रिणी, हित संबंधि यांना लाभ झाला का? आणि तो लाभ त्यांनी मिळवून दिला का?
तर त्याबाबतीत जेथपर्यंत सखोल चौकशी होत नाही आणि केस चा पूर्ण निकाल लागत नाही, आरोप पत्र निश्चित होत नाहीत तेथपर्यंत कोणालाही दोषी धरणे चूकच.
देव करो आणि चंपत राय ह्या सर्वातून सही सलामत सुटो आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कार्य सज्जन विश्वास्तांचे हाती जाओ.
माधव भोळे
No comments:
Post a Comment